बिग बॉस

Bigg Boss OTT: शमिता दिव्याची तुटली मैत्री, करणने केली दिव्याची कानउघडणी

Dipali Naphade  |  Aug 16, 2021
bigg boss ott sidnaaz

बिग बॉस (Bigg Boss OTT) हा असा शो आहे जिथे कधी कोण कोणाचे मित्र होतील आणि कोण कोणाचे शत्रू होतील हे सांगणं कठीण आहे. पहिल्याच आठवड्यात या शो ने प्रेक्षकांचे मन जिंकायला सुरूवात केली आहे. तर अनेकांची भांडणे आणि एकमेकांबरोबरची मैत्री बदल यामध्ये बदलही दिसून यायला लागला आहे. पहिल्याच आठवड्यात आलेले टास्क आणि निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे नेहमीच घडते. पण संडे का वारमध्ये शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि दिव्या अगरवाल (Divya Agarwal) या दोघींची मैत्री तुटल्याचे दिसून आले आहे. दिव्याच्या वागण्यामुळे आणि एकमेकींवर करण्यात आलेल्या आरोपामुळे या दोघींची मैत्री अखेर तुटली आहे. तसंच सुरुवातीपासूनच करणने दिव्यावर निशाणा साधलेला पण दिसून आले. 

अधिक वाचा – शमिताच्या वयावरून अक्षरा आणि ऊर्फीने घेतली फिरकी, म्हटले ‘मावशी’

करणने दिव्याची कानउघडणी करत शो सोडण्यास सांगितले

बिग बॉस ओटीटीने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचे मन जिंकायला सुरूवात केली आहे. तर करण जोहरनेही व्यवस्थित अभ्यास करून पहिलाच संडे का वारमध्ये स्पर्धकांना फैलावर घेतले आहे. यामध्ये सुरूवात झाली आहे ती दिव्या अगरवालकडून. आठवड्यात बऱ्याच वेळा दिव्याने आपल्याला या शो ची गरज नाही असं प्रतीक सहजपालसह झालेल्या भांडणामध्ये उल्लेख केलेला दिसून आला आणि त्यामुळेच करणने दिव्याची कानउघडणी करत जर तिला गरज नसेल तर तिने हा शो सोडून जावे असे सांगितले आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात कोणालाही करणने सोडलेले नाही. तसंच घरात नक्की एकमेकांबद्दल काय बोलले जाते याबाबतीतही करणने खुलासा केला आहे. करण ओरडल्यामुळे दिव्याला खूपच वाईट वाटले आणि तिला रडू कोसळल्याचेही पाहायला मिळाले आहे. दिव्याच्या अशा वागण्यामुळेच घरातही तिला अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. मात्र ती अत्यंत तगडी स्पर्धक असल्याचेही म्हटले जात आहे. तसंच या आठवड्यात बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये झीशानने दिव्याला उर्फीविरुद्ध निवडल्याने या आठवड्यात ऊर्फीला कमी मते मिळून ती स्पर्धेबाहेर झाल्याचे दिसून आले आहे.

अधिक वाचा – ‘हिरामंडी’मध्ये रेखा ऐवजी आता ऐश्वर्याची एन्ट्री 

#sidnaaz चा प्रवेश

यावेळी बिग बॉस ओटीटीमध्ये #stayconnected हा हॅशटॅग आहे. यासाठी सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल यापेक्षा चांगली जोडी असूच शकत नाही. या जोडीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. तर या दोघांची नोकझोक आणि या दोघांची मैत्रीही सर्वज्ञात आहे. यावेळी संडे का वारमध्ये ही जोडी खास आली होती. तर घरातही स्पर्धकांसाठी हे दोघे प्रवेश करणार आहेत. आता या आठवड्यात नक्की कोणते टास्क येणार आणि सिद्धार्थ आणि शहनाझ स्पर्धकांना काय काय सांगणार याबाबतही त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. मात्र या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या दिसून येत आहे आणि त्याचाच परिणाम आता या आठवड्यात प्रत्येकावर होणार हेदेखील गृहीत आहे. या आठवड्यात शमिता शेट्टी, राकेश बापट (Raquesh Bapat) आणि उर्फी जावेद (Urfi Javed) यांना नॉमिनेट करण्यात आले होते आणि त्यातून उर्फी घराबाहेर गेली आहे. मात्र उर्फीचे आऊट होणे अनेकांना पटलेले नाही. कारण ती योग्य खेळली असून तिच्यावर अन्याय झाला असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. तर तिच्याऐवजी राकेशला बाहेर काढण्यात यावे असंही म्हटले जात आहे. 

अधिक वाचा – फँड्रीच्या शालूने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल, म्हणाली…

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बिग बॉस