DIY फॅशन

बोरन्हाणासाठी मुलांना घाला असे स्टायलिश कपडे

Dipali Naphade  |  Jan 26, 2022
bornahan-in-makar-sankrant-fashionable-cloths-for-kids--in-marathi

संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपल्या घरातील लहान बाळांचे बोरन्हाण करण्याची पद्धत आहे. शिशुवरील संस्कार म्हणून आपल्याकडे पूर्वपरंपरागत चालत आलेली ही पद्धत आहे. साधारण जर मूल जन्माला आल्यानंतर एका वर्षात बोरन्हाण केलं नाही तर पाच वर्षाच्या आत कधीही करण्यात येतं. मुलगा असो वा मुलगी असो बोरन्हाण दोघांचेही करण्यात येते. पण तुम्हाला आपल्या बाळांना टिपिकल कपडे घालायचे नसतील अथवा पारंपरिक कपडे हवे असतील तर नक्की कशा पद्धतीची स्टाईल करायची याची माहिती. आपलं बाळ या दिवशी खास दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मुलांपेक्षा मुलींसाठी अधिक व्हरायटी बाजारामध्ये पाहायला मिळते. काय आहेत मुलामुलींसाठी खास व्हरायटी आणि कसे आहेत स्टायलिश कपडे घ्या जाणून. 

खणाचे खास डिझाईन्स 

Khun Pattern for Bornhan – Instagram

आजकाल खणाचे डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये आहेत. खणाची साडी असो वा खणाचे मंगळसूत्र असो इतकंच नाही तर खणाचे ट्विनिंगही आता बऱ्याच कार्यक्रमामध्ये दिसून येते. लहान मुलांसाठी बोरन्हाणासाठी खणाचे धोतर कुरता अथवा काळ्या रंगाचे खणाचे लहान फ्रॉक शिवून घेतल्यावर अत्यंत सुंदर दिसतात. या खणाच्या खास डिझाईन्सवर हलव्याचे दागिनेही अधिक सुंदर दिसतात आणि ही लहानशी मुलं अधिक गोंडस दिसतात. 

बनारसी सिल्कने बनवलेले कपडे 

Banarasi Silk for Bornhan – Instagram

बनारसी सिल्क कपडा अत्यंत मलम आणि तितकाच दिसायला आकर्षक आहे. लहान मुलींसाठी लेहंगा चोली शिवायची झाली तर बनारसी सिल्क कापड अत्यंत सुंदर दिसते. त्यावर लहानसा बो अथवा बनारसी किल्क काळ्या रंगाच्या कपड्याने मुलांसाठी कुरता आणि पायजमा शिवला तर अत्यंत सुंदर दिसतात. याशिवाय हे सुळसुळीत कपडे असल्याने मुलांना त्रासही होत नाही. काळ्या कपड्यांनी मुलांना थंडीही वाजत नाही आणि दिसायलाही अत्यंत रॉयल दिसतात. 

मिरर वर्क फ्रॉक 

मुलींसाठी बोरन्हाणाला खूपच पर्याय असतात. यामध्ये मुलींना तुम्ही मिररवर्क असणारे कपडेदेखील घालू शकता. अर्थात हे कपडे शिवताना मुलांना मिररवर्कचा त्रास तर होणार नाही ना याची मात्र नक्की काळजी घ्यावी. अर्थात यामध्ये खरी काच नसते त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. यामध्ये फुलोरा असा फ्रॉक अत्यंत सुंदर दिसतो. साधारण एक वर्षांची मुलगी असेल तर या कपड्यांमध्ये एखाद्या बाहुलीइतकीच सुंदर दिसते. मुलांनाही तुम्ही धोतर आणि कुरता मिररवर्कचा शिऊन घेऊ शकता. यामध्ये बाजूला असणारे रंगबेरंगी डिझाईन्स हे या कपड्यांची शोभा अजून वाढवतात. 

कॉटनचे कुर्ता आणि पायजमा 

काही घरांमध्ये अगदी पारंपरिक कपड्यांना प्राधान्य देण्यात येतं. यावेळी मुलगा असेल तर त्याला कृष्णाचे कपडे अर्थात पिवळा कुरता आणि लाल धोतर असे कपडे घालण्यात येतात आणि हलव्याचे दागिने घालून सजविण्यात येते. तर काही मुलांना कॉटनचा कुरता आणि पायजमा हा पर्याय वापरण्यात येतो. मुलांच्या अंगावर कपड्यांमुळे लगेच रॅश येतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करता कॉटनचा कुरता आणि पायजमा हे कपडे बोरन्हाणासाठी उत्तम ठरतात. 

कस्टमाईज्ड कपडे बोरन्हाणासाठी 

आजकाल ट्रेंडमध्ये कस्टमाईज्ड कपड्यांची फॅशन चालू आहे. तुम्हीही तुमच्या बाळासाठी खास कस्टमाईज्ड कपडे करून घेऊ शकता. बोरन्हाणासाठी तुम्ही आपल्या बाळासाठी खास काळ्या रंगाचे त्याच्या नावासह कपडे तयार करून घेऊ शकता. तसंच तुम्हाला हवं तसं डिझाईन्स तयार करूनही शिऊन देण्यासाठी आजकाल अनेक टेलर्स तयार असतात. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या बाळाच्या बोरन्हाणासाठी फक्कड फॅशनेबल कपडे नक्कीच तयार करून घेऊ शकता. 

यावर्षी बोरन्हाणासाठी करा खास फॅशन आणि आपल्या बाळासह ट्विनिंग करत करा खास बोरन्हाणाचा कार्यक्रम. तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर नक्की फॉलो करा. असे कपडे विकत घेण्यासाठी तुम्हाला ‘मीरा द लूम अफेअर’, हरक्राफ्ट असे अनेक ऑनलाईन पर्यायही उपलब्ध आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन