Diet

पिनट बटर लव्हर्ससाठी खूषखबर, असं ठरतं आरोग्यवर्धक

Aaditi Datar  |  Jan 30, 2020
पिनट बटर लव्हर्ससाठी खूषखबर, असं ठरतं आरोग्यवर्धक

 

तुम्हाला माहीत आहे का, पीनट बटरमध्ये असतात भरपूर पोषक तत्त्वं. याचा उपयोग फक्त नाश्त्याच्या वेळी ब्रेडला चविष्ट बनवण्यासाठी असणारं स्प्रेड नाहीतर याचं आहे अनेक आरोग्यदायी फायदे.

पीनट बटरचे आरोग्यदायी फायदे 

Canava

 

हे फायबरयुक्त असल्याने पचनासाठीही हे चांगलं असतं. यामध्ये असलेल्या मॅग्नेशिअममुळे हाडं आणि स्नायू मजबूत होतात. पीनट बटरमध्ये पोटॅशिअम आणि प्रोटीन आढळतं, जे हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी करण्याचं काम करतं. तसंच स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याची शक्यताही कमी करतं. पीनट बटरमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सही भरपूर असतात. जे एक हेल्दी फॅट आहे आणि आपल्या शरीरालाही त्याची गरज असते. 

 

पीनट बटरमध्ये आर्यन, मॅग्नेशिअम आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. या चांगल्या घटकांमुळे शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते. 

पीनट बटरमध्ये व्हिटॅमीन ई आणि अँटीऑक्सीडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असणाऱ्या न्यूट्रीएंट्स आणि मॅग्नशियमने स्नायू मजबूत होतात. जे डोळ्याच्या मूव्हमेंट योग्य ठेवतात आणि दृष्टी कमजोर होऊ देत नाहीत. 

दुसऱ्या नट्सप्रमाणे पीनट बटरही जलद वेटलॉस करण्याचं काम करतं. प्रोटीन, फॅट आणि फायबरयुक्त पीनट बटरमुळे पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे भूक कमी लागते आणि क्रेविंग किंवा ओव्हर इटिंग होत नाही. ज्यामुळे जास्तीचं वजन वाढत नाही. 

Shutterstock

 

आरोग्यदायी पंचामृत सेवनाचे फायदे

काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे

 

मोनोसॅच्युरेटेड फॅटी एसिड युक्त असून पीनट बटरमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड, नियासीन, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमीन ई सारखी तत्त्वं असतात. ज्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. पण त्यासोबतच पीनट बटरमध्ये हाय कॅलरीज, सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमही असतं. जे हृदयाला कधीही नुकसान पोचू शकता. त्यामुळे याचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं. 

पीनट बटर डायबेटीज रूग्णांसाठी गुणकारी आहे, कारण यामध्ये कमी कार्बोहायड्रेट असतं. तसंच यामध्ये कोणतीही अतिरिक्त साखरही नसते. यात फॅट, फायबर आणि प्रोटीनचा रेशोही चांगला असतो. पीनट, पीनट बटर आणि पीनट ऑईल या तिन्हीचं मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचा चांगला स्त्रोत मानला जातो. 

पीनट बटर तरूण वयात खाल्लाने काय प्रभाव होतो याचा अभ्यास केला असता. भविष्यातील ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. खरंतर पीनट बटर बिगेन ब्रेस्ट डिजीज (BBD) च्या स्थितीला वाढूच देत नाही आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून संरक्षणही होतं. 

 

तळण्यासाठी एकदा वापरलेलं तेल वापरणं आरोग्यासाठी घातक

ब्लड ग्रुपनुसार डाएट फॉलो केल्यास आरोग्याला होतील फायदे

त्वचेसाठी बीट खाण्याचे फायदे (Beetroot Benefits For Skin In Marathi)

Read More From Diet