त्वचेची काळजी

ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

Trupti Paradkar  |  Sep 20, 2020
ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

ऑक्सिजन फेशिअल ही एक अशी स्किन ट्रिटमेंट आहे ज्यामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होतं आणि कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळते. तुमच्या त्वचेला फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन फेशिअल करताना तुमच्या त्वचेच्या बाहय थरावर काही आधूनिक मशिनचा वापर केला जातो ज्यामुळे तुमच्या त्वचेला योग्य ऑक्सिजनचा पूरवठा होऊ शकतो. फेशिअल करताना तुमच्या त्वचेवर लावण्यात येणाऱ्या उत्पादनातून मिळणारी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आणि इतर पोषक घटक त्वचेत व्यवस्थित मुरतात. मशीन ट्रिटमेंटमुळे ही पोषत तत्व त्वचेत खोलवर मुरल्यास अधिक मदत होते आणि तुमची त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसू लागते.

Instagram

ऑक्सिजन फेशिअलचे फायदे –

ऑक्सिजन फेशिअल हे त्वचेची निगा राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते. कारण त्याचे फायदे त्वरीत तुमच्या त्वचेवर दिसू लागतात.

त्वचेतील कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळते –

त्वचा निरोगी राहण्यासाठी त्वचेत योग्य प्रमाणात कोलेजीनची निर्मिती होणं गरजेचं आहे. कारण हे त्वचेतील एक असं प्रोटिन आहे ज्यामुळे तुमच्या त्वचा पेशी एकमेकांना जोडून राहतात. ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही आणि त्वचेत पुरेशी लवचिकता निर्माण होते. जेव्हा कोलेजीनची निर्मिती कमी होते तेव्हा चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकत्या पडण्यास सुरूवात होते. ऑक्सिजन फेशिअलमुळे तुमच्या कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळते आणि त्वचा लवचिक राहते.

Instagram

त्वचा डिटॉक्स होते –

स्किन केअर प्रॉडक्टमधून मिळणारे पोषक घटक त्वचेत शोषून घेण्यासाठी आधी तुमची त्वचा डिटॉक्स होणं गरजेचं असतं. कारण त्वचेवर सतत धुळ, माती, प्रदूषण यांचा थर बसत असतो. ज्यामुळे त्वचेचे पोअर्स ब्लॉक होतात. ऑक्सिजन फेशिअलमुळे त्वचेचं डिटॉक्सिफिकेशन योग्य पद्धतीने होतं. अशी वरचेवर त्वचा डिटॉक्स झाल्यामुळे तुमची त्वचा निरोगी आाणि तजेलदार दिसू लागते. 

त्वचेची पुर्ननिर्मिती योग्य पद्धतीने होते –

मानवी त्वचेतील पेशींचे जीवन हे ठराविक काळासाठी मर्यादित असते. ज्यामुळे सतत त्वचेत नवीन पेशींची पुर्ननिर्मिती होणं गरजेचं असतं. ऑक्सिजन फेशिअलमुळे तुमच्या डेडस्कीन निघून जातात आणि त्वचेला नवीन त्वचापेशी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्वचेची पुर्ननिर्मिती योग्य पद्धतीने झाल्यामुळे चेहऱ्यावरील डाग, जुनाट व्रण कमी होतात.

Instagram

त्वचेला पुरेसं पोषण मिळतं –

सतत ऊन, धुळ, प्रदूषणाचा मारा त्वचेवर झाल्यामुळे त्वचेतील मऊपणा कमी होतो. ज्यामुळे त्वचा खूपच कोरडी आणि निस्तेज होते. त्वचा कोरडी झाल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकता. मात्र जर तुम्ही नियमित ऑक्सिजन फेशिअल करत असाल तर यामुळे तुमच्या त्वचेला खोलवर पोषण मिळतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या कमी होतात, त्वचा मऊ होते, त्वचेचा पी एच बॅलन्स राखला जातो आणि त्वचा तजेलदार होते. 

पिंपल्स कमी होतात –

जर तुम्हाला  एक्ने अथवा पिंपल्सचा त्रास  असेल तर तुम्ही ऑक्सिजन फेशिअल करायलाच हवं. कारण पिंपल्समुळे तुमच्या त्वचापेशी बंद होतात आणि त्यामध्ये धुळ,प्रदूषण, तेल अडकून राहतं. ज्यामुळे तुम्हाला ओपन पोअर्सच्या समस्येलाही तोंड द्यावं लागतं. ऑक्सिजन फेशिअलमुळे हे पोअर्स पुन्हा आकुंचन पावतात. जर नियमित ऑक्सिजन फेशिअल केलं तर हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि त्यामुळे निर्माण झालेले डाग कमी होऊ शकतात. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’

त्वचा टोन्ड करण्याचे काम करतात हे फेस मसाजर, नक्की वापरुन पाहा

फेस सीरम आणि मॉईस्चराईझर यात काय आहे फरक (Facial Serum Vs Face Moisturizer)

 

Read More From त्वचेची काळजी