Make Up Products

भारतीय त्वचेसाठी सर्वोत्तम कन्सिलर (Best Concealer For Indian Skin)

Trupti Paradkar  |  Jul 21, 2020
भारतीय त्वचेसाठी सर्वोत्तम कन्सिलर (Best Concealer For Indian Skin)

कन्सिलर (Concealer) हे मेकअपसाठी लागणारं एक महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे. कारण कन्सिलरमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग, काळे व्रण, डार्क सर्कल्स लपवणं सोपं जातं. शिवाय यामुळे तुमचा स्कीन टोन एकसमान दिसू शकतो. मेकअप करताना चांगला लुक मिळवण्यासाठी स्कीन टोन करेक्ट करणं गरजेचं असतं. फाऊंडेशन लावण्याआधी कन्सिलरचा वापरल्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला इफेक्ट मिळू शकतो. गुळगुळीत आणि मऊ त्वचेसाठी फाऊंडेशन उत्पादनांचा वापर करा. मात्र कन्सिलर वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमचा स्कीन टोन माहीत असायला हवा.  कारण बाजारात विविध प्रकारचे आणि विविध रंगाचे कन्सिलर उपलब्ध असतात. भारतीय त्वचेसाठी उपयुक्त असे काही कन्सिलर्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 

M.A.C Pro Longwear Concealer

मॅक कंपनी मेकअप उत्पादनातील एक लोकप्रिय कंपनी आहे. जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी प्रोफेशनल मेकअप मेकअप करायचा असेल तर मॅकचं हे लिक्विड स्वरूपातील कन्सिलर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण यामुळे तुम्हाला फुल कव्हरेज मिळु शकतो. हे कन्सिलर तुमच्या चेहऱ्यावर पंधरा तासांच्यापेक्षा जास्त काळ टिकतं. शिवाय हे एक लाईटवेट उत्पादन असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला नॅचरल मॅट फिनिश लुक मिळतो. शिवाय घामामुळेही हे खराब होत नाही असा कंपनी दावा करते. 

फायदे:

तोटे:

L’Oreal Paris True Match Super-Blendable Concealer

लॉरिअल कंपनीचे हे कन्सिलर त्वचेमध्ये लवकर ब्लेंड होते. ज्यामुळे ते त्वचेत त्वरीत मुरतं आणि त्वचेवरील सर्व डाग, व्रण, काळेपणा झाकला जातो. ज्यामुळे तुम्हाला मेकअपसाठी हवा तसा परफेक्ट आणि एकसमान स्कीन टोन मिळतो. या कन्सिलरमुळे तुमचे त्वचेतील पोअर्स बंद होत नाहीत. शिवाय ते ऑईलफ्री असल्यामुळे तुमची त्वचा तेलकटही होत नाही. शिवाय याची निर्मिती खास भारतीय स्कीन टोनचा विचार करूनच तयार करण्यात आलेली आहे. 

फायदे:

तोटे:

Maybelline New York Fit Me Concealer

मेबिलिन कंपनीने असा दावा केला आहे की या कन्सिलरमुळे तुम्हाला तुमचा नॅचरल लुक मिळू शकतो. ते भारतीय स्कीन टोनला मॅच होणारे असल्यामुळे या कन्सिलरमुळे तुम्हाला एक नैसर्गिक आणि फ्रेश लुक मिळू शकतो. ते तुमच्या चेहऱ्यावरील सर्व डाग, काळेपणा आणि डार्क सर्कल्स झाकण्यासाठी उपयुक्त आहे. ज्यामुळे तुमचा स्कीन टोन नॅचरल दिसण्यास मदत होते.

फायदे:

तोटे:

Lakme Absolute White Intense Concealer Stick

लॅक्मेचे हे कन्सिलर स्टिक स्वरूपात उपलब्ध आहे. जे भारतीयांच्या  तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेचा विचार करून तयार करण्यात आले आहे.  या कन्सिलरमध्ये व्हिटॅमिन B3 आणि SPF 20 चा वापर करण्यात आलेला आहे. लॅक्मेचे हे स्टिक कन्सिलर चेहऱ्यावरून ओघळत नाही अथवा लवकर खराब होत नाही. चेहऱ्यावरील काळे डाग आणि व्रण झाकण्यासाठी उत्तम आहे. डार्क सर्कल्सदेखील चांगल्या पद्धतीने झाकता येऊ शकतात. 

फायदे:

तोटे:

Revlon Colorstay Concealer

रेव्हलॉन कंपनीच्या या लिक्विड बेस कन्सिलरमध्ये त्वचेत लवकर मुरणारं आणि त्वचेला मऊ करणारा फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. कंपनी असा दावा करते की हे कन्सिलर तुमच्या त्वचेवर कमीत कमी सोळा तास टिकू शकतं. शिवाय ते लाईटवेट असून कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. तेव्हा तुम्हाला जर तुमच्या त्वचेसाठी परफेक्ट कन्सिलर हवं असेल तर हे उत्पादन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. 

फायदे:

तोटे:

Maybelline Dream Lumi Touch Highlighting Concealer

भारतीय त्वचेततील नैसर्गिक चमक आणि स्कीन टोनसाठी हे कन्सिलर अगदी परफेक्ट आहे. याील क्रिमी, जेल बेस आणि वेटलेस फॉर्म्युलामुळे तुमच्या त्वचेवर ते व्यवस्थित मुरतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग, व्रण. पिगमेंटेन झाकलं जातं. यात असे घटक वापरण्यात आले आहेत ज्यामुळे तुमच्या स्कीन टोनला ते योग्य प्रकारे मॅच होतात. 

फायदे:

तोटे:

Lotus Herbals Naturalblend Swift Makeup Stick SPF15 Concealer

लोटस कंपनीचे हे कन्सिलर आयुर्वेदिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेलं आहे. ज्यामुळे ते भारतीय त्वचेसाठी वापरणं नक्कीच योग्य आहे. स्टिक स्वरूपातील हे कन्सिलर तुम्ही एखाद्या फाऊंडेशनप्रमाणेही वापरू शकता. शिवाय यामध्ये SPF 15 फार्म्युला वापरण्यात आलेला असल्यामुळे तुमच्या  त्वचेचं सुर्यप्रकाशापासून संरक्षण होतं. ते स्मुथ असल्यामुळे तुमच्या त्वचेत लगेच मुरतं आणि तुमचा  स्कीन टोन एकसमान दिसू लागतो. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स बंद होत नाहीत.

फायदे:

तोटे:

Colorbar Full Cover Makeup Stick

कलर बारचं ऑईल-फ्री  आणि नॉन ग्रेसी फॉर्म्युला वापरून करण्यात  आलेलं हे कन्सिलर तुम्ही मेकअपसाठी नक्कीच वापरू शकता. कारण ते वापरणं अगदी सोपं आहे. यामुळे तुम्हारा मॅट फिनिश लुक मिळतो. या  कन्सिलरमुळे तुमच्या त्वचेतील पोअर्स बंद होत नाहीत. तुम्ही फ्रेश आणि टवटवीत दिसता. शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि काळवंडलेली त्वचा झाकली जाते. 

फायदे:

तोटे:

M.A.C Studio Finish SPF 35 Concealer

मॅक कंपनीच्या कंन्सिलर पॅलेटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या स्कीन टोनसाठी शेड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रोफेशनल मेकअपसाठी हे उत्पादन अगदी परफेक्ट ठरते. फुल कव्हरेज देणारं हे कन्सिलर वापरणे अतिशय सोपं आहे. लाईटवेट असल्यामुळे ते तुमच्या त्वचेत सहज मुरते आणि तुम्हाला नॅचरल लुक मिळतो. शिवाय त्यामध्ये असलेल्या SPF 30 या फॉर्म्युलामुळे सुर्यप्रकाशातील अतिनिल किरणांपासून पासून तुमचे संरक्षण होते. यात व्हिटॅमिन ए आणि ईचा वापर केलेला असल्यामुळे तुमच्या त्वचेला मऊपणादेखील मिळतो.

फायदे:

तोटे

NYX Professional Makeup Concealer Jar Orange

एनवायएस्कचं हे कन्सिलर दहा प्रकारच्या विविध शेडमध्ये उपलब्ध आहे. वॉटरप्रूफ असल्यामुळे तुम्ही ते दैनंदिन मेकअपसाठीदेखील वापरू शकता. यामुळे तुम्हाला फुल कव्हरेज मिळू शकते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सर्व डाग आणि व्रण झाकले जातात. या कन्सिलरमुळे तुम्हाला नैसर्गिक लुक मिळू शकतो. कोरड्या त्वचेसाठी हे एक उत्तम कन्सिलर आहे. 

फायदे:

तोटे:

कन्सिलर बाबत काही निवडक प्रश्न (FAQs)

1. त्वचेवर आधी फाऊंडेशन लावावं की कन्सिलर ?

फाऊंडेशन आणि कन्सिलर एकसारखं दिसत असल्यामुळे बऱ्याचदा महिलांना हा प्रश्न पडतो. मात्र लक्षात ठेवा असा कोणताही नियम नाही की आधी काय लावावं. मात्र सर्वात आधी फाऊंडेशनच लावणं फायद्याचं ठरू शकतं. त्यानंतर गरज असेल तिथे तुम्ही कन्सिलर लावू शकता. शिवाय कन्सिलर लावल्यानंतर फाऊंडेशन लावताना कन्सिलर पुसलं जाण्याची शक्यता अधिक असू शकते. मात्र तुम्ही तुमच्या गरजेनुसार दोन्ही गोष्टींचा वापर करू शकता.

2. डार्क सर्कल्स असल्यास योग्य कन्सिलरची शेड कशी निवडावी ?

डार्क सर्कल्सवर कन्सिलर निवडण्यासाठी तुमच्या स्कीन टोनपेक्षा एक ते दोन शेड हलक्या रंगाची शेड तुम्हाला निवडावी लागेल. 

3. त्वचेवर थेट कन्सिलरचा वापर करणं योग्य आहे का?

मुळीच नाही. कारण कन्सिलर अथवा कोणतेही मेकअरचे प्रॉडक्ट लावण्यापूर्वी तुम्हाला तुमची त्वचा मॉश्चराईझ करण्याची गरज असते. यासाठी कन्सिलर लावण्याआधी त्वचेवर मॉश्चराईझर लावा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन (Best Foundation For Oily Skin In Marathi)

केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)

निरनिराळ्या फेस शेपसाठी ट्राय करा ‘या’ मेकअप टीप्स

Read More From Make Up Products