भ्रमंती

फॉरेन टूर करायची इच्छा आहे, या महिन्यांमध्ये करता येईल स्वस्त प्रवास

Leenal Gawade  |  Jun 8, 2022
foreign_tour_fb

आयुष्यात एकदा तरी परदेशात जावे असे सगळ्यांना वाटते. तुम्ही हा लेख वाचत असाल तर तुम्हालाही डोळ्यापुढे असे काही देश आठवतील. जिथे तुम्हाला कधीपासून जायचे आहे. पण बजेटमुळे तुमचा तो प्रवास तसाच राहून गेला आहे. फॉरेन टूर करण्यासाठी पैसा आलाच. त्यासाठी योग्य मॅनेजमेंटही आले. तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजचा विषय आहे. तुम्ही थोडा अभ्यास केला तर कोणत्या महिन्यात कोणत्या देशात जाता येईल? याचा अभ्यास केला तर तुम्हाला स्वस्त विमानांची तिकीट, ऑफ सीझन, हॉटेल बुकींग या सगळ्या गोष्टी कळतील. तुमचा त्रास थोडासा कमी व्हावा यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत त्यानुसार तुम्ही काही देशांचा प्रवास येत्या काळात नक्की करु शकाल. तुमचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी ट्रॅव्हल कोट्स देखील पाठवू शकता

श्रीलंका

निसर्गाने नटलेला असा श्रीलंका देश हा फिरण्यासाठी उत्तम आहे. निसर्ग, हिरवळ, समुद्रकिनारे आवडत असतील तर तुमच्यासाठी श्रीलंका हा उत्तम देश आहे. हा देश फिरण्यासाठी उत्तम काळ हा डिसेंबर ते एप्रिल मानला जातो. या काळात येथे उत्तम वातावरण असते. तुम्हाला समुद्रकिनाऱ्यांवरही जाता येते. साधारणपणे आपल्या देशाप्रमाणे या काळात येथे हिवाळा असतो. पावसाळ्याच्या दिवसता येथे ऑफ सीझन असतो. येथे मुसळधार पाऊस असल्यामुळे येथे पर्यटक फारसे नसतात. कधीकधी बीचेसवर जाणेही होत नाही. पण तरीदेखील तुम्हाला या काळात येथे फिरता येऊ शकते. 

साधारण खर्च : 40 ते 50 हजार रुपये. 

अधिक वाचा : महाबळेश्वर पर्यटन स्थळे | Tourist Places Of Mahabaleshwar In Marathi

नेपाळ

आपल्या देशाला लागून असलेला नेपाळ हा अनेकांना माहीत असेल. ज्यांनी सिक्कीमची टूर केली असेल अशांनी नेपाळच्या काही भागाला नक्की भेट दिली असेल. स्वस्तात मस्त शॉपिंग आणि काही मंदिरांसाठी तिथे पर्यटकांना प्रवास दिला जातो. आपल्या देशाची सीमा ओलांडून नेपाळला जाण्यापेक्षा तुम्ही खास नेपाळची टूर करु शकता. या देशासाठी खूप पासपोर्ट आणि व्हिसा अशी फॉर्मेलिटी त्रासदायक नसते. सप्टेंबर ते नोव्हेंबर काळ येथे जाण्यासाठी योग्य मानला जातो. याठिकाणी हिंदू मंदिरे आणि मॉनेस्ट्रीज आहेत जिथे शांतता मिळते. येथील तलाव आणि धबधबे दे देखील पाहण्यासारखे आहेत. 

साधारण बजेट: 20 ते 25 हजार

बाली

निसर्गाच्या सानिध्यात असलेले आणखी एक ठिकाण म्हणजे बाली. बाली तुम्ही हल्ली पोस्टमधून किंवा टुरीझमच्या माहितीवरुन अनेकदा ऐकले असेल. हनिमूनसाठीही खूप जण आताही बालीची निवड करतात. बालीमध्ये तुम्हाला समुद्रकिनारे, बागा, कॉफी आणि फोटो काढण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत. मे ते सप्टेंबर हा काळ यासाठी खूपच चांगला मानला जातो. बाली सगळ्यात स्वस्त असा देश आहे. भारतीयांसाठीही हा परवडणारा असा देश आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टींची खरेदी करता येऊ शकते. तुम्ही कॉफीचे चाहते असाल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी जायला हवे. 

साधारण बजेट : 50 हजारांच्या पुढे

आता तुम्ही टूरचे प्लॅनिंग करताना या गोष्टीचा नक्की विचार करा.

Read More From भ्रमंती