Diet

चेहऱ्यावर ग्लो आण्यासाठी जाणून घ्या सोयाबीन तेलाचे फायदे (Soybean Oil Benefits In Marathi)

Trupti Paradkar  |  Sep 10, 2019
Soybean Oil Benefits In Marathi

शरीराला इतर खाद्यपदार्थांसोबत तेलाचीदेखील तितकीच गरज असते. भारतीय खाद्यसंस्कृतीत तेल, तूपासारखे सिग्धपदार्थ यासाठीच वापरले जातात. जर शरीराला सिग्धपदार्थ मिळाले नाहीत तर दैनंदिन शारीरिक हालचाली करणंदेखील कठीण जाऊ शकतं. मात्र शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी योग्य प्रमाणात खाद्यतेलाचा वापर स्वयंपाकात करणं फार गरजेचं आहे. मात्र अतीप्रमाणात तेलाचा वापर नुकसानकारक ठरू शकतो. आजकाल बाजारात विविध प्रकारचे खाद्यतेल उपलब्ध असतात. सामान्यपणे शेंगदाणा,सुर्यफूल, करडई, राईसब्रान, जवस, तिळ आणि सोयाबीन तेलाचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. निरोगी शरीरप्रकृती आणि सौंदर्य वाढवण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर आहारात जरूर करा. मात्र त्यासाठी या तेलाचे आरोग्य, सौंदर्य फायदे आणि तोटे जाणून घ्या.

Shutterstock

सोयाबीन ऑईल म्हणजे नेमकं काय (What Is Soybean Oil?)

सोयाबीन तेल हे एक प्रकारचे वनस्पती तेल आहे. सोयाबीन तेल एक थंड गुणधर्म असलेलं खाद्य तेल आहे. खरंतर जगभरात सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलापैकी ते एक आहे. सोयाबीनचे पिक सर्वात आधी पूर्व आशियायी भागात घेण्यास सुरूवात झाली. आता मात्र जगभरात सोयाबीन पिकवले जाते. सोयाबीन ऑईल हे सोयाबीनच्या बियांपासून तयार करण्यात येते. सोयाबीन तेल हे इतर खाद्यतेलांच्या तुलनेत स्वस्त असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखे असते.

सोयाबीन तेलातील पोषक घटक (Nutrients In Soybean Oil)

सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरिज, कार्बोहाडड्रेट, फायबर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक मॅगनिज, फॉलिक अॅसिड, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट असते जे तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच उपयुक्त असते. यामुळे तुमच्या शरीरावर अनेक चांगले फायदे होतात. सोयाबीन तेलाचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन स्वयंपाकात करू शकता. इतर तेलाप्रमाणेच सोयाबीन तेलही तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र कोणतेही तेल स्वयंपाकात प्रमाणातच वापरावे. ज्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. 

 

Shutterstock

सोयाबीन तेलाचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Soybean Oil)

सोयाबीन तेल तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे तुम्ही जर नियमित सोयाबीन तेल आहारात वापरलं तर तुम्हाला त्याचे अनेक चांगले  फायदे मिळू शकतात. सोयाबीन तेलामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

1. पचनसंस्थेचे कार्य सुधारते (Improves Digestive System)

शरीराची पचनसंस्था फार महत्त्वाचे कार्य करत असते. जर तुमची पचनसंस्था सुरळीत सुरू असेल तर तुम्ही निरोगी नक्कीच राहू शकता. पचनसंस्थेचे कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीरात पुरेसे फारबर्स जाणे गरजेचे असते. कारण पाचक फायबर्स मुळे तुम्हाला शौचाला साफ होते. ज्याचा परिणाम  तुमच्या आरोग्यावर होत असतो. सोयाबीन तेल हा सिग्धपदार्थ असूनही त्यामध्ये फायबर्सचे प्रमाण उत्तम असते. यासाठीच आहारात सोयाबीन तेलाचा समावेश जरूर करावा. 

2. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते (Control Cholesterol)

स्वयंपाकात तेलाचा अती वापर केल्यामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत जाते. ज्यामुळे तुमच्या गूड आणि बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात योग्य नियंत्रण राहत नाही. ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये हे बॅड कोलेस्ट्रॉल साचू लागते आणि रक्तवाहिन्यांना त्यांचे कार्य करण्यात अडथळे येऊ लागतात.  रक्तवाहिन्यांना रक्तप्रवाह करण्यात अडचण आल्यामुळे ह्रदयावर ताण येतो आणि ह्दयविकार होण्याची शक्यता असते. मात्र सोयाबीन तेलातील ओमेगा 3 आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड बॅड कोलेस्ट्ऱॉलच्या प्रमाणाला नियंत्रित ठेवते. म्हणूनच सोयाबीन तेल तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. या तेलाच्या वापरामुळे ह्रदयविकार, स्ट्रोक आणि मेंदूचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

3. अल्झायमरपासून बचाव होतो (Prevents Alzheimer’s)

आजकाल जगभरात अल्झायमर हा आजार वाढतच चालला आहे. अल्झायमर होण्याचा धोका वृद्ध लोकांसोबत तरूणपिढीत देखील वाढत आहे. मात्र सोयाबीन तेलातील व्हिटॅमिन के मुळे तुमचे अल्झायमरपासून संरक्षण होऊ शकते. व्हिटॅमिन के फ्री रेडिकल्सच्या विरूद्ध अॅंटि ऑक्सिडंटचे कार्य करतात. ज्यामुळे तुमच्या मेंदूच्या पेशींच्या कार्याला योग्य चालना मिळते. सोयाबीन तेलामुळे तुमच्या मेंदूमधील आकलन शक्ती आणि स्मरणशक्तीला चालना मिळते.

4. हाडांसाठी उपयुक्त (Useful For Bones)

सोयाबीन तेलातीसस व्हिटॅमिन के मुळे तुमची हाडे मजबूत राहण्यास मदत होते. यामुळे व्हिटॅमिन के मध्ये हाडांचा विकास करण्याची आणि हिलिंग करण्याची शक्ती असते. शिवाय या तेलात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. ज्यामुळे जर तुम्हाला हाडांची समस्या अथवा विकार असतील तर सोयाबीन तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. महिला, लहान मुले आणि वृद्धांना या तेलाच्या वापरामुळे नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. 

5. मधुमेहींसाठी फायदेशीर (Beneficial For Diabetes)

मधुमेहींना नेमका कोणता आहार घ्यावा याबाबत नेहमीच शंका असते. कारण मधुमेहामुळे त्यांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्ही सोयाबीन तेल तुमच्या स्वयंपाकात वापरू शकता कारण या  तेलामुळे तुमचा डायबेटिज नियंत्रित राहण्यास मदत होते

6. दृष्टीदोष होतात कमी (Improves Impaired Vision)

सोयाबीन तेलात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे ते तुमच्या डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. सोयाबीन तेलाचा वापर नियमित आहारात केल्यास तुम्हाला दृष्टीदोष होण्याचा धोका कमी होतो. मोतीबिंदू, काचबिंदू सारखे  आजार अथवा दृष्टीदोष नको असतील तर आहारात सोयाबीन तेलाचा वापर जरूर करा. 

7. कॅन्सरपासून होतो बचाव (Cancer Prevention)

सोयाबीन तेलात अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. कॅन्सर आजकाल हा आजार अनेकांना विळखा घालत आहे. या आजारापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. सोयाबीन मधील अॅंटिऑक्सिडंट तुमचे कॅन्सरच्या फ्री रेडिकल्सपासून रक्षण करतात. यासाठीच या तेलाचा वापर संपूर्ण कुटुंबाच्या स्वयंपाकात जरूर करा.

8. महिलांसाठी फायदेशीर (Beneficial For Women)

महिलांना जीवनात अगदी किशोरवयात मासिकपाळी येण्यापासून ते मॅनोपॉजपर्यंत अनेक टप्पे गाठावे लागतात. याकाळात त्यांच्या शरीरात विविध हॉर्मोनल बदल होत असतात. मॅनोपॉजच्या काळात त्यांच्या शरीरातील एस्ट्रोजनचे प्रमाण अचानक वाढू लागते. ज्यामुळे त्यांना हॉट फ्लॅश, मूड स्वींग, चिडचिड, अंगदुखीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र जर तुम्ही आहारात सोयाबीनचा वापर करत असाल तर तुम्हाला मॅनोपॉजवर मात करणं सोपे जाऊ शकतं. 

9. दात चमकदार होतात (Makes Teeth Shiny)

सोयाबीन तेलामुळे तुमच्या दातांचे आरोग्य सुधारते. दात सुंदर दिसण्यासाठी ते पांढरेशुभ्र आणि चमकदार असायला हवे. मात्र दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी ते  स्वच्छ, मजबूत असणं गरजेचं आहे. दातांच्या वरच्या भागाला मजबूत राहण्यासाठी कॅल्शियम आणि प्रोटिन्सची गरज असते. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या दातांचे आरोग्य उत्तम राहते आणि ते चमकदार दिसू लागतात. 

10. अशक्तपणा कमी होतो (Reduces Weakness)

नियमित सोयाबीन तेलाचा वापर केल्यास तुम्हाला अनेक आजारांपासून स्वतःचे संरक्षण करता येते. अॅनिमिया हा एक असा आजार आहे तो शरीरात रक्ताची कमतरता झाल्यामुळे होऊ शकतो. जर तुमच्या शरीरात लोहचे प्रमाण कमी झाले की तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागतो. शाकाहारी आहार घेणारे, महिला अथवा वृद्धांमध्ये अशक्तपणाचा त्रास वारंवार जाणवतो. यासाठी सोयाबीनचा वापर तुमच्या आहारात जरूर करा. कारण सोयाबीनमध्ये लोह पुरेश्या प्रमाणात असते. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणाचा त्रास कमी होऊ शकतो. 

Shutterstock

सोयाबीन तेलाचे त्चचेवर होणारे फायदे (Skin Benefits Of Soybean Oil)

आजकाल वाढते धुळ,प्रदूषण आणि चिंता काळजीचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. मात्र जर तुम्ही योग्य आणि पोषक आहार घेतला तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. सोयाबीन तेलात व्हिटॅमिन ईचे भरपूर प्रमाण असते. ज्यामुळे ते तुमच्या शरीरात एखाद्या शक्तीशाली अॅंटिऑक्सिडंटसारखे कार्य करते. व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेला पिंपल्स, काळे डाग, चट्टे यापासून वाचवते. तुमची त्वचा मऊ आणि मुलायम झाल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि पिगमेंटेशनच्या खुणा दिसत नाहीत. 

shutterstock

सोयाबीन तेलाचा केसांवर होणारा परिणाम (Soybean Oil For Hair)

आजकाल अनेकांना केस वारंवार गळणे, केसात कोंडा होणे, केस पांढरे होणे, केसांना फाटे फुटणे अशा समस्या जाणवत असतात. याचं महत्त्वाचं कारण धुळ, प्रदूषण, अयोग्य आहार आणि वाढणारी चिंता असू शकतं. कारण यामुळे तुमच्या केसांचं नुकसान होत असते. यासाठी आहारात योग्य ते बदल करून तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकता. सोयाबीन तेलामुळे तुमच्या केसांमधील अॅमिनो अॅसिड आणि केरोटिनमध्ये वाढ होते. ज्यामुळे केस मजबूत आणि सुंदर दिसू लागतात. बऱ्याचदा अनेक शॅंपूमध्ये सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. 

Instagram

सोयाबीन तेलामुळे होणारे तोटे (Disadvantages Of Soybean Oil)

सोयाबीन तेल जसे तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी गुणकारी आहे तसंच त्याचा अती वापर तुमच्यासाठी नुकसानकारकही असू शकतो. 

सोयाबीन तेलाबाबत मनत असलेले काही निवडक प्रश्न (FAQ’s)

1. सोयाबीन ऑईलचा वापर खाण्यासाठी कसा करावा ?

सोयाबीन तेलाचा वापर तुम्ही इतर खाद्यतेलाप्रमाणेच स्वयंपाकात फोडणी देण्यासाठी, तळण्यासाठी, शॅलो फ्राय करण्यासाठी करू शकता. इतर खाद्यतेलाप्रमाणे तुम्हाला हवा तसा वापर तुम्ही सोयाबीन तेलाचा करू शकता. मात्र तेल प्रमाणात वापरा ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. 

2. सोयाबीन ऑईल कोणी खाऊ नये ?

कोणतेही खाद्यतेल चांगले अथवा वाईट नसते. तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर तुमचे आरोग्य अवलंबून आहे. सोयाबीन तेलाचा वापर घरातील वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, स्तनपान देणाऱ्या महिलांनी फारच कमी प्रमाणात करावा. कारण यामुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. 

3. सोयाबीन ऑईल कुठे वापरण्यात येते ?

भारतीय स्वयंपाक घरात सोयाबीन तेल स्वयंपाकासाठी वापरण्यात येते. सोयाबीन तेल हे एक खाद्यतेल असल्यामुळे तुम्ही ते तुमच्या आहारात नक्कीच वापरू शकता. 

 

Read More From Diet