शारीरिक उंची हा प्रत्येकासाठी नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. कारण ज्यांची उंची कमी असते अशा लोकांना नेहमी इतरांनाकडून हिणवलं जातं. लोकांच्या अशा वागण्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्यामध्ये कमी आहे अशी भावना त्यांच्या मनात सतत निर्माण होत राहते. उंची वाढवण्यासाठी बाजारात अनेक सप्लीमेंट मिळतात. मात्र तुमची उंची ही तुमच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असते. एका ठराविक काळापर्यंत आपली उंची वाढत असते. आहार आणि व्यायाम शरीराच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो आणि उंची वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय ही आहेत. म्हणूनच योग्य वेळी आहारात चांगले बदल करून तुम्ही तुमची उंची नक्कीच वाढवू शकता.
किशोरवयात मुलांना पोषक आणि संतुलित आहार देणं फार गरजेचं आहे. किशोरवयात मुलांची तुमची उंची आणि शरीरात होणाऱ्या बदलावरून त्यांच्या शरीराचा विकास कसा होत आहे हे समजू शकते. या वयात पोषक आहार, नियमित व्यायाम आणि शांत झोप अशी जीवनशैली असेल तर उंची वाढण्यास मदतच होऊ शकते. यासाठीच तरूण मुलामुलींच्या आहारात योग्य प्रमाणात मिनरल्स, प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स असतील तर त्यामुळे तुमची उंची नक्कीच वाढू शकते. पण जर योग्य वयात जर शरीराला हे पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळाले नाहीत तर तुमच्या शरीराची वाढ खुंटते आणि तुमची उंची कमीच राहते.
प्रोटिन्स –
शरीराची वाढ आणि योग्य विकास होण्यासाठी आहारात प्रोटिनयुक्त पदार्थ असावेत. कारण यामुळे तुमच्या शरीरातील विविध पेशी आणि टिश्यूची निर्मिती होत असते. या पेशी आणि टिश्यूजची व्यवस्थित वाढ झाली तर तुमची उंची वाढण्यासाठी मदतच होते. शरीरातील हाडे, स्नायू, टीश्यूज, अवयव, त्वचा आणि दातांची वाढ होण्यासाठी प्रोटिन्समधील अमिनो अॅसिड हा घटक उपयुक्त ठरत असतो. प्रोटिन्समुळे पचनक्रिया, श्वसनक्रिया अशा शारीरिक क्रियांना चालना मिळते. म्हणूनच आहारात मासे, दूध, अंडी, विविध प्रकारच्या डाळ यांचा समावेश करा. म्हणजे तुमच्या शरीराला पुरेसे प्रोटिन्स मिळतील आणि शरीराची उंची वेळीच योग्य प्रमाणात वाढेल.
Shutterstock
मिनरल्स –
मिनरल्स अथवा खनिजयुक्त आहारातून तुम्हाला मॅग्नेशियम, फॉस्फरस, फ्लूओरॉईड, आयोडिन, लोह अशा खनिजांचा पूरवठा होत असतो. या मिनरल्सचा शारीरिक उंची वाढण्यासाठी फायदाच होतो. कारण अशा पदार्थांमधून तुमचा सर्वांगिण विकास होतो. कॅलशियम हे उंची वाढण्यासाठी लागणारे एक अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त खनिज आहे.कॅलशियममुळे हाडांचा विकास होतो. जर तुम्ही उत्तेजक पेय, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पदार्थ. कॉफी,अती तिखट पदार्थ खात असाल तर यामुळे तुमच्या शरीरात कॅलशियमचा पूरवठा कमी होतो. ज्याचा विपरित परिणाम होऊन तुमची वाढ आणि उंची खुंटते. म्हणूनच असा आहार घ्या ज्यातून तुम्हाला सर्व प्रकारची मिनरल्स मिळतील.
Shutterstock
व्हिटॅमिन्स –
हाडांची वाढ आणि विकास होण्यासाठी शरीराला व्हिटॅमिनयुक्त आहाराची गरज असते. जर आहारात व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वाढीवर होतो. तुमच्या शरीराने आहारातील कॅलशियम शोषून घ्यावे यासाठीही व्हिटॅमिन्स गरजेचे असतात. उंची वाढण्यासाठी व्हिटॅमिन डीची गरज असतेच पण त्यासोबतच तुम्ही असा आहारही घ्यायला हवा ज्यातून तुम्हाला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एफचा पूरवठा होईल. कारण यामुळेही तुमच्या उंचीवर परिणाम होऊ शकतो. सर्व प्रकारच्या फळं आणि भाज्यांमधून तुम्हाला पुरेसे व्हिटॅमिन्स मिळू शकतात.
शरीराला पुरेसे व्हिटॅमिन्स, कॅलशियम आणि मिनरल्स मिळण्यासाठी आहारात दूध, दुधाचे पदार्थ, फळं आणि भाज्या, चिकन, सर्व प्रकारची तृणधान्य, कडधान्य आणि डाळ, अंडी, सोयाबीन आणि ओट्सचा जरूर समावेश करा.
Shutterstock
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश