मनोरंजन

#BestMovieLineEver : मराठीतील ‘लयभारी’ संवाद

Trupti Paradkar  |  Aug 9, 2019
#BestMovieLineEver : मराठीतील ‘लयभारी’ संवाद

सोशल मीडियावर नेटकऱ्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं. ज्यामुळे काही ना काहीतरी गोष्ट या माध्यमावर  ट्रेंड होतच असते. आज सगळीकडे #BestMovieLineEver ची चर्चा आहे. आज इंटरनेट आणि सर्व सोशल मीडिया माध्यमांवर चित्रपटांचे सर्वोत्तम संवाद ट्रेंड होत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीदेखील यात मुळीच मागे नाही. ज्यामुळे जुन्या आणि नवीन चित्रपटांमधील बेस्ट डायलॉग सर्वजण शेअर करत आहेत. मराठीत अनेक असे चित्रपट आहेत. ज्यांचे संवाद आजही लोकांच्या स्मरणात आहेत. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत  चित्रपटांमधील काही ‘लयभारी संवाद ’ म्हणजेच #BestMovieLineEver शेअर करत आहोत जे तुम्हाला शेअर करण्यासाठी नक्कीच आवडतील.

Instagram

1. सैराट

#BestMovieLineEver – मराठीत सांगितलेलं कळंत नाही इंग्रजीत सांगू I Love U 

सैराट या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटाने मराठीत रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता प्राप्त केली होती. बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई केलेल्या या चित्रपटातील गाणी आणि संवादाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जेवढी चर्चा आर्चीच्या बिनधास्तपणाची झाली तितकीच तिच्या या संवादाची झाली. आर्ची म्हटंली की हा संवाद सर्वात आधी सर्वांच्या लक्षात येतो. त्यामुळे हा संवाद आज सर्वात जास्त चर्चेत असणार हे सांगायला नकोच.

2. लयभारी

#BestMovieLineEver  – आपला हाथ भारी आपली लाथ भारी च्या मायला आपलं सगळंच लय भारी….  (लयभारी)

लयभारी चित्रपटातून रितेश देशमुखने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पाऊल ठेवलं. लयभारी चित्रपटातील गाणी, संगीत आणि संवाद सर्वात जास्त गाजले. या चित्रपटातील अनेक संवाद आजही लोकांच्या तोंडात रूळले आहेत. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे लयभारीच्या या संवादाची. अगदी लहान लहान मुलं देखील अभिनयासह हा संवाद बोलून अनेकांची मन जिंकून घेतात. 

3. आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर

#BestMovieLineEver – एकदम…कडक

डॉ. काशिनाथ घाणेकर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार. या चित्रपटात काशिनाथ घाणेकरांची भूमिका अभिनेता सुबोध भावेने साकारली होती. या चित्रपटातील सर्वच भूमिका कलाकारांनी त्यांच्या सशक्त अभिनयाने पेलल्या होत्या. मात्र या चित्रपटातील डॉ. काशिनाथ घाणेकरांचे संवाद सर्वात जास्त चर्चेचे ठरले. कारण मुळातच त्यांची संवादफेक उत्तम होती त्यांचे हे संवाद या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा जगासमोर आले. काशिनाथ घाणेकरांनी नुसती एन्ट्री जरी केली तरी लोक एकदम कडक असं म्हणत असत. 

4. नटसम्राट

#BestMovieLineEver – कोणी घर देता का घर… 

कुसुमाग्रजांनी लिहीलेल्या नटसम्राट या नाटकावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात गणपतराव बेलवलकरांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी साकारली होती. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम  केलं होतं. या चित्रपटात नटसम्राट बेलवलकरांचे अनेक संवाद लोकांनी अक्षरशः डोक्यावर धरले . मात्र त्यातील कोणी घर देता का घर हा संवाद अनेकांच्या तोंडावर रूळला आहे. 

5. दुनियादारी

#BestMovieLineEver – तेरी मेरी यारी…. गेली दुनियादारी

मैत्रीवर बेतलेला दुनियादारी चित्रपट म्हटला की एक वेगळंच उत्साहाचं वातावरण मनात निर्माण होतं. संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी चित्रपटात तर तरूण, मराठी कलाकारांची मांदियाळीच होती. या चित्रपटातील गाणी जितकी गाजली तितकेच या चित्रपटातील डायलॉग भन्नाट होते. अनेक संवाद आजही तुमच्या लक्षात असले तरी हा डायलॉग मैत्रीच्या पलीकडचा आहे. 

तुमच्या आवडत्या आणखी काही #BestMovieLineEver

1. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे.  (नटसम्राट)

2. धनंजय माने इथेच राहतात का? (बनवाबनवी)

3. ओम फट्ट स्वाहा… (थरथराट)

4. मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे (दुनियादारी)

5. नया है वह… (टाईमपास)

6. अरे…हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से हम अमीर है अमीर!! हम जियेंगे भी अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से…चला हवा आने दे! (टाईमपास)

7. आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ अशीच हवी आपल्याला…(टाईमपास)

8. तुम क्या बोल रहा है में क्या बोल रहा है. (टाईमपास)

 

9. संग्राम या माऊलीची माऊली हाय ती…(लयभारी)

 

10. आपल्याशी नडेल तो नरकात सडेल… (बाजी)

 

 

 

अधिक वाचा

जबरदस्त मराठमोळे वॉट्सअप स्टेटस

#POPxoMarathiBappa : बाप्पा माझं सर्वात आवडतं दैवत आहे – विद्या बालन

बॉलीवूड Star Kids जे सध्या करत आहेत ‘सिक्रेट डेट’

फोटोसौजन्य – इन्साग्राम

Read More From मनोरंजन