बाळाचा जन्म झाल्यावर घरातील आनंदाला पारावार नसतो. बाळाच्या आई-बाबांप्रमाणेच घरातील सर्व नातेवाईकांचा उत्साह जणू द्विगुणित होतो. बाळाच्या जन्मानंतर त्याच्यावर नामकरणाचा संस्कार केला जातो. भारतीय संस्कृतीत नामकरण विधी अथवा बारशाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे बाळाला नाव देण्याचा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात केला जातो. बाळाच्या बारशाच्या आधी इतर गोष्टींच्या तयारीसोबत सर्वात महत्त्वाची तयारी असते म्हणजे बाळासाठी योग्य नाव निवडणे. बाळ्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेनुसार त्याची पत्रिका हिंदू संस्कृतीत तयार केली जाते. या पत्रिकेत बाळासाठी नावराशीवरून काही आज्ञाक्षरे दिली जातात. या आज्ञाक्षरावरून बाळाचे नाव ठरवण्यात येते. जर तुमच्या बाळाचे नावराशीवरून च अथवा छ असे आज्ञाक्षर आले असेल तर तुमच्या बाळासाठी निवडा यातील एक खास नाव… यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. च वरून मुलांची नावे आणि छ वरून मुलांची नावे (Cha Varun Mulanchi Nave).
Table of Contents
- च वरून मुलांची पारंपरिक नावे (Traditional Names For Baby Boy With Ch and Cha)
- च आणि छ वरून मुलांची युनिक नावे (Unique Baby Boy Names Start With Ch and Cha)
- च आणि छ वरून मुलींची युनिक नावे (Unique Baby Girl Names starting with Ch and Cha)
- चे वरून मुली मुलांची नवीन नावे (New Names For Baby Boy Start With Che)
च वरून मुलांची पारंपरिक नावे (Traditional Names For Baby Boy With Ch and Cha)
Cha Varun Mulanchi Nave
च वरून मुलांची नावे (Cha Varun Mulanchi Nave) अनेक आहेत. आज जुन्या आणि पारंपरिक नावांचा ट्रेंड आहे. फॅशन म्हणून मुलांना पुन्हा जुन्या काळातील, अर्थपूर्ण अशी पारंपरिक नावे दिली जातात. जर तुम्हाला तुमच्या बाळाला एखादे छान पारंपरिक नाव द्यायचे असेल तर तुम्ही खालील नावांमधून तुमच्या आवडीचे नाव नक्कीच निवडू शकता.
नावे | अर्थ |
चाणक्य | आर्य चाणक्यांचे नाव, हुशार |
चारूदत्त | जन्मापासून सुंदर असलेला |
चारूचंद्र | चंद्र, भगवान कृष्णाचा मुलगा |
चंद्रशेखर | चंद्राचे नाव |
चकोर | चंद्राची कला, एका पक्षाचे ना |
चक्रदेव | भगवान विष्णूचे नाव |
चक्रधर | भगवान कृष्णाचे नाव, परफेक्ट |
चक्रसेन | सैन्याचा प्रमुख |
चक्रधारी | चक्र धारण करणारा |
चक्रवर्ती | सार्वभौम राजा |
चक्रेश | श्रीकृष्णाचे एक नाव |
चतुरस | हुशार |
चतूर | हुशार |
चतुरंग | गाण्याचा एक प्रकार |
चार्वाक | राजाचे नाव |
चारूमणी | दानशूर |
चित्तरंजन | मनोरंजक |
चिदाकाश | मनरूपी आकाश |
चिदानंद | परम आनंद |
चिदंबर | मनरूपी वस्त्र |
चित्रगुप्त | पापपुण्याचा हिशोब ठेवणारा |
चित्रभानू | सूर्य |
चित्ररथ | गंधर्व राजा |
चंद्रकांत | चंद्राप्रमाणे कांती असलेला |
चंद्रभान | चंद्राचे किरण |
चंद्रमुख | चंद्राप्रमाणे चेहरा असलेला |
चंद्रमोहन | चंद्राप्रमाणे मोहक |
चंद्रमोळी | भगवान शंकर |
चिमणराव | जिज्ञासा असलेला माणूस |
चारूहास | एक राजा |
चंद्रप्रकाश | चंद्राचा प्रकाश |
चंद्रकिशोर | चंद्राप्रमाणे तरूण |
चिन्मयानंद | आनंदी |
चंद्रभूषण | चंद्राप्रमाणे गौरवण्यात आलेला |
चांगदेव | एक महान तपस्वी |
चरणपाल | सेवक |
चंद्रचूड | भगवान शंकर |
चित्रदीप | दिवा |
चरणवीर | शूर वीर सेवक |
“द” वरून मुलांची नावे, अर्थपूर्ण आणि युनिक
च आणि छ वरून मुलांची युनिक नावे (Unique Baby Boy Names Start With Ch and Cha)
छ वरून मुलांची नावे – Cha Varun Mulanchi Nave
बाळाला जर तुम्हाला अर्थपूर्ण आणि युनिक ना द्यायचं असेल तर च आणि छ आद्याक्षरावरून तुम्ही बाळाला आम्ही शेअर केलेल्या खालील काही नावांपैकी एक छान नाव नक्कीच देऊ शकता. च वरून मुलांची नावे Cha Varun Mulanchi Nave) तुम्हाला नक्कीच आवडतील.
नावे | अर्थ |
चैतन्य | जाणिव |
चिद्धन | ज्ञानी |
चित्रेश | एक राजा |
चिरूष | देव |
चमन | बाग |
चाक्षण | चांगला क्षण |
चरण | पाय |
चार्वाक | एक ऋषी |
चंदन | एक सुंगधी वृक्ष |
चिंतक | विचार करणारा |
चैत्र | हिंदू महिना |
चंदर | चंद्र |
च्यवन | तरूण |
चंचल | उत्साही |
चिन्मय | एका ऋषीचे नाव |
चिराग | दिवा |
चार्ली | आवडता |
चितरेश | चंद्र |
चित्रवर्मा | कौरवामधील एक कौरव |
चिंरजीव | दीर्घायुष्य असलेला |
चिरंतन | शाश्वत |
चंपक | चाफ्याचे फुल |
चिंतामणी | चिंता नष्ट करणारे रत्न अथवा मणी |
चांगदेव | एक योगी |
चंद्रहास | चंद्राप्रमाणे हास्य |
चंडीदास | चंडीका देवीचा भक्त |
चंद्रकेतू | लक्ष्मणाचा मुलगा |
चुंबक | आकर्षित करणारा |
चंद्रनाथ | चंद्र |
चकोर | चंद्रावर प्रेम करणारा |
छबिलदास | सावलीप्रमाणे साथ देणारा सेवक |
छगन | एक नाव |
छनन लाल | एक नाव |
छत्रधर | आधार देणारे |
छत्रपती | मानाची पदवी, राजे |
छत्र शंकर | भगवान शंकराचे नाव |
छत्रसेन | डोक्यावर छत्र धरणारा |
छायांक | चंद्र |
च आणि छ वरून मुलींची युनिक नावे (Unique Baby Girl Names starting with Ch and Cha)
च आणि छ वरून मुलींची युनिक नावे
मुलगा असो वा मुलगी आपल्या बाळाचे नाव थोडं युनिक आणि हटके असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठीच बाळाच्या नावराशीवरून आलेल्या नावावरून तुम्ही खूप रिसर्च करून एक छान नाव निवडता. तुमच्या घरात जन्माला आलेल्या मुलामुलींसाठी आम्ही काही निवडक नावे शेअर करत आहोत. च वरून मुलांची नावे (Cha Varun Mulanchi Nave) निवडण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा.
नावे | अर्थ |
चित्रगंधा | सुंगधी |
चिन्मयी | कायमस्वरूपी |
चंद्रकांता | चंद्राप्रमाणे कांती असलेली |
चारू | सुंदर |
चित्रा | मनमोहक |
चंद्रजा | चंद्राप्रमाणे दिसणारी |
चांदणी | चांदणी |
चरण्या | योग्य वागणूक असलेली |
चारूल | सुंदर |
चैत्रावली | चैत्र महिन्याची पौर्णिमा |
चैत्रवी | चैत्रात जन्माला आलेली |
चकोरी | चंद्राच्या प्रेमात पडलेला पक्षी |
चंद्रिका | चंद्राची कोर |
चंद्रिमा | चंद्रासारखी दिसणारी |
चंजना | सुंदर |
चंद्रकला | चंद्राची कोर |
चंद्राकी | मोर |
चरित्रा | चांगले चारित्र्य |
चक्रिका | लक्ष्मी |
चैत्रिका | हुशार |
चक्रणी | चंद्राची शक्ती |
चमेली | एक सुंगधी फुल |
चंपिका | एक सुगंधी फुल |
चंपा | एक सुंगधी फुल |
चामिनी | अज्ञात |
चंपिका | एक सुंगधी फुल |
चतूरा | हुशार |
चिदाक्षा | दिव्य चेतना |
चिंतना | विचार करणारी |
चिरस्वी | मनमोहक हसणारी |
चिदाबंरी | गाण्याचा एक राग |
चित्रकला | एक विद्या |
चित्रांगी | सुंदर दिसणारी |
चित्रलेखा | फोटो |
छवि | प्रतिबिंब |
छुटकी | लहान मुलगी |
छमछम | सुमधूर आवाज |
छनक | आवाज |
छबि | प्रतिमा |
छायावती | एका रागाचे नाव |
छाया | सावली |
मुलींसाठी रॉयल मराठी नावे, लहान मुलींची नावे
चे वरून मुली मुलांची नवीन नावे (New Names For Baby Boy Start With Che)
Cha Varun Mulanchi Nave
च आणि छ प्रमाणेच चे वरूनही मुलामुलींची नावे तुम्ही ठेवू शकता. बाळाच्या बारश्याची तारीख जवळ आली असेल आणि बाळाचं नावराशीवरून आलेलं नाव चे वरून असेल ही नावे तुम्हाला नक्कीच आवडतील.
नावे | अर्थ |
चेरी | एक फळ |
चैत्री | चैत्र महिन्याची पौर्णिमा |
चैत्रा | किरण |
चैताली | चैत्र महिन्यात जन्माला आलेली |
चैतन्या | सजीव |
चैरावली | चैत्र महिन्याची पौर्णिमा |
चेलन | खोल जाणिव |
चेष्टा | प्रयत्न |
चेतकी | जाणिव |
चेतस | मन |
चेतना | चैतन्य |
चेल्लमा | प्रिय |
चेतकी | सजीव |
चेतसा | जाणिव |
चेतक | महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव |
चेतल | जाणिव |
चैनप्रीत | चंद्राच्या प्रेमात पडलेली |
चेरील | चेरीचे फळ |
चेरीलीन | सुंदर |
चेरीसा | गोड गाणे म्हणणारी |
चेल्सी | जहाजाचे बंदर |
चेरीश | खजिना |
चेतन | चैतन्य असलेला |
चेसी | शिकारी |
चेरिस | परोपकारी |
र वरून मुलांची नावे, युनिक नावे अर्थासह घ्या जाणून
आम्ही शेअर केलेली च वरून मुलांची नावे (Cha Varun Mulanchi Nave) छ वरून मुलांची नावे आणि चे वरून मुलामुलींची नावे तुम्हाला कशी वाटली आणि त्यातील कोणते नाव तुम्ही तुमच्या बाळासाठी निवडले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.