बिग बॉस मराठी आता त्याच्या फिनालेकडे वाटचाल करतेय. आता घरात मोजून 8 जण राहिली आहेत. आता खेळ हा अधिक चुरशीचा होऊ लागला आहे. घरात विशाल- विकासची जोडी ही खूप जणांना आवडली होती. पण गेल्या काही आठवड्यापासून या घरात विशालचे वागणे पूर्णपणे बदलताना अनेकांनी पाहिले आहे. महेश मांजरेकरांनी विशालला एक नंबर दिला असताना आता या नवव्या आठवड्यात येऊन विशालचा खेळ हा पूर्णपणे बदलून गेला आहे अशी प्रतिक्रिया उमटू लागली. घरातील अँग्री मॅन अशी ओळख असलेल्या विशालने त्याच्या हाताने आपला खेळ खराब करुन घेतला आहे असे आता दिसू लागले आहे. त्यामुळे आता या पुढील आठवड्यात घरात अनेक समीकरणं बदलणार आहे असे दिसत आहे.
Bigg Boss Marathi: दादूस झाले एलिमिनेट, आता होणार चुरशीची स्पर्धा
विशाल अचानक का बदलला?
विशाल- विकास एकत्र राहून घरात चांगला खेळ खेळत होते. पण घरात आता बरीच समीकरणं बदलू लागली आहेत. त्यामुळे जय- उत्कर्षलादेखील आता एका नव्या स्पर्धकाची गरज आहे. अशातच विकासपासून दूर करण्यात जय-उत्कर्ष यशस्वी झाले आहेत. घरात कॅप्टन्सीसाठी झालेल्या टास्कमध्ये विशाल हा जयसाठी जीव तोडून लढला. पण तो सेफ आहे असे कळल्यावर त्याने जयचे ऐकून कॅप्टन्सीसाठी लढा देणेही त्याने टाळले. त्यामुळे अनेकांना तो आता जय- उत्कर्षच्या बाजूने झुकताना दिसू लागला आहे. जे आता खूप जणांना पटेनासे झाले आहे. घरात दोन गटात कायम वाद दिसून आले आहेत. असे असताना आता खेळाच्या शेवटचे काही दिवस असताना असा बदल करणे खूप जणांना आवडलेले नाही.
सतत करतोय अपमान
विशालला गेल्याच आठवड्यात महेश मांजरेकरांनी त्याच्या चुकांबद्दल सांगितले होते. हल्ली घरात तो सतत मुडी दिसून आला आहे. तो मीनल आणि सोनालीला वाटेल ते बोलतो. जे खूप जणांना पटलेले नाही. उगाचच त्यांच्या प्रत्येक गोष्टीत वाकड्यात जायचे आणि त्यांचा अपमान करत राहायचा असे काहीसे गेल्यामुळे तो गेल्या आठवड्यात अजिबात चांगला दिसून आला नाही. या आठवड्यातही त्याने ते सुरुच ठेवले आहे. आता तर त्याने त्याच्याच गटातील लोकांबद्दल बोलायला आता सुरुवात केली आहे. त्यामुळेच तो आता दिवसेंदिवस घरात खराब दिसू लागला आहे. घरात एक समजूतदार आणि चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख होती पण आता तो सध्या व्हिलन रुपात उगाचच दिसत आहे.
आलिया भट साकारणार करिअरमधील सर्वात छोटी भूमिका
विकासनेही केला समजावण्याचा प्रयत्न
विकासने विशालला खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. विकास- विशालचे प्रेम घरात वेगळे दिसून आले आहे. पण असे असले तरीदेखील विकासचे तो अजिबात ऐकताना दिसत नाही. त्यामुळेही त्याच्याबद्दल एक नक्कीच रोष दिसून आला आहे. त्याच्या चांगल्यासाठी सांगितलेल्या गोष्टी कळत नसल्याचे सोनाली आणि मीनल यांना सुद्धा वाटू लागले आहे. आता या घरातील पुढच्या टास्कमध्ये नेमके कोण नॉमिनेट होणार आणि कोणाचे होईल नुकसान हे जाणून घेणे फारच महत्वाचे ठरणार आहे.
विशालच्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटते? ते तुम्ही नक्की कमेंट करुन कळवा
या कारणामुळे शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने सोडली मालिका