आठवड्यात सात दिवस असतात. प्रत्येकाला यापैकी एखादा दिवस आपल्यासाठी खास (lucky) वाटत असतो. तर आठवड्यातील एखादा दिवस असा असतो जो आपल्याला नेहमी दुर्दैवी अर्थात अनलकी (unlucky) वाटत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या लोकांसाठी आठवड्यातील सात दिवसांपैकी एक दिवस तरी अनुकूल असतो ज्यादिवशी कोणत्याही प्रकारचं शुभकार्य केल्यास, त्यांना नक्कीच यश मिळतं असा त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे प्रत्येक राशीनुसार तुमचा कोणता दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली आहे हे जाणून घेऊया
राशीनुसार जाणून घ्या तुमचा भाग्यशाली (Lucky) दिवस – Lucky Days For Zodiac Signs In Marathi
तुमचे विचार जर चांगले असतील आणि तुमचं मन जर साफ असेल तर प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी शुभच असतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार असं होत नाही. त्यामुळे कोणता दिन तुमच्यासाठी भाग्यशाली आहे हे जाणून घेऊया. कोणत्या राशीसाठी कोणता दिवस भाग्यशाली आहे ते पाहूया –
मेष (21 मार्च – 19 एप्रिल)
या राशीचे लोक खूपच उत्साही आणि एनर्जेटिक असतात. यांचा उत्साहच त्यांची ताकत असते. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे यांच्यासाठी मंगळवार हा शुभ दिवस समजला जातो. या दिवशी कोणतीही कामं केल्यास, ती पूर्ण होतात असं म्हटलं जातं.
वृषभ ( 20 एप्रिल – 20 मे)
या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. हे लोक जन्मापासूनच प्रचंड जिद्दी आणि करारी स्वभावाचे असतात. कोणतीही गोष्ट एकदा करायची ठरवली की, कोणत्याही परिस्थितीत हे लोक ती गोष्ट पूर्ण करतातच. यांचा भाग्यशाली दिवस बुधवार आणि शुक्रवार आहे. या दिवशी या व्यक्तींना कोणती ना कोणतीतरी आनंदाची बातमी कळतेच.
मिथुन (21 मे – 21 जून)
या राशीचा स्वामी बुध आहे. यांचं निरीक्षण आणि एकाग्रता जबरदस्त असतं. या व्यक्ती एका क्षणात तुम्हाला आपल्याकडे आकर्षित करून घेतात. पूर्ण आठवड्यातील बुधवार हा यांच्यासाठी शुभ दिवस आहे. या व्यक्तींची जास्तीत जास्त कामं ही बुधवारी पूर्ण होतात.
कर्क (22 जून – 22 जुलै)
या राशीचा स्वामी चंद्र आहे. या व्यक्तींचे विचार उत्तम असतात आणि त्यांच्याकडे कमालीची कल्पनाशक्ती असते. या व्यक्तीचा शुभ दिवस सोमवार मानला जातो. वास्तविक सोमवार हा आठवड्याचा पहिलाच वार असल्याने बऱ्याच व्यक्तींना आवडत नाही. पण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सर्व प्रकारची कार्य या दिवशी पूर्ण करण्याचा हा वार आहे.
सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)
या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि यांचा शुभ दिन आहे रविवार. हा दिवस खरं तर सुट्टीचा दिवस मानला जातो. पण सूर्य राशीस्वामी असल्याने हा दिवस या व्यक्तींसाठी अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण असतो. हा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींमधील लीडरशिप जागी करण्यासाठी आणि त्यांची प्रतिभा जगासमोर आणण्यासाठी उत्तम दिवस समजला जातो.
कन्या (23 ऑगस्ट – 22 सप्टेंबर)
या राशीचा स्वामी बुध आहे. या लोकांना आपण नक्की कुठे आपली एनर्जी लावायची आहे हे व्यवस्थित माहीत असतं. या व्यक्ती अतिशय परफेक्शनिस्ट असतात. या व्यक्तींसाठी बुधवार नेहमी भाग्यशाली ठरतो.
तूळ (23 सप्टेंबर – 22 ऑक्टोबर)
या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. काम आणि कुटुंबाला एकत्र मॅनेज करण्याची हुशारी या व्यक्तींकडे अतिशय चांगली असते. शुक्रवारी या व्यक्ती इतर वारांच्या तुलनेत जास्त सहज आणि आनंदी ठेवण्यात यशस्वी होतात. रोमान्स, प्रेम आणि रोमांच याचं प्रतिनिधित्व करणारी ही रास आहे आणि त्यामुळेच या व्यक्ती अतिशय रोमँटिक असतात.
वृश्चिक (23 ऑक्टोबर – 21 नोव्हेंबर)
या राशीचा स्वामी मंगळ आहे. या व्यक्ती स्वत:ला उत्कृष्ट सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळवारपेक्षा अधिक चांगला दिवस असूच शकत नाही. या दिवशी ग्रह हे नेहमी या व्यक्तींच्या मनाप्रमाणेच असतात.
धनु (22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)
या राशीचा स्वामी गुरू आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी गुरुवार हा दिवस चांगला समजण्यात येतो. हा दिवस दयाळूपणा आणि व्यक्तीगत विकासासाठी चांगला समजला जातो. या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी कार्य केल्यास, यश मिळतं आणि प्रशंसादेखील मिळते.
मकर (22 डिसेंबर – 19 जानेवारी)
या राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. इतरांपेक्षा वेगळं दाखवता येईल असं काम करणं यांना आवडतं. त्यामुळे या व्यक्तींसाठी शनिवार हा चांगला दिवस ठरतो. शनिवारी यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. घरासंबंधित कामंं या दिवशी केल्यास, यशस्वी होतात.
कुंभ (20 जानेवारी – 18 फेब्रुवारी)
या राशीचा स्वामीदेखील शनी आहे. कोणत्याही परिस्थितीत सामावून जायची या व्यक्तींची तयारी असते. कोणताही बदल या व्यक्तींना बेचैन करत नाही. या राशीच्या व्यक्तींसाठी शनिवार हा शुभ दिन आहे. या दिवशी या व्यक्ती अतिशय प्रसन्न असतात.
मीन ( 19 फेब्रुवारी – 20 मार्च)
या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी गुरुवार हा भाग्यशाली दिवस आहे. हा दिवस अतिशय सकारात्मक असा असून या दिवशी या व्यक्तींची कामं यशस्वीरित्या पूर्ण होतात. या दिवशी मीन राशीच्या व्यक्तींची बुद्धिमत्ता आणि विवेकशीलता ही अगदी कळस गाठते.
हेदेखील वाचा
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje