तुम्हाला जेव्हा तजेलदार आणि अप्रतिम त्वचा हवी असते त्यामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे पिंपल्स अर्थात चेहऱ्यावर येणारी मुरूमं. तुम्हाला जेव्हा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला जायचं असतं, तेव्हा तुमचा ड्रेस कितीही सुंदंर असला तरीही जर तुमच्या चेहऱ्यावर लहानशी जरी पुळी असली तरीही त्या पुळीकडे सर्वात पहिले लक्ष जातं. खरं आहे ना? आणि कितीही काहीही केलं तरी अशा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी एखादी तरी पुळी चेहऱ्यावर येतेच असंही बऱ्याच जणींच्या बाबतीत घडलं असेल? हो ना? त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी पिंपल्स अर्थात मुरूमं घालवण्यासाठी कोणत्या फेसवॉशचा तुम्ही वापर करू शकता याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. बऱ्याचदा कोणतेही फेसवॉश वापरले जातात. पण तुम्हाला जर चेहऱ्यावर मुरूमं असतील तर असं करू नका. तुमची त्वचा ही नाजूक असते. त्यामुळे अशा मुरूमं असलेल्या चेहऱ्यासाठी तुम्ही विशिष्ट फेसवॉश वापरणं गरेजचं आहे. नेहमी तुमची त्वचा नितळ राहील यासाठी ही माहिती वाचून नक्की हा लेख बुकमार्क करून ठेवा. तुम्हाला नक्की कायमस्वरूपी हा लेख उपयोग पडेल याची हमी आम्ही तुम्हाला देतो.
Table of Contents
मुरूमं येण्याची कारणे (Causes of Pimples)
चेहऱ्यावर मुरूमं आलेली महिला
जेव्हा तुम्हाला एखाद्या अडचणीवर उपचार हवा असतो तेव्हा त्याची नक्की कारणे काय आहेत आणि तुम्ही कोणता उपचार निवडायला हवा हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषतः तुमचं उत्तर बऱ्याच प्रश्नांसाठी एकच असेल तेव्हा. तुम्ही नीट आहार घेत नसाल किंवा तुमचं शरीर हार्मोनल बदलामधून सध्या जात असेल वा तुम्ही तुमच्या त्वचेसाठी योग्य उत्पादन वापरत नसाल यापैकी काहीही कारण असू शकतं. आम्ही खाली तुम्ही ती सर्व कारणे देत आहोत, ज्यामुळे मुरूमं अर्थात पिंपल्स येतात आणि शिका चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी उपाय –
1. तारूण्यावस्था (Puberty)
आपण वर चर्चा केल्याप्रमाणेच, तारूण्यावस्थेत पिंपल्स येण्याचं प्रमाण जास्त असतं कारण शरीर हे हार्मोनल बदलांमधून जात असतं. साधारणतः 10 ते 14 वर्षांच्या मुली आणि 12 ते 16 वर्षांच्या मुलांमध्ये हे प्रमाण आढळतं. याच वयामध्ये sebaceous glands जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि त्यामुळे पिंपल्स येतात. वेबएमडी (WebMD) नुसार 80% तरूणांना ही मुरूमांची समस्या उद्भवतेच.
2. प्रदूषण (Pollution)
आपल्या त्वचेला हानी पोहचवण्यामध्ये सर्वात मोठं कारण प्रदूषणदेखील आहे. अर्थात मुरूमं येण्याच्या प्रमुख कारणांपैकी जरी प्रदूषण नसलं तरीही तुमच्या चेहऱ्यावर हवेतून येणारी धूळ आणि घाण ही त्वचेवरील छिद्रं बंद करते आणि त्यामुळे त्वचेला हानी पोहचते. इतकंच नाही तर आपल्या त्वचेची काळजी घेणारा नैसर्गिक तेलाचा थर आपल्या त्वचेवर असतो तोदेखील या हवेतील प्रदूषणामुळे असमतोल होतो आणि पुरळ अथवा मुरूमं येण्याला कारणीभूत ठरतं.
3. खाण्याच्या सवयी (Unhealthy Eating Habits)
तुमच्या रोजच्या खाण्याच्या सवयीदेखील महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही रोज चिप्स अथवा तेलकट नाश्ता करता तेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेमधील होणारा बदल लक्षात घेता का? कधीच कळत नाही ना तुम्हाला? वास्तविक, महिनाभर जंक फूड न खाता तुमच्या नियमित आहाराकडे लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमधील फरक जाणवायला लागेल. यामध्ये काही प्रत्येकवेळा कोणत्या मॅगझिनमध्ये सांगितलं आहे किंवा फॅशन आहे असं नाही, तर यामागेदेखील वैज्ञानिक कारणे असतात. काही पदार्थांमध्ये तुमच्या ग्रंथींमध्ये इन्शुलिन निर्माण करून तेलही निर्माण करण्याची क्षमता असते, ज्याचा परिणाम हा चेहऱ्यावर मुरूमं येण्यामध्ये परावर्तित होतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मुरूमांपासून सुटका हवी असते तेव्हा भात, ब्रेड आणि साखर यांसारखे पदार्थ खाणे नक्की टाळा. त्याऐवजी फळ, भाजी आणि धान्यांचा जास्त वापर करा. कोणत्याही पिझ्झापेक्षा कधीही सलाड मागवणं फायदेशीर ठरू शकतं.
4. तणाव (Stress)
तणावात असलेली महिला
तुम्हाला जाणवतं का महिनाभर वाट पाहात असलेल्या मोठ्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी किंवा अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येतात. हे फक्त तुमच्याच बाबतीत आहे असं नाही. 2013 मध्ये करण्यात आलेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात निष्पन्न झालं आहे की, सिबममुळे तुमचे फॉलिकल्स बंद होतात आणि तणावामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरूमं येतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या तरी तणावाखाली आहात हेदेखील कळून येतं.
5. हार्मोनल असमतोल (Hormonal Imbalance)
तारूण्यावस्थेत तुमचं शरीर हे हार्मोनल बदलांमधून जात असतं. तुमची विशी उलटल्यानंतरही अशी स्थिती बऱ्याचदा उद्भवत असते. तुमच्या शरीरातील अँन्ड्रोजेन पातळी वाढल्यानंतर तुमच्या शरीरावर हार्मोनल अॅक्ने दिसू लागतात. तसंच सिबमची निर्मिती जास्त होण्यामागेही हेच कारण आहे, जे पिंपल्ससाठीही कारणीभूत ठरतं. स्त्रियांकरिता साधारणतः हार्मोनल बदल हे त्यांच्या पाळीच्या दिवसांमध्येही होत असतात.
फेसवॉशची गरज काय? (Why Face Wash Is Important)
सकाळी उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेल जमा झालेले असते. ते साफ करण्यासाठी आणि संध्याकाळी चेहऱ्यावरील थकवा घालवण्यासाठी तुम्ही फेसवॉश दिवसातून दोन वेळा वापरणं आवश्यक आहे. तसंच प्रदूषणामुळे जे घटक आपल्या चेहऱ्यावर साचलेले असतात ते तुम्ही काढून टाकू शकता. तुम्हाला रासायनिक फेसवॉश नको असेल तर नैसर्गिक फेसवॉशचा पर्यायही बाजारामध्ये उपलब्ध आहे. फेसवॉश वापरल्याने चेहऱ्याची आर्द्रता टिकून राहाते. तसंच तुमची चेहऱ्याची त्वचा मृत झाली असेल तर ती निघून जाण्यास मदत होते. त्याशिवाय रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित साबणाऐवजी फेसवॉश वापरावं. त्यासाठी आम्ही तुम्हाला मुरूमांसाठी कोणते 15 चेहऱ्यावरील उत्कृष्ट फेसवॉश वापरायचे आहेत याची माहिती देत आहोत.
मुरुमांसाठी फेस वॉश (Best Face Wash For Pimples In Marathi)
बाजारामध्ये अनेक फेसवॉश उपलब्ध आहेत. पण मुरूमांसाठी कोणते फेसवॉश तुमच्या चेहऱ्यासाठी चांगले आहेत यासाठी आम्ही काही फेसवॉश तुम्हाला सांगत आहोत.
वाचा – घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो
1. Himalaya Clarina Anti Acne Face Wash Gel
हे फेसवॉश मुरूमांना नियंत्रित करण्यासाठी आणि मुरूमांशी लढा देण्याचं काम करतं. हे सेबमचं उत्पादन थांबवून मुरूमांचे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी मदत करतात.
फायदे –
- यामधून नैसर्गिक घटक मिळतात
- याचा सुगंध अप्रतिम आहे
- यामध्ये असलेले सॅलिसिलिक अॅसिड हे मुरूमांसाठी फायदेशीर आहे
- हे त्वचेला कोरडी करत नाही
- प्रवासात घेऊन जाण्यासाठी योग्य पॅकेजिंग आहे
तोटे
- याचा जास्त फेस येत नाही
- मेकअप काढताना याचा जास्त वापर करावा लागतो. कमी फेसवॉश घेतल्यास, चेहरा साफ होत नाही
2. Jovees Tea Tree Oil Control Face Wash
हे उत्पादन वनस्पतीच्या अर्क आणि किमती वनस्पतींपासून तयार करण्यात आलं आहे आणि विशेषतः तेलकट आणि संवेदनशील त्वचेसाठी याचा वापर करायला हवा. हे त्वचेमधील अतिरिक्त तेल काढून अगदी आतपर्यंत जाऊन त्वचा साफ करतं आणि मुरूमांवर नियंत्रण ठेवण्यास हे फेसवॉश फायदेशीर ठरतं.
फायदे –
- हे तेलकट त्वचेसाठी उपयुक्त ठरतं
- त्वचेच्या आत जाऊन त्वचा स्वच्छ करण्यासाठी उपयोगी
- मुरूमं नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर
- याचा सुगंध अप्रतिम आहे
- प्रवासात त्वचा चांगली राखण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो
तोटे
- हिवाळ्यादरम्यान त्वचेवर लावल्यास, त्वचा अधिक कोरडी होते
3. The Body Shop Sea-Weed Deep Cleansing Gel
हे फेसवॉश त्वचा कोरडी न करता त्यातून अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. मेकअप आणि अशुद्धता घालवण्यासाठी तुमची मदत हे फेसवॉश करतं. या फेसवॉशचा वापर करून तुमची त्वचा अधिक चमकदार, मॅट फिनिश आणि ताजी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
फायदे
- संवेदनशील त्वचेसाठी एकदम योग्य आहे
- हे त्वचा कोरडी न करता तिची योग्य स्वच्छता ठेवते
- प्रवासासाठी योग्य
- त्वचेचं टेक्स्चर सुधारण्यास फायदेशीर
- मुरूमांवर नियंत्रण ठेवण्यास मदत
तोटे
- यामध्ये पॅराबिन आढळते जे तुमच्या त्वचेला हानिकारक ठरू शकतं
4. Clean and Clear Pimple Clearing Face Wash
हे फेसवॉश कडिलिंब आणि लिंबापासून तयार करण्यात आलेलं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या चेहऱ्यावरील मुरूमांना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतं. तसंच त्वचेवर अतिशय सभ्य आणि प्रबावी स्वरूपात याचा अंमल होतो. त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राहाते.
फायदे
- अगदी सहज कुठेही बाजारात उपलब्ध आहे
- मुरूमं रोखण्यास फायदेशीर
- प्रवासात नेण्यासाठी आणि वापरण्यासाठी उपयुक्त
- चेहऱ्यावरील तेल नियंत्रणात ठेवतं
- परवडण्यायोग्य
तोटे
- कोरड्या त्वचेसाठी याचा उपयोग होत नाही
5. Neutrogena Deep Clean Face Cleaner
हे फेसवॉश तुमच्या चेहऱ्यावरील रोम आणि छिद्रातून तेल बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. अगदी त्वचेच्या आत जाऊन घाण साफ करतं. त्वचा तज्ज्ञांनुसार यामध्ये हायड्रॉक्सी अॅसिडचं प्रमाण जास्त असल्याने त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी याची मदत मिळते.
फायदे
- तेल नियंत्रित करण्यासाठी
- मुरूमं नष्ट करून नियंत्रित करण्यासाठी उपयोगी
- मेकअप लवकर काढून टाकण्यासाठी उपयुक्त
- प्रवासात नेण्यासाठी सोपे
तोटे
- हे त्वचा पटकन कोरडी करतं. त्यामुळे काळजी घ्यावी
6. Neutrogena Oil Free Acne Face Wash
हे फेसवॉश मायक्रो टेक्निक वापरून तयार करण्यात येतं आणि यामध्ये अल्कोहोलचा वापर होत नाही. हे त्वचा न सुकवता स्वच्छ करण्यास मदत करतं. तसंच हे त्वचेवरील रोम आणि छिद्रातील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासही फायदेशीर ठरतं.
फायदे
- यामध्ये असणारे सॅलिसिलिक अॅसिड मुरूमांशी लढा देण्यास मदत करतं
- त्वचेच्या आतपर्यंत जाऊन त्वचेची स्वच्छता करतं
- यामध्ये पॅराबिन आढळत नाही
- प्रवासामध्ये घेऊन जाण्यास उत्तम पर्याय
तोटे
- बऱ्याचदा याचा वापर केल्यानंतर त्वचा कोरडी राहू शकते
Also Read – Cleanser For Oily Skin In Marathi
7. Kaya Acne Free Purifying Cleanser
हा फेसवॉश एक फेस येणारा असा फेसवॉश आहे जो आपल्या मुरूमांना फुटण्यापासून थांबवतो आणि मुरूमं अर्थात पिंपल्स नियंत्रित करण्यास फायदेशीर ठरतो. याचे गुण आपल्या चेहऱ्यावरील रोम आणि छिद्रातील साठलेली घाण काढून टाकण्यासाठी मदत करतात आणि अशुद्धतेपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो.
फायदे
- यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड आढळतं
- मुरूमं कमी करण्यासाठी फायदेशीर
- याचा सुगंध आल्हाददायक आहे
- त्वचेच्या आतपर्यंत जाऊन स्वच्छता देतं
तोटे
- यामध्ये पॅराबिन आढळतं
- त्याचप्रमाणे यामध्ये सल्फेट्सचादेखील अंश आढळतो
8. Cetaphil Daily Facial Cleanser
याचा आपल्या त्वचेच्या आतपर्यंत जाऊन स्वच्छ करण्यसाठी उपयोग होतो. तसंच हे फेसवॉश त्वचा कोरडी पडू देत नाही. त्वचा विशेषतज्ज्ञांनुसार हे फेसवॉश अतिशय हलक्या उत्पादनांनी बनवण्यात आलं असून यामुळे त्वचेवरील तेल, घाण आणि मेकअपपासून पटकन सुटका मिळते.
फायदे
- हे त्वचेच्या आतपर्यंत जाऊन स्वच्छ करतं
- त्वचा कोरडी पडू देत नाही
- मुरूमं येण्यापासून थांबवतं
- याचा सुगंध अप्रतिम आहे
तोटे
- यामध्ये पॅराबिन आढळतं
9. L’oreal Paris Go 360 Clean
हे आपल्या चेहऱ्यावरील रोम आणि छिद्र अगदी आतपर्यंत साफ करतं आणि यामध्ये आढळणारं सॅलिसिलिक अॅसिड हे मुरूमांशी लढण्यासाठी मदत करतं. हे फेसवॉश चेहरा कोरडा न करता व्यवस्थित स्वच्छ करतं. विशेषतः मुरूमं फुटण्याची समस्या नियंत्रित करण्यासाठी याचा जास्त उपयोग होतो.
फायदे
- मुरूमं फुटण्याची समस्या नियंत्रणात आणतं
- मुरूमं नियंत्रणात आणण्यास फायदेशीर
- त्वचेसाठी अगदी सौम्य आहे
- मेकअप हटवण्यासाठी उत्तम पर्याय
तोटे
- हे फेसवॉश वापरल्यानंतर थोडीशी त्वचा कोरडी पडण्याची शक्यता आहे
10. Garnier Skin Natural Pure Active Purifying Face Wash
या फेसवॉशमध्ये कडुलिंबासारखे नैसर्गिक तत्व असतात आणि जे मुरूमांना नियंत्रित करण्यासाठी सहाय्य करतात. हा साबणरहित फेसवॉश असून त्वचेसाठी अगदी सौम्य आहे. तसंच त्वचेतील कोरडेपणा काढून टाकून त्वचा अधिक मऊ आणि मुलायम बनवण्यास हे फेसवॉश फायदेशीर ठरतं.
फायदे
- त्वचा कोरडी पडू देत नाही
- मुरूमं नियंत्रित करण्यासाठी उपयोगी
- त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर
- प्रवासात घेऊन जाण्यासाठी सोपं
तोटे
- यामध्ये सल्फेट आढळतं
- याचा प्रभाव लगेच दिसून येत नाही
- मुरूमं काढून टाकण्यासाठी वेळ लागतो
वाचा – चेहऱ्यावर ब्लीच करत आहात, तर नक्की घ्या अशी काळजी
11. Himalaya Herbal Purifying Neem Face Wash
छिद्रातील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. यातील कडूलिंब आणि हळद हे दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर असल्याने मुरूमंं काढून टाकण्यास याचा उपयोग होतो. कडूलिंब आणि हळद या दोन्हीमध्ये अँटिसेप्टिक गुण आढळतात जे त्वचेवरील मुरूमं नियंत्रिण करण्यास मदत करतात. तुमचा स्किन टोन अधिक उजळवण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. त्वचेसाठी निंबोळ फेस पॅक मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते.
फायदे
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त
- त्वचा कोरडी पडू देत नाही
- हर्बल घटक
- पॅराबेनमुक्त
- परवडण्यायोग्य
तोटे
काहीच नाही
12. Lotus Herbal Tea Tree Wash Anti Acne Oil Control Face Wash
लोटस हर्बल टी ट्री आणि सिनामॉन अँटी-अॅक्ने ऑईल कंट्रोल फेस वॉश मुरूमांना नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. सेबम उत्पादनदेखील यामुळे व्यवस्थित होतं. यामध्ये नैसर्गिक वनस्पतींचा करण्यात आलेला वापर हा मुरूमं नष्ट करण्यसाठी उपयोगी ठरतो. डेड स्किन सेल्स काढून टाकून रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली करण्यासाठीही या फेसवॉशचा उपयोग होतो.
फायदे
- रोज वापरण्यासाठी उपयोगी
- तेल काढून टाकण्यासाठी
- माईल्ड स्क्रबप्रमाणे वापर होतो
- सुगंध अप्रतिम आहे
- परवडण्यायोग्य आणि प्रवासात उपयोगी
तोटे
- पॅराबिन यामध्ये आढळते
13. Greenberry Organics Detox Charcoal Face Wash
ऑर्गेनिक घटक वापरून बनवण्यात आलेलं हे फेसवॉश त्वचेचं पोषण करतं आणि त्वचा अधिक मऊ आणि मुलायम बनविण्यासाठी परिणामकारक आहे. तसंच त्वचेमध्ये साठलेली घाण काढून त्वचा अधिक उजळवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच निस्तेज त्वचा अधिक रिफ्रेश करण्यसाठीही याचा उपयोग होतो. यामध्ये असणारं टी ट्री ऑईल हे अँटिसेप्टिकप्रमाणे काम करतं. त्वचेवरील मुरूमं नष्ट करण्यासाठी फायदेशीर
फायदे
- सर्व त्वचेसाठी उपयुक्त
- पॅराबेनफ्री
- सेल्फेट फ्री
- व्हिगन फेसवॉश
- प्रवासासाठी योग्य
तोटे
- उग्र सुगंध
- संवेदनशील त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतं
14. Biotique Bio Neem Purifying Face Wash
कडिलिंबाची पानं, रिठा आणि कुलांजन यांचं मिश्रण असलेलं हे फेसवॉश मुरूमांसाठी उत्तम आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी आणि त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांमध्ये अँटिसेप्टिक, अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल तत्व असतात. त्यामुळे तुम्ही याचा नेहमी वापर केल्यास, तुम्हाला मुरूमं नष्ट होण्यासाठी फायदा मिळतो.
फायदे
- साबणाचा वापर यात करण्यात आलेला नाही
- त्वचा कोरडी पडू देत नाही
- परवडण्यायोग्य
- रोजच्या वापरासाठी उपयुक्त
तोटे
- उग्र सुगंध
- यामध्ये त्वचेलाही हानी पोहचू शकते
15. Plum Green Tea Pore Cleansing Face Wash
Plum तेलकट त्वचेसाठी फेसवॉश अप्रतिम आहे. तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमं काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. ब्लॉक झालेले पोअर्स ओपन करण्यासाठी याचा उपयोग होतो त्याशिवाय तुमची त्वचा कोरडी न पडू देण्यासाठीही हे फेसवॉश फायदेशीर ठरतं.
फायदे
- व्हिगन फेसवॉश
- पॅराबेन फ्री
- सुगंध अतिशय रिफ्रेशिंग आहे
- प्रवासात वापरण्यासाठी सोपं
तोटे
- महाग आहे
- संवेदनशील त्वचेसाठी योग्य नाही
प्रश्नोत्तरं (FAQs)
1. मुरूमं घालवण्यासाठी कोणताही फेसवॉश का वापरू नये
मुरूमं ही अतिशय संवेदनशील असतात. त्वचेवर फुटून त्याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी मुरूमं नियंत्रणात राहतील अशा स्वरूपाचे घटक असणारे फेसवॉश वापरणं हे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
2. रोज किती वेळा फेसवॉश दिवसातून वापरावं
कोणत्याही गोष्टीचा अतिवापर चांगला नाही. तुमची त्वचा अधिक स्वच्छ आणि साफ राहण्यासाठी तुम्ही किमान दिवसातून दोन वेळा तरी फेसवॉशचा वापर करावा. मुरूमांचा किती त्रास होत आहे त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन फेसवॉशचा वापर करावा.
3. फेसवॉशमुळे मुरूमं फुटल्यास, त्रास होत नाही का?
या फेसवॉशचा वापर केल्याने मुरूमांना त्रास होत नाही. कारण मुरूमांना त्रास होऊ नये असेच घटक यामध्ये वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुरूमं नष्ट करण्यासाठी याचा वापर होतो.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
फोटोसौजन्य – Shutterstock