वीकेंड वीकेंडची चावडी यावेळी सगळ्यांसाठी धक्कादायक होती. कारण वाईल्ड कार्ड एंट्रीने घरात आत गेलेला आदिश वैद्य हा अगदी काहीच दिवसात या घरातून बाहेर पडला आहे. घरात जय-आदिश असा एक वॉर दिसून आला होता. जो लोकांना आवडू लागला होता. यावेळी घरातून बाहेर जाण्यासाठी विकास, विशाल, गायत्री, दादूस, आदिश नॉमिनेट झाले होते. खूप जणांना दादूस जाईल अशी अपेक्षा होती. दादूस हे घरात खेळत नव्हते. पण यंदा ते कॅप्टन झाल्यामुळे त्यांना सेफ होण्याचा मान मिळाला. पण आदिश वैद्य घरातून एविक्टेट झाल्यामुळे खूप जणांना धक्का बसला आहे. आदिशने बाहेर येऊन सगळ्यांचे आभार मानले आहेत. पण तरीही त्याच्या फॅन्सला तो पुन्हा हवा आहे हे दिसत आहे.
Bigg Boss Marathi: … आणि ढसाढसा रडली मीरा
वोट्सच्या कमतरतेमुळे घराबाहेर
आदिश वैद्य यावेळी नॉमिनेट झाला होता. त्याला घरात येऊन फक्त दोनच आठवडे झाले होते. पण त्याला प्रेक्षकांचा म्हणावा तितका पाठिंबा दिला होता. खूप जणांनी जय विरुद्ध आदिश निवडताना आदिशला अधिक पसंती दिली होती. टास्क दरम्यान आक्रमक असणारा आदिश हा चांगला खेळत होता. त्यामुळे खेळात मजाही येत होती. या घरात जय-उत्कर्ष ही जोडी कोणालाही खेळू देत नाही. पण आदिश आल्यापासून तो जयला नडत होता. तो चांगला खेळत होता. त्यामुळे त्याचे जाणे हे अनेकांना धक्का देणारे होते. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या #BringBackAdish हा टॅग सुरु झाला आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीने घरात आलेला आदिश आता पुन्हा घरी पाहायला मिळेल का? की आणखी कोणाची वाईल्ड कार्ड एंट्री होईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिल्याच दिवशी झाला राडा
आदिश वैद्य घरात आल्यापासून त्याचा राडा सुरु झाला आहे. बाहेरुन गेम पाहून आल्यामुळे त्याला बऱ्यापैकी खेळ माहीत होता. त्यामुळे तो जय आणि उत्कर्षच्या फेव्हरमध्ये नाही हे आधीच कळले होते. त्यामुळे तो विकास-विशालच्या ग्रुपमध्ये दिसला. त्यामुळे विशाल-विकासच्या ग्रुपला आदिश हा फारच जवळचा वाटला होता. आदिश पहिल्याच दिवशी आल्या आल्या जयशी राडा घातला. त्यामुळे यामध्ये काहीतर दम आहे असे वाटले होते. त्याने काही नाहकची भांडण वगळता चांगल्या गोष्टीही घरात केल्या. त्यामुळे अल्पावधीत लोकांच्या आवडीचा झाल्या होत्या
गायत्री-मीराचा उद्धटपणा कमी होईना
दर आठवड्याच्या शेवटी येऊन महेश मांजरेकर सगळ्यांची शाळा घेतात. प्रत्येक आठवड्यात मीरा- गायत्रीची शाळा घेणे हा या सीझनचा नियम झाला आहे. पण असे असले तरी देखील दर आठवड्यात या दोघी त्याच चुका करतात आणि सुधारत नाहीत हे अनेकदा दिसून आले आहे. महेश मांजरेकर त्यांना हरएक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करतात. पण या दोघी आपल्या इमेजची पर्वा न करता आहेत तशाच वागत आहेत. दुसरीकडे जय- उत्कर्षची शाळा देखील घेतली जाते.त्यांनाही चांगला सल्ला दिला जातो. पण इतरांना खेळू न देणे, सतत राडे घालणे यामुळे घरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बाहेर त्यांची बदलणारी इमेज सांगून देखील या ग्रुपमध्ये काहीही बदल होताना दिसत नाही.
आता आदिशच्या जाण्याने ग्रुप B ची टीम वीक होणार आहे असे दिसत आहे.
Bigg Boss 15: अनुषा दांडेकरचे चाहत्यांसाठी खुले पत्र, बिग बॉसच्या चर्चांना पूर्णविराम