जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी 7 जुलैला साजरा केला जातो. 2009 ला पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हा पासून चॉकलेट प्रेमी चॉकलेट खाऊन आणि इतरांना चॉकलेट वाटून हा दिवस सेलिब्रेट करतात. प्रत्येक देशात चॉकलेट दिन साजरा करण्याची पद्धत निरनिराळी आहे. त्यामुळे काही प्रमाणात हा दिवस इतर तारखांमध्येही साजरा केला जातो. मात्र जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर हा दिवस 7 जुलैलाच साजरा करण्यात येतो. मुंबईत तुम्हाला चॉकलेट दिन साजरा करायचा असेल तर तुम्ही या प्रसिद्ध ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. कारण इथे मिळेल तुम्हाला बेस्ट चॉकलेट डेझर्ट्स जी नुसती पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल… तसंच वाचा चॉकलेट दिनानिमित्त खास Chocolate Day Quotes, Status, Kavita And Messages In Marathi, जीभेचा गोडवा वाढवणाऱ्या चॉकलेट रेसिपीस, चॉकलेट केक रेसिपी घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi).
हिचकी
चॉकलेट दिन साजरा करण्यासाठी मित्रमंडळी अथवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसोबत कुठे जायचं ? असा विचार करत असाल तर तुम्ही हिचकीमध्ये नक्कीच जाऊ शकता. हिचकी या शब्दाचा अर्थच एखाद्याची आठवण येणं याच्याशी जोडला जातो. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही तुमच्या जीवलगांसोबत वेळ घालवणं खूप रोमांचक असू शकतं. विशेष म्हणजे हिचकीमध्ये तुम्हाला चॉकलेट दिनानिमित्त खास डेझर्ट्स चाखायला मिळू शकतात ज्यांची नावेही भन्नाट आहेत… जसं की, बस कर पगले रुलाएगा क्या, चॉकलेट लाव्हा कुल्फी वगैरे…. सोबत इथे विविध बॉलीवूड, इंडियन खाद्यपदार्थांचा आस्वादही सौम्य म्युजिकसोबत घेता येईल.
लव्ह अॅंड चीझकेक
मुंबईमधील लव्ह अॅंड चीझकेक या केक शॉपमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे चॉकलेट केक मिळू शकतात. मुंबईत जवळजवळ या केकशॉपची पन्नास दुकाने विविध ठिकाणी आहेत. जिथे तुम्हाला 120 पेक्षा जास्त प्रकारच्या डेझर्ट्सचे पर्याय मिळू शकतात. या ठिकाणी मिळणाऱ्या गुई चॉकलेट फज केक या चॉकलेट बनोफी केकमधील एक युनिक फ्लेवर्सच्या केकमुळे तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. मित्रमंडळी अथवा जीवलगांना चॉकलेट दिनानिमित्त चॉकलेटचे केक भेट स्वरूपात तुम्ही या शॉपमधून पाठवू शकता.
मॅड ओव्हर डोनट्स
तुम्हाला डोनट्स खायला आवडत असतील तर तुम्ही मुंबईत कुठेही मॅड ओव्हर डोनट्सला भेट देऊ शकता. इथे मिळणारे फ्लफी आणि क्रिस्पी डोनट्स तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतील. ब्राऊनी क्रंबल, चॉकलेट थेरपी, डबल ट्रबल, चॉकलेट डेकेडन्स अशा चॉकलेट फ्लेव्हर्सचे डोनट्स तुम्ही या दिवशी नक्कीच ट्राय करायला हवेत. ज्यामुळे तुमचा चॉकलेट दिन अगदी आनंदात साजरा होईल.
पोयट्री बाय लव्ह अॅंड चीजकेक
पोयट्री बाय लव्ह अॅंड चीजकेकचे अनेक कॅफे तुम्हाला मुंबईत ठिक ठिकाणी सहज मिळू शकतील. या कॅफेमध्ये तुम्हाला अमेरिकन – युरोपियन स्टाईल ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करता येईल. शिवाय यासोबत तुम्हाला इथल्या डेझर्ट्सची भुरळ नक्कीच पडेल. म्हणूच या चॉकलेट दिनानिमित्त जाणार असाल तर इथलं बेल्जियन चॉकलेट वॅफल जरूर चाखा.
नॅचरल्सचं चॉकलेट आइस्क्रीम
मुंबईत तुम्हाला जागोजागी आयस्क्रीम शॉपची दुकाने दिसतील. पण तुम्हाला खास गुणवत्तेसह चॉकलेट आयस्क्रीम खायचं असेल तर पस्तीस वर्ष जुनं असलेल्या नॅचरल्स आईस्क्रीमला पर्याय नाही. या ठिकाणी तुम्हाला क्रंची चोको आल्मंड, चोको क्रीम, चोकोबाईट अशा विविध नावांसह चॉकलेट आयस्क्रीमचे विविध फ्लेव्हर्स मिळतील.
तेव्हा प्रिय व्यक्तीसोबत डेट असो वा कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळीसह पार्टी तुम्ही तुमचा चॉकलेट दिन मुंबईत नक्कीच छान पद्धतीने साजरा करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar