DIY फॅशन

उंची असेल कमी तर नेसा या साड्या, दिसाल अधिक सुंदर!

Dipali Naphade  |  Jun 21, 2022
best-saree-types-for-short-height-women-in-marathi

साडी एक असे आऊटफिट आहे ज्यात प्रत्येक महिला सुंदरच दिसते. पारंपरिक असो वा आधुनिक असो दोन्ही लुकमध्ये महिला अप्रतिम दिसतात. साड्यांमधील इतके रंग, पॅटर्न्स आणि अनेक स्टाईल्स यामुळे कधीकधी साड्या निवडणंही कठीण होतं. तर ज्या महिलांची उंची कमी आहे, त्यांना कोणती साडी नेसल्यावर आपण उंच दिसू हे कळत नाही, त्यामुळे साडी नेसण्याचे बरेचदा टाळले जाते. कारण साडीमध्ये कमी उंचीच्या मुली अधिक छोट्या दिसतात. पण तुम्ही योग्य साडी निवडली आणि योग्य पद्धतीने साडी नेसली तर तुम्ही नक्कीच उंच दिसू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात आणि साडी कशी नेसावी हेदेखील एक कसब आहे. जेव्हा तुम्ही साडी निवडाल तेव्हा त्याचे कापड, रंग, पॅटर्न आणि स्टाईल याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. तुमचीही उंची कमी असेल तर तुम्ही कोणत्या साड्या निवडल्यास अधिक सुंदर दिसाल हे जाणून घेऊ. 

कमी उंचीच्या महिलांना कोणती साडी दिसेल अधिक चांगली

महिलांना सर्वाधिक आकर्षक जर कोणते आऊटफिट दिसत असेल तर ते आहे साडी. साडी नेसल्यावर हल्ली स्टेटसला साडी कोट्सही ठेवले जातात. मात्र ही साडी तुम्ही व्यवस्थित स्टाईल करणे आवश्यक आहे. साडीमध्ये जाड – बारीक, उंच – ठेंगू दिसणे हे सर्वस्वी तुम्ही साडी कशी नेसता यावर अवलंबून असते. साडी नेसणे ही एक कला आहे. साडीचे कापड, ती कशी नेसली जाते आणि त्यावर कोणते दागिने अथवा गोष्टी घातल्या जातात यावर सर्व काही अवलंबून आहे. तुमची उंची जर कमी असेल तर तुम्ही जॉर्जेट साडी, शिफॉन साडी आणि लाईटवेट सिल्क साड्यांची निवड करणे अत्यंत उत्तम ठरते. पण हेच कापड तुमच्यासाठी का उत्तम आहे ते जाणून घ्या. 

लाईटवेट सिल्क साडी (Lightweight Silk Saree)

बनारसी सिल्क साडी (Banarasi Silk Saree) (बनारसी साड्यांसह ट्राय करा असे ब्लाऊज), आर्ट सिल्क (Art Silk Saree) आणि आसाम सिल्क साड्या (Assam Silk Sarees) या तुमच्या कपाटातील सर्वात ग्लॅमरस अशा साड्या ठरू शकतात. मात्र तुम्ही या साड्या नेसायचं म्हटलं तर यातील जड साड्या नक्कीच कमी उंची असणाऱ्या महिलांसाठी नाहीत. जड साड्या तुम्हाला अधिक जाड आणि कमी उंचीचे दर्शवितात. त्यामुळे तुम्ही यातील लाईटवेट सिल्क साडी निवडावी, ज्यामुळे तुमची कंबर अधिक बारीक दिसते अर्थात कमरेजवळ अशी साडी बांधल्यास, कंबर अधिक बारीक दिसेल आणि तुमची उंचीही अधिक दिसते. यामध्ये तुम्ही पेपर सिल्क साडी (Paper Silk Saree), मूगा साडी (Mooga Saree), बोमकाई साड्यांची (Bomkai Saree) निवड करावी. उंची लहान असल्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही या साड्यांची निवड केल्यास, तुमची उंची अधिक जास्त दिसून येईल. 

शिफॉन साडी (Chiffon Saree)

अनेक चित्रपटांमध्ये हिमालय आणि बर्फाच्या सुंदर डोंगरांमध्ये हिरॉईनने नेसलेली शिफॉन साडी आपल्यालाही हवीहवीशी वाटते. खरं तर शिफॉन साडीचे कापडे हे अत्यंत हलके असते आणि तुमच्याकडे या साड्या नक्कीच असायला हव्यात. या साड्या तुमच्या अंगाला चिकटून राहतात आणि तुम्ही जर थोड्या जाड असाल आणि तुमची उंची कमी असेल तर तुम्ही शिफॉनच्या साड्या नेसायलाच हव्यात. हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो. शिफॉनच्या साड्या हा उन्हाळ्याच्या दिवसातही अत्यंत उत्तम ठरतात. कारण या हलक्या असून यामध्ये अधिक प्रमाणात उकडत नाही. तसंच उष्णतेचा त्रासही होत नाही. 

जॉर्जेट साडी (Georgette Sarees)

तुम्हाला शिफॉनची साडी जर आरामदायी वाटत नसेल तर तुम्ही जॉर्जेट साड्यांची निवड करावी. अशा साड्या महिलांसाठी उत्तम ठरतात. कारण या साड्या अधिक जड नसतात आणि ज्यांची उंची कमी आहे आणि ज्या महिला जरा जाडसर आहेत, त्यांच्यासाठी शिफॉनच्या साड्यांच्या तुलनेत जॉर्जेटच्या साड्या अधिक चांगल्या फिट बसतात. तुमच्या शरीराचा आकार योग्य पद्धतीने दाखविण्यास या साड्या उत्तम ठरतात. तसंच तुम्हाला उंच दर्शविण्यासाठीही या साड्यांचा उपयोग होतो. उन्हाळ्यातही या साड्या तुमच्या उपयोगी पडू शकतात. 

तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही तुमच्यासाठी योग्य साडी निवडू शकत नसाल तर तुम्ही या साड्यांची निवड करावी आणि आम्ही सांगितलेल्या टिप्सचा नक्की वापर करा. या लेखाच्या आधारे तुम्ही नक्कीच साड्यांची योग्य निवड करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन