बिगबॉस मराठी सीजन 3 (Bigg Boss Marathi 3) सध्या खूपच गाजतोय. याच्या दुसऱ्या आठवड्याला हल्लाबोल टास्क द्वारे जोरदार सुरूवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात नावं ठेवणारे काही प्रेक्षकही आता या कार्यक्रमाकडे वळले आहेत. विविध कार्यक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांचे एकमेकाबरोबरचे मतभेद, वादविवाद आणि मैत्री प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरतेय. यावेळी सुरूवातीला जास्त चेहरे ओळखीचे वाटले नव्हते. मात्र आता या खेळाला रंगत यायला सुरूवात झाली आहे. दरम्यान, आपल्या लाडक्या स्पर्धकाच्या मजेशीर किस्सेदेखील प्रेक्षकांना खूपच आवडताना दिसत आहेत. असाच एक किस्सा अक्षय वाघमारेचा आहे. बिगबॉसच्या घरातला संयमी आणि तितकाच चतुर खेळाडू असलेला अक्षय लहानपणी खूप खोडकर होता. त्याने स्वत: त्याच्या लहानपणीचे किस्से घरात शेअर केले आहेत.
अधिक वाचा – रुपेरी पडद्यावरील हा आणखी एक कलाकार झळकणार मालिकेत
गोट्या खेळण्याचा होता अक्षयला छंद
लहानपणी अक्षयला इतर मुलांप्रमाणे गोट्या खेळण्याचा खूप छंद होता. पुणे विद्यापीठ परिसरातील चाळीत राहत असताना अक्षय गोट्या खेळण्यासाठी दूरवर जायचा. त्यादरम्यान मागे लागलेल्या कुत्र्यापासून वाचण्यासाठी पळत असताना, एका मोठ्या खड्ड्यात पडून त्याने आपली ढोपरंदेखील फोडून घेतली होती. इतकंच नाही तर अक्षयने आणखीन एक किस्सा सांगितला, लहानपणी शाळेत तासाला बाई शिकवत असताना गुपचूप फळ्यावर लेजर लाईट मारून खोड्या काढायचा. पण, अभ्यासात हुशार आणि खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असल्यामुळे त्याच्या या खोड्या शिक्षक सहसा माफ करत आणि दुर्लक्ष करत होते असंही अक्षयने सांगितले. असा हा अक्षय बीगबॉसच्या पटलावर टिकून राहण्यासाठी कोणते फासे टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर बिग बॉसमधील अक्षय हा मात्र कोणत्याच बाजूने खोडकर वाटत नाही. तर सर्वांमध्ये मिक्स होणारा आणि अतिशय संयमी आणि हवं तिथेच बोलणारा, मात्र आपलं मत ठामपणे मांडणारा अक्षय सर्वांनाच आता आपलासा वाटू लागला आहे.
अधिक वाचा – दोन्ही कुटुंब सांभाळणारी ‘कुसुम’ प्रेक्षकांच्या भेटीला, शिवानी बावकर मुख्य भूमिकेत
दादा कोंडके यांचा नातू
अक्षय वाघमारेला (Akshay Waghmare) अभिनेता म्हणून खरी ओळख दिली आहे ती ‘फत्तेशिकस्त’ या मराठी चित्रपटाने. दरम्यान अरूण गवळी (Arun Gawali) यांच्या मुलीशी लग्न केल्यानंतर अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या गेल्या होत्या. अक्षय नुकताच काही महिन्यांपूर्वी बाबा झाला आहे. त्यामुळे अनेकदा घरातही मुलगी आणि बायकोच्या आठवणीने हळवा होतो. मात्र त्यांना गर्व वाटेल असे खेळायचे आहे असा निर्धार करूनच अक्षय आला आहे आणि कोणत्याही टास्कमध्ये जीव तोडून अक्षय खेळताना दिसत असल्याने प्रेक्षकांनाही अक्षय आवडू लागला आहे. दरम्यान अक्षयचे दादा कोंडके यांच्याही नाते असल्याचे आता पुढे येत आहे. दादा कोंडके यांचा अक्षय नातू आहे. पण अक्षयने फारच कमी वेळात आपली स्वतःची ओळख निर्माण करत फॅन फॉलोईंग मिळवले आहे. इतकंच नाही तर त्याचे अनेक फिटनेसचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर लाईक करण्यात येतात. आता अक्षय आपला खेळ पुढे कसा खेळणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. असाच संयमी खेळ खेळत राहिल्यास नक्कीच अक्षय पुढे जाईल असा विश्वासही त्याच्या चाहत्यांना आहे.
अधिक वाचा – शमशेराचा फर्स्ट लुक, रणबीर कपूरला ओळखणं आहे कठीण
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक