बॉलीवूड

बॉलीवूडमधील हे 10 बालकलाकार तुमच्या लक्षात आहेत का

Aaditi Datar  |  Jun 25, 2019
बॉलीवूडमधील हे 10 बालकलाकार तुमच्या लक्षात आहेत का

फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटची कमी नाही. आश्चर्य म्हणजे बी-टाऊनमधील काही बालकलाकार हे तर त्यांच्या सीनियर्सपेक्षाही जास्त प्रसिध्द झाले होते. एवढे की आज कित्येक वर्षानंतरही ते आपल्या लक्षात आहेत. काही जणांनी फक्त डेब्यू केलं तर काहींनी नंतरही अभिनयात नशीब आजमावलं. तर काहींनी मोठं झाल्यावर पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध बालकलाकार

चला तर मग पाहूया कोण आहेत हे बॉलीवूडमधील क्युट आणि अप्रितम अभिनय देणारे बालकलाकार.

परझान दस्तूर (Parzan Dastur)

तुस्सी जा रहे हो तुस्सी ना जाओ… कुछ कुछ होता है चित्रपटाचा हा डायलॉग आजही अनेकांच्या लक्षात आहे. या सीनमधल्या सरदार किडने सगळ्यांचं मन या एका डायलॉगने जिंकलं. मुख्य म्हणजे पूर्ण चित्रपटात फक्त बोटाने आकाशातले तारे मोजणाऱ्या परझानला फक्त हा एक डायलॉग होता. त्यानंतरही त्याने काही चित्रपटात भूमिका केल्या. 2009 साली वयाच्या 17 वर्षी त्याला पियुष झाच्या सिकंदरमध्ये पहिला लीड रोल मिळाला. तुम्ही अजून काही वर्ष मागे गेलात तर धाराच्या फेमस जलेबी जाहिरातीतही परझानच होता. 

किशुंक वैद्य (Kinshuk Vaidya)

शाकालाका बुमबुम या लहान मुलांच्या टीव्ही सीरीजमध्ये आपल्या मॅजिक पेन्सीलची जादू दाखवल्यानंतर किशुंक वैद्य टीव्हीवरून गायब झाला. त्यानंतर तब्बल एका दशकानंतर 2016 मध्ये त्याने एका डेलीसोपमध्ये काम केलं. पण ती भूमिका काही खास लक्षात राहिली नाही. 

जुआन्ना संघवी (Juanna Sanghvi)

हे बेबी चित्रपटातील क्युट बाळ म्हणजे जुआन्ना. त्यावेळी जुआन्ना फक्त एक वर्षाची होती. पण आता त्याला 12 वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र जुआन्ना परत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आताही ती तेवढीच क्युट दिसत असेल का?

झनक शुक्ला (Jhanak Shukla)

झनक शुक्ला… तुम्हाला लक्षात आहे का स्मॉल वंडरच्या इंडियन रिमेकमधली निळ्या डोळ्यांची ती बाहुली. वयाचा 7 वर्षी तिने करिश्मा का करिश्मा आणि शाहरूख-सैफ-प्रीतीच्या कल हो ना हो मध्ये अविस्मरणीय अभिनय केला. पण त्यानंतर मात्र तिने पुढील शिक्षणासाठी अभिनयातून ब्रेक घेतला. 

अदिल रिझवी Adil Rizvi

अदिलने आमिर खान स्टारर अकेले हम अकेले तुम मध्ये क्युट सोनूची भूमिका केली होती. आमिर आणि अदिलची बाप-लेकाची केमिस्ट्री तेव्हा सगळ्यांनाच आवडली होती. पण त्यानंतर मात्र तो बॉलीवूडमध्ये दिसला नाही.

पूजा रूपारेल Pooja Ruparel

डीडीएलजेमधली छुटकी तुम्हाला लक्षात आहे का? काजोलच्या बहिणीच्या भूमिकेत पूजाने काम केलं होतं. तसंच त्या आधी तिने शाहरूखसोबतच किंग अंकल या चित्रपटातही मुख्य भूमिका केली होती. पण त्यानंतर मात्र पूजा पुन्हा दिसली नाही.

अथित नाईक Athit Naik

प्रीती झिंटाचा छोटा भाऊ शिवच्या भूमिकेत अथित दिसला होता. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल आता तो उत्तम सिनेमॅटोग्राफर आहे. आत्तापर्यंत त्याने 300 फिल्म्स शूट केल्या आहेत.

आयेशा कपूर Ayesha Kapur

आयेशा कपूरने तिच्या डेब्यू असलेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटातच उत्तम अभिनय करत सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. वयाच्या 9 झी सिने अवॉर्ड मिळवणारी पहिली तर दर्शिल सफारी नंतर फिल्मफेअर मिळवणारी दुसरी बालकलाकार ठरली. ब्लॅकनंतर आयेशा सिकंदर चित्रपटात दिसली. पण त्यानंतर मात्र ती पुन्हा कधी मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर दिसली नाही.

जिब्रान खान Jibraan Khan

कभी खुशी कभी गम मधील ब्रिटीश अॅक्सेंटमध्ये जनगणमन म्हणत आईच्या डोळ्यात पाणी आणणारा तो मुलगा म्हणजेच जिब्रान खान. शाहरूख खानच्या क्युट मुलालाही जे जमलं नाही ते जिब्रानने करून दाखवलं. सूत्रानुसार, जिब्रान अयान मुखर्जीच्या आगामी ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार आहे. 

उत्कर्ष शर्मा Utkarsh Sharma

सनी देओल आणि अमिषा पटेलच्या गदर एक प्रेमकथा या चित्रपटात चरणजीतच्या भूमिकेत झळकल्यानंतर उत्कर्ष वयाच्या 18 व्या वर्षी जीनिअस चित्रपटात झळकला.  

चित्रपटातील बालकलाकार प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण करण्यात नेहमीच यशस्वी होतात. त्यामुळे या बालकलाकारांना पाहून तुम्हाला नक्कीच नॉस्टॅल्जिक वाटलं असेल. 

हेही वाचा –

Flashback : सलमान खान ते आलिया… पाहा तुमच्या सेलेब्सचे Audition videos

प्लास्टिक सर्जरीनंतर असे दिसू लागले हे सेलिब्रिटी, पाहा फोटो

जुन्या मालिकांमधील स्टार्स आता दिसतात असे, पाहा फोटो

Read More From बॉलीवूड