Table of Contents
महाराष्ट्र हा डोंगर दऱ्या आणि समुद्रकिनाऱ्यांनी नटलेला आहे. मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्राला खूप सुंदर समुद्रकिनारे लाभलेले आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नेहमीच्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढून असं शांत आणि सुंदर समुद्रकिनारी फिरायला नक्कीच आवडतं आणि कधी मुलांच्या सुट्टीत तर कधी आपण आपल्यासाठी सुट्टी काढून विविध ठिकाणी फिरायला जात असतो. पण खरं तर बऱ्याच जणांना काही समुद्रकिनारे सोडले तर कोणत्या समुद्रकिनाऱ्यांना भेट द्यायची याची योग्य माहिती नसते. आपल्याला फक्त जागा माहीत असतात. पण तिथे कसं जायचं अथवा तिथला परिसर आणि ते समुद्रकिनारे कसे आहेत याची काहीच कल्पना नसते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी खास महाराष्ट्रातील सुंदर आणि अप्रतिम समुद्रकिनाऱ्यांची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हीदेखील ही माहिती वाचल्यानंतर लगेचच मस्तपैकी आपल्या सुट्टीचा प्लॅन बनवा आणि या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर आपल्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटा.
महाराष्ट्रातील 25 समुद्रकिनारे जिथे तुम्ही कराल सुट्टी एन्जॉय (Beaches In Maharashtra)
महाराष्ट्रात अनेक समुद्रकिनारे आहेत. त्यापैकी 25 समुद्रकिनाऱ्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला यापैकी नक्की कोणता आवडतोय हे पाहा आणि निवडून जाण्याच्या तयारीला नक्की लागा.
महाराष्ट्रात फिरा मनसोक्त, जाणून घ्या वैशिष्ट्य
1. अलिबाग (Alibaug Beach)
अलिबाग हे तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेलं आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या अलिबागमध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारे असून महाराष्ट्राचे गोवा म्हणून हे प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील मुख्य नौदल अधिकारी असणारे कान्होजी आंग्रे यांनी 17 व्या शतकात अलिबागचा शोध लावला. त्यावेळी याची ओळख कुलाबा अशी होती. अलिबागचा इतिहास खूप मोठा आहे. अलिबागच्या या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही खूपच मजा करू शकता शिवाय तुम्ही अलिबागच्या या किनाऱ्याच्या मधोमध असणाऱ्या किल्ल्यावरही तुम्ही जाऊ शकता.
- कसं जायचं – मुंबईपासून गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाण्यासाठी लाँच असतात अथवा मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता
- जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
- पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
- आकर्षण – समुद्रकिनारा, किल्ला, हॉर्स रायडिंग, बोटिंग
- किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
2. गणपतीपुळे (Ganpatipule Beach)
साधारण 1600 वर्षांपूर्वी समुद्रकिनाऱ्यावर निर्माण झालेलं हे स्वयंभू गणपतीमंदीर येथील वैशिष्ट्य आहे. याचं पश्चिम द्वार असल्यामुळे हे याचं वैशिष्ट्य ठरतं. हा समुद्रकिनारा खूपच सुंदर असून गणपतीचं मंदीर असल्यामुळे याला पवित्र ठिकाण मानलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही पांढरी असल्यामुळेच याला गणपतीपुळे असं नाव देण्यात आलं आहे.
- कसं जायचं – मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता
- जायचा योग्य काळ – सप्टेंबर ते फेब्रुवारी
- पिक सीझन – नोव्हेंबर ते जानेवारी
- आकर्षण – समुद्रकिनारा, जयगड किल्ला, हॉर्स रायडिंग, बोटिंग, मंदिर, प्राचीन कोकण म्युझियम
- किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
वाचा- महाराष्ट्राची शान आहे 15 महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे
3. रत्नागिरी (Ratnagiri Beach)
रत्नागिरीमध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. मुळात या समुद्रकिनारे आणि रत्नागिरीलाही इतिहास लाभला आहे. स्वच्छ पाणी असलेला रत्नागिरीचा समुद्रकिनारा हेच इथलं वैशिष्ट्य आहे. आजकाल या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा ओढाही वाढला आहे. अतिशय शांत आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी घालवणं यासारखा दुसरा आनंद नाही.
- कसं जायचं – मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. ट्रेनेनदेखील तुम्ही रत्नागिरी स्टेशनवर उतरून नंतर रिक्षा करून पुढे जाऊ शकता.
- जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते फेब्रुवारी
- पिक सीझन – नोव्हेंबर ते जानेवारी
- आकर्षण – भाट्ये समुद्रकिनारा, पावस मठ, पूर्णगड किल्ला, सूर्यमंदीर कशेळी, महाकाली मंदीर आडिवरे, लोकमान्य टिळक यांचं घर, म्युझियम
- किती दिवस राहावं – दोन ते पाच दिवस
वाचा – Historical Tourist Places In Maharashtra In Marathi
4. काशिद (Kashid Beach)
पांढरी वाळू असलेला हा समुद्रकिनारा अलिबागमधील आकर्षण आहे. कितीही पर्यटकांनी भरलेला असला तरीही हा समुद्रकिनारा अतिशय शांत असतो. या समुद्रकिनाऱ्यावरील पाणीही तितकंच स्वच्छ आहे. शहरापासून दूर मजा करण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी हा किनारा अप्रतिम आहे. अलिबागमध्ये जास्तीत जास्त पर्टयक याच किनाऱ्यावर येतात. तसंच मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणापासून अंतर कमी असल्यामुळे दोन दिवसात पटकन जाऊन येता येतं.
- कसं जायचं – मुंबईपासून गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाण्यासाठी लाँच असतात अथवा मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. अलिबागवरून बस अथवा रिक्षा मिळतात.
- जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
- पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
- आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग, बिर्ला मंदीर
- किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
वाचा – महाराष्ट्रातील किल्ले, ऐतिहासिक स्थळे आणि वारसा स्थळ
5. गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpaty)
मुंबईतील सर्वात मोठा समुद्रकिनारी भाग म्हणून याची ओळख आहे. सुट्टीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर लोकांचा मेळा असतो. बाहेरगावाहूनही लोक खास गिरगाव चौपाटी पाहण्यासाठी येतात. इथले स्टॉल्स ही इथली खासियत आहे. शिवाय याला लागूनच असणारं मरिन ड्राईव्ह याची शोभा अजून वाढवतं. गिरगाव चौपाटी ही मुंबईची शान म्हटली जाते.
- कसं जायचं – बस अथवा टॅक्सी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ट्रेन हादेखील पर्याय आहे.
- जायचा योग्य काळ – वर्षभर
- पिक सीझन – वर्षभर
- आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग, विविध पदार्थांची रेलचेल
- किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
6. वेळास (Velas Beach)
श्रीवर्धन भागाजवळ असणारा वेळास हा समुद्रकिनारा शांतताप्रिय असा आहे. तुम्हाला जर धावपळीच्या आयुष्यात छान आराम करायला आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायला जायचं असेल तर तुम्ही वेळासच्या समुद्रकिनाऱ्याला नक्कीच भेट द्यायला हवी. पोहण्यासाठी हा समुद्रकिनारा उत्तम असून इथे छान फिरताही येतं. तसंच सकाळची सूर्याची किरणं घेत सनबाथिंग करायलाही इथे मजा येते.
- कसं जायचं – मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता.
- जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
- पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
- आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग
- किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
7. गुहागर (Guhagar Beach)
महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असा हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आकर्षण आहे. साधारण सहा किलोमीटर इतका लांब असणारा हा समुद्रकिनारा गुहागर बस स्टँडपासून काही अंतरावरच आहे. सुरूची झाडं आणि पांढरी वाळू असणारा हा समुद्रकिनारा नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या समुद्रकिनाऱ्यावर पोहायला जाण्यासाठी अनेक जण येतात.
- कसं जायचं – मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता.
- जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
- पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
- आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग, स्विमिंग
- किती दिवस राहावं – दोन ते तीन दिवस
वाचा – महाराष्ट्राची शान असलेले महाराष्ट्रातील किल्ले
8. श्रीवर्धन (Shrivardhan Beach)
अतिशय शांत आणि रम्य असणारा हा समुद्रकिनाराही त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला फेसाळ लाटांमध्ये फिरायला खूपच मजा येते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. इथून दिसणारा सूर्यास्त हा अप्रतिम असतो. अर्थात सर्वच समुद्रकिनाऱ्यांवरून सूर्यास्त चांगला दिसतो पण श्रीवर्धन किनाऱ्यावरून समुद्राच्या काठावरून पाहण्यात एक वेगळीच मजा आहे.
- कसं जायचं – मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता.
- जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
- पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
- आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग, पॅराग्लायडिंग, स्विमिंग
- किती दिवस राहावं – दोन ते तीन दिवस
9. हरिहरेश्वर (Harihareshwar Beach)
चिंचोळे रस्ते, अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव आणि समुद्राची कानी पडणारी गाज. या गावात पोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो. तसंही मुंबईकरांना गर्दीतून सुटका हवी असतेच. आता प्रत्येक घरात या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं याचं प्लॅनिंग झालं असेल किंवा सुरू असेल. दरवर्षी कुटुंबाला एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला नेणं जरा कठीणच आणि रिसोर्ट्स पिकनिक्सचाही कंटाळा आला असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी.
- कसं जायचं – हरिहरेश्वर हे मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव आहे. जे इथून जवळपास 60km अंतरावर आहे. एसटीच्या अनेक बसेस हरिहरेश्वरला जातात. तसंच तुम्ही खाजगी वाहनानेही इथे पोचू शकता. हरिहरेश्वरमध्ये अजून जास्त हॉटेल्स नाहीत पण तुम्ही होम स्टेचा पर्याय घेऊ शकता, जो चांगला आणि स्वस्तही आहे. एमटीडीसीची कॉटेजेस आहेत. हरिहरेश्वराला कधीही वर्षभरात कधीही भेट देऊ शकता पण जास्त उन्हाळा असल्यास मात्र टाळा.
- योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
- पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
- आकर्षण – काळभैरव मंदीर, हरिहरेश्वर समुद्रकिनारा, बागमंडला
- किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
10. मुरूड (Murud Beach)
अलिबागमधील मुरूड जंजिरा हा अतिशय प्रसिद्ध भाग आहे. या समुद्राच्या मधोमध असणारा किल्ला हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून असणाऱ्या या किल्ल्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या किनाऱ्यावरील काळी पण मऊशार वाळू पर्यटकांचं लक्ष वेधून घेते. तसंच इथे तुम्हाला फिरण्यासारखंही बरंच काही आहे.
कसं जायचं – मुंबईपासून गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाण्यासाठी लाँच असतात अथवा मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. अलिबागवरून बस अथवा रिक्षा मिळतात.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग, मुरुड जंजिरा किल्ला
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
11. गणेशगुळे (Ganeshgule Beach)
दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र असा गणेशगुळेचा परिसर आहे. त्यामुळे इथला सूर्यास्त खूपच प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असणारा हा समुद्रकिनारा अतिशय शांत आणि तितकाच स्वच्छ आहे. ज्यांना आपली सुट्टी खूपच शांततेमध्ये घालवण्याची इच्छा आहे त्यांनी या समुद्रकिनाऱ्याला नक्कीच भेट द्यायला हवी.
कसं जायचं – मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. ट्रेनेनदेखील तुम्ही रत्नागिरी स्टेशनवर उतरून नंतर रिक्षा करून पुढे जाऊ शकता.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते फेब्रुवारी
पिक सीझन – नोव्हेंबर ते जानेवारी
आकर्षण – डायव्हिंग, सर्फिंग, पॅरासेलिंग, बोटिंग, आऊटिंग
किती दिवस राहावं – दोन ते पाच दिवस
12. हेदवी (Hedvi Beach)
हेदवीचा गणपती प्रसिद्ध तर आहेच. पण त्याचबरोबर इथला समुद्रकिनाराही प्रसिद्ध आहे. कोकणामधील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हे एक असून पवित्र स्थान समजलं जातं. इथे दशभुज गणपती मंदीर असून अनेक पर्यटकांची गर्दी असते. काश्मीरमधून आणलेल्या पांढऱ्या मार्बलने पेशव्यांच्या काळात इथलं मंदीर बांधण्यात आलं आहे. या मंदीरापासून 3 किलोमीटर अंतरावरील हा समुद्र तुम्हाला आपलंसं करून घेतो. इथल्या दगडांवरून बसून येणाऱ्या लाटांची मजा घेणं हा तुमच्या सुट्टीचा सर्वात मोठा आनंद आहे.
कसं जायचं – मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. ट्रेनेनदेखील तुम्ही रत्नागिरी स्टेशनवर उतरून नंतर रिक्षा करून पुढे जाऊ शकता.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते फेब्रुवारी
पिक सीझन – नोव्हेंबर ते जानेवारी
आकर्षण – आऊटिंग, हेदवी मंदीर, दशभुज गणेश मंदीर
किती दिवस राहावं – दोन ते पाच दिवस
13. जुहू (Juhu Beach)
मुंबईत आल्यानंतर जुहू किनारा पाहिला नाही असं कधीच होत नाही. मुंबई ही जुहू किनाऱ्यासाठीही प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या आसपास अनेक कलाकारांचे बंगले असल्यामुळेही ही जागा प्रसिद्ध आहे. शिवाय इथे मिळणाऱ्या पाणी पुरी, पावभाजी स्टॉल्समुळेही जुहूचा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. प्रत्येकाला एकदा तरी या किनाऱ्यावर येऊन तो पाहून जाण्याची इच्छा असतेच.
कसं जायचं – बस अथवा टॅक्सी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ट्रेन हादेखील पर्याय आहे.
जायचा योग्य काळ – वर्षभर
पिक सीझन – वर्षभर
आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग, विविध पदार्थांची रेलचेल
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
14. वर्सोवा (Varsova Beach)
वर्सोवाचा समुद्रकिनारा हा खरंतर मुंबईतील उपनगरातील एक भाग आहे. या ठिकाणी बऱ्याचदा फिश फेस्टिव्हल भरवला जातो. त्यामुळे मासेप्रेमींसाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. इथे बऱ्याच चित्रपटांचं चित्रीकरणही करण्यात येतं.
कसं जायचं – बस अथवा टॅक्सी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ट्रेन, मेट्रो हादेखील पर्याय आहे.
जायचा योग्य काळ – वर्षभर
पिक सीझन – वर्षभर
आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
15. अक्सा (Aksa Beach)
मुंबईतील मालाडमधील मालवणीमध्ये असणारा अक्सा बीच हा फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईतील स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. अक्सावर नेहमी माणसांची वर्दळ असते. इथे बऱ्याचदा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी पर्यटक येत असतात. इथे राहण्यासाठी अनेक कॉटेजेसचीही व्यवस्था आहे.
कसं जायचं – बस अथवा टॅक्सी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ट्रेन, बस हादेखील पर्याय आहे.
जायचा योग्य काळ – वर्षभर
पिक सीझन – वर्षभर
आकर्षण – समुद्रकिनारा, हॉर्स रायडिंग, बोटिंग, आऊटिंग
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
16. दानापानी (Danapani Beach)
अक्सा बीचला लागून असणारा दानापानी समुद्रकिनारा हा मुंबईत राहणाऱ्या लोकांनाही जास्त माहीत नाही. हा अतिशय स्वच्छ असून मालाडजवळ असणारे कोळी या समुद्रकिनाऱ्याची व्यवस्था राखतात. त्यामुळे हा किनारा अतिशय स्वच्छ आहे. तुम्हाला शांतता हवी असल्यास तुम्ही या समुद्रकिनाऱ्याची निवड करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणत्याही प्रकारच्या बोटिंग, हॉर्स रायडिंग अशा अॅक्टिव्हिटी होत नसल्यामुळे तुम्हाला खूपच शांतता इथे मिळते.
कसं जायचं – बस अथवा टॅक्सी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ट्रेन, बस हादेखील पर्याय आहे.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते फेब्रुवारी
पिक सीझन – नोव्हेंबर ते जानेवारी
आकर्षण – समुद्रकिनारा
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
17. गोराई (Gorai Beach)
बोरीवलीजवळ असणारा गोराई हा समुद्रकिनारा स्वच्छ असून तुम्ही नेहमीच्या धावपळीत वेळ काढून इथे जाऊ शकता. मुंबईत अगदी एका दिवसात जाऊन येणारा हा समुद्रकिनारा असल्यामुळे सुट्टी घेण्याची वेगळी गरजही भासत नाही. तुम्ही एक दिवसाच्या पिकनिकसाठीदेखील याठिकाणी जाऊन येऊ शकता. इथे राहण्याचीही सोय आहे. त्यामुळे तुम्हाला जर तिथल्या तिथे दिवस वाढवावेसे वाटले तर तुम्ही या ठिकाणी राहू शकता.
कसं जायचं – बस अथवा टॅक्सी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी ट्रेन, बस हादेखील पर्याय आहे.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते फेब्रुवारी
पिक सीझन – नोव्हेंबर ते जानेवारी
आकर्षण – समुद्रकिनारा
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
18. रेवदंडा (Revdanda Beach)
पोर्तुगीजांच्या काळापासून असणारा अलिबागमधील रेवदंडा समुद्रकिनाऱ्याला इतिहास लाभलेला आहे. समुद्रकिनाऱ्यासह इथला किल्लाही तितकाच प्रसिद्ध आहे. काळ्या वाळूने या किनाऱ्याला अधिक शोभा येते. इतकंच नाही तर समुद्रकिनाऱ्यालगत असणारा हा किल्ला अधिक सुंदर दिसतो.
कसं जायचं – मुंबईपासून गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाण्यासाठी लाँच असतात अथवा मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. अलिबागवरून बस अथवा रिक्षा मिळतात.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
आकर्षण – समुद्रकिनारा, बोटिंग, आऊटिंग, रेवदंडा किल्ला
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
19. आरेवारे (Areware Beach)
रत्नागिरी जिल्ह्यातील हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ असून याचं निळशार पाणी हे वैशिष्ट्य आहे. इथे जास्त गर्दी नसल्यामुळे शांतता आजही टिकून आहे. सुरूच्या झाडांनी वेढलेला हा समुद्रकिनारा तुम्हाला तुमच्या धावपळीच्या आयुष्यात नक्कीच शांतता मिळवून देतो. इथून दिसणारा नयनरम्य नजारा हे इथले वैशिष्ट्य आहे.
कसं जायचं – मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. ट्रेनेनदेखील तुम्ही रत्नागिरी स्टेशनवर उतरून नंतर रिक्षा करून पुढे जाऊ शकता.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते फेब्रुवारी
पिक सीझन – नोव्हेंबर ते जानेवारी
आकर्षण – आऊटिंग, पनोरमा व्ह्यू
किती दिवस राहावं – दोन ते पाच दिवस
20. आक्षी (Akshi Beach)
तुम्हाला आपल्या माणसांसाठी काही दिवस आणि वेळ काढायचा असेल तर तुम्ही नक्कीच या समुद्रकिनाऱ्याची निवड करू शकता. नागाव आणि अलिबाग या दोन ठिकाणांच्या मध्ये आक्षी समुद्रकिनारा पसरलेला आहे. शिवाय अजूनही आक्षीवर म्हणावं तितका पर्यटक जात नसल्यामुळे इथे अतिशय तुम्हाला मनाला हवी तशी शांतता लाभते. किनाऱ्यावर बसून लाटांचा आवाज ऐकत तुम्ही इथे पूर्ण दिवस घालवू शकता.
कसं जायचं – मुंबईपासून गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाण्यासाठी लाँच असतात अथवा मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. अलिबागवरून बस अथवा रिक्षा मिळतात.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
आकर्षण – समुद्रकिनारा, आऊटिंग,
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
21. मालवण (Malvan Beach)
एखाद्या चित्रामध्ये दिसणारे समुद्रकिनारे मालवण तुम्हाला पाहायला मिळतात. मालवण ही कोकणची शान आहे. आता या ठिकाणी बॅकवॉटर अॅक्टिव्हिटीजदेखील पर्यटकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर मालवणच्या आसपास फिरण्याचीही अनेक ठिकाणं आहेत. चार दिवसांची एक चांगली पिकनिक तुम्ही इथे करून येऊ शकता. खरं तर इथले समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ असून इथे तुम्हाला कधीही गर्दी दिसणार नाही. कोणताही कलकलाट नाही. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणं अर्थात तुमचा थकवा घालवणं.
कसं जायचं – गाडीने जाता येतं अथवा अनेक बसचीदेखील सोय आहे. पटकन पोहचायचं असल्यास, ट्रेन अर्थात एक्स्प्रेस हा उत्तम पर्याय आहे. अगदी परवड्याजोगी पिकनिक होते.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
आकर्षण – तारकर्ली बीच, मालवण समुद्रकिनारा, रॉक गार्डन, देवबाग समुद्रकिनारा, मालवण मरीन सँक्च्युरी, सिंधुदुर्ग किल्ला
किती दिवस राहावं – दोन ते पाच दिवस
22. लाडघर (Ladghar Beach)
दापोलीमध्ये स्थित असलेला लाडघर समुद्रकिनारा हादेखील स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. इथे गर्दी असली तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी याठिकाणी नक्कीच फिरायला जाऊ शकता. दापोली हे सुंदर असून कोकणातील हे फिरण्यासाठी अप्रतिम ठिकाण आहे.
कसं जायचं – गाडीने जाता येतं अथवा अनेक बसचीदेखील सोय आहे. पटकन पोहचायचं असल्यास, ट्रेन अर्थात एक्स्प्रेस हा उत्तम पर्याय आहे. अगदी परवड्याजोगी पिकनिक होते.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
आकर्षण – हॉर्स रायडिंग, समुद्रकिनारा, आऊटिंग
किती दिवस राहावं – दोन ते पाच दिवस
23. आंजर्ले (Anjarle Beach)
निळंशार पाणी आणि पांढरी वाळू यासाठी अलिबागच्या जवळ असणारा हा आंजर्ले समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. इथलं वातावरण हे तुमचं मन प्रसन्न करणारं असून तुमच्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा एक शांत वातावरण तुम्हाला इथे मिळतं. पक्षीप्रेमींसाठी हा परिसर खूपच सुंदर आहे. कारण इथे विविध प्रकारचे पक्षी आणि त्यांचे आवाज तुम्हाला सकाळपासून अनुभवायला मिळतात.
कसं जायचं – मुंबईपासून गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाण्यासाठी लाँच असतात अथवा मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. अलिबागवरून बस अथवा रिक्षा मिळतात.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
आकर्षण – समुद्रकिनारा, आऊटिंग, पक्षीप्रेमींसाठी अभ्यास करण्यासाठी, स्विमिंग, पॅरासेलिंग, सर्फिंग
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
24. नागाव (Nagaon Beach)
अलिबागपासून जवळ असणारा नागाव समुद्रकिनारा खूपच प्रसिद्ध आहे. इथे नेहमीच पर्यंटकांची गर्दी असते. हा किनारा स्वच्छ आणि मोठा असल्यामुळेच इथे नेहमी पर्यटक येत असतात.
कसं जायचं – मुंबईपासून गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाण्यासाठी लाँच असतात अथवा मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. अलिबागवरून बस अथवा रिक्षा मिळतात.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
आकर्षण – समुद्रकिनारा, आऊटिंग, स्विमिंग, बोटिंग, सर्फिंग
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
25. मांडवा (Mandwa Beach)
रायगड जिल्ह्यातील मांडवा समुद्रकिनारा हा इथल्या शांततेसाठी प्रसिद्ध आहे. इथून दिसणारा सूर्यास्त इथले महत्त्वाचे आकर्षण आहे. तसंच मांडवा ही जेट्टी असल्यामुळे इथे कायम लोकांची वर्दळ असते. इथले चर्च, बुद्ध लेणी यादेखील खूपच प्रसिद्ध आहेत.
कसं जायचं – मुंबईपासून गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागला जाण्यासाठी लाँच असतात अथवा मुंबई सेंट्रलवरून तुम्ही बस अथवा एसटीने जाऊ शकता. गाडीनेही जाऊ शकता. अलिबागवरून बस अथवा रिक्षा मिळतात.
जायचा योग्य काळ – ऑक्टोबर ते मार्च
पिक सीझन – नोव्हेंबर ते फेब्रुवारी
आकर्षण – समुद्रकिनारा, आऊटिंग, स्विमिंग, बोटिंग, सर्फिंग, बुद्ध लेणी, जेट्टी, चर्च, चौल चौपाटी
किती दिवस राहावं – एक ते दोन दिवस
मग एक मे ला उन्हाळ्याची सुट्टी झाली की, महाराष्ट्र दिन शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पोचा आणि महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळांचा आस्वाद घ्या.
हेदेखील वाचा
मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स (Fashion Streets in Mumbai)
महाराष्ट्रात फिरा मनसोक्त, जाणून घ्या वैशिष्ट्य
पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं
भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं (India Best Trekking In Marathi)