लाईफस्टाईल

खुर्चीवर बसून करा व्यायाम आणि कमी करा वजन

Leenal Gawade  |  Oct 22, 2021
खूर्चीवर बसून व्यायाम

हल्ली खूप जणांचे काम एका जागी बसूनच आहे. सतत लॅपटॉप समोर बसून काम करताना काहींची वजन चांगलीच वाढू लागली आहेत. वजन वाढण्यासाठी बसून राहणे ही कृती खूपच त्रासदायक ठरु लागली आहे. तुम्हीही दिवसभर खुर्चीवर सतत बसून असता का? तुम्हालाही तुमच्या कंबरेखालील भाग वाढू लागला आहे असे वाटत आहे का? व्यायाम करायला तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्हाला व्यायाम करायला आवडत नसेल तर आहे त्या जागी बसूनच तुम्ही काही सोपे व्यायामप्रकार करु शकता जे तुम्हाला नक्कीच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतील. शिवाय शरीरातील फॅटही वाढू देणार नाहीत.

सीटिंग साईड बेंड्स 

बसल्या जागी कंटाळा आला असेल तर तुम्ही दोन हात बाजूला ठेवून बसलेल्याच जागी तुम्ही डाव्या आणि उजव्या बाजूला वाका. असे केल्यामुळे तुमच्या कंबरेला चांगला ताण मिळतो. जेव्हा तुम्ही खूप काळासाठी बसून आहात आणि अगदीच अडकल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही लगेच सीटिंग साईड बेंड्स करायला घ्या. त्यामुळे तुमचे साईड फॅट्स अजिबात वाढणार नाही. त्यामुळे शक्य असेल तेव्हा तुम्ही हा व्यायाम करा. 

सीटिंग टक्स

पोटाचा घेर वाढणे कोणालाच आवडत नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही सीटिंग टक्स करा. हे  करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉपपासून थोडे लांब जायचे आहे. म्हणजे खूर्चीवर बसून राहायचे आहे. पण थोडे लांब जाऊन तुम्ही खूर्चीवर मागे रेलून तुम्हाला दोन्ही हाताने मागे घट्ट पकडून ठेवा.  दोन्ही पाय एकत्र करुन ते पोटाच्या दिशेने आणा. त्यानंतर ते बाहेरच्या दिशेला सोडा. असे तुम्हाला करायचे आहे. साधारण 15 रिपीटेशन करा. ज्यावेळी तुम्हाला जास्त करता येईल त्यावेळी या रिप्स वाढवा.

सीटिंग टो टच

बसून पोटाचा घेर कमी कऱण्यासाठी आणखी एक सोपा व्यायामप्रकार म्हणजे सीटिंग टो टच. एका जागी बसून तुम्हाला तुमच्या पायांना हात लावायला खाली वाकायचे आहे. असे करताना तुम्हाला आलटून पालटून तुम्हाला हात लावायचा आहे. असे करताना तुमचे पोट दाबले जाते. त्यामुळे तुमच्या पोटांना चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे तुम्ही हा व्यायाम नक्की करा. तुमच्यामध्ये झालेला बदल तुम्हाला नक्की जाणवेल.

बॅक क्रंच

पाठीवरही बसून बसून खूप वेळा फॅट वाढण्याची भीती असते. अशावेळी पाठीवरील फॅटही वाढू न देण्याकडे लक्ष द्यायला हवे. अशासाठी तुम्हाला खूर्चीवर बॅक क्रंच करता येईल. त्यासाठी तुम्हाला दोन्ही हात समांतर दिशेला आडवे ठेवायचे आहे. त्यानंतर दोन्ही हात पाठीच्या दिशेला तुम्हाला खेचायले आहेत. असे करताना तुमच्या पाठीवर नक्कीच ताण येईल. त्यामुळे तुमचे पाठीवरील फॅट वाढणार नाही. 

आता खूर्चीवर बसून असा करा व्यायाम

अधिक वाचा

जाणून घ्या काय आहे अग्नी मुद्रा आणि त्याचे फायदे

लहान मुलांमध्ये होणारी गॅसेसची समस्या आणि त्याचे व्यवस्थापन

आई होण्याचा विचार करताय? पण स्थुलपणामुळे येतायत अडचणी

Read More From लाईफस्टाईल