एखाद्या लग्नसमारंभ असेल आणि साड्या नेसायची वेळ येणार असेल तर खूप जणांना जड आणि भरलेल्या साड्या घालायला अगदी नकोसे होऊन जाते. खूप जणांना लग्नातही एलिगंट असा लुक ठेवायला फार आवडतो. त्यामुळे अशा काही साड्या आपण शोधत असतो जो आपल्याला एक वेगळा आणि चांगला लुक देऊ शकेल. एखाद्या समारंभासाठी तुम्हीही चांगली आणि वेगळी साडी शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चिकनकारीच्या काही खास साड्या शोधून काढल्या आहेत. कॉटन साड्या नेसणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय असून थोडासा वेगळा लुक केला की या साड्या फारच सुंदर दिसतात.
Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स
प्लेन चिकनकारी साडी
प्लेन चिकनकारी साड्या या देखील तुम्हाला एखाद्या समारंभासाठी फारच परफेक्ट असतात. चिकनकारी कॉटन आणि शिफॉन अशा दोन्ही प्रकारात मिळतात. यामध्ये तुम्हाला टिकली वर्क किंवा काही हेव्ही वर्क असा पर्याय देखील मिळतो. अशा साडी या तुम्ही ज्या रंगामध्ये घेता त्याच्या उलट किंवा थोडासा मिस मॅच कॉम्बिनेशन करुन तुम्ही प्लेन चिकनकारी साडी नेसू शकता. एखाद्या लग्नसमारंभासाठी तुम्हाला जर अशी साडी नेसायची असेल तर तुम्ही प्लेन चिकनकारी साडी घ्या. या साड्या फुलू नये अशा वाटत असेल तर तुम्ही त्याच्या आत फिशकट परकर घाला तो तुम्हाला अधिक चांगला दिसेल.
तुम्हालाही साडी सावरणे जाते कठीण? मग ट्राय करा रेडिमेड साडी
इंडिगो चिकनकारी साडी
इंडिगो रंग हा कधीच आऊट ऑफ फॅशन जात नाही. कारण असे रंग हे नेहमीच छान उठून दिसतात. आता तुम्हाला संपूर्ण चिकनकारी साडी नको असेल तर तुम्ही काही पॅच वर्क केलेल्या साड्या निवडू शकता. हल्ली पांढऱ्या कॉटनच्या चिकनकारीला मध्ये ठेवून त्याचे काठ हे वेगळ्या रंगाचे केले जातात. इंडिगो रंग आणि पांढरा किंवा चिकनकारीचा कोणताही रंग हा फार उठून दिसतो. त्यामुळे तुम्ही याचा कोणताही शेड घेऊन ही साडी मस्त वेअर करा. कितीही तास ही साडी नेसली तरी देखील खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही अशाप्रकारची एखादी छान इंडिगो चिकनकारी साडी नक्की घ्या. त्यावर सुंदर ज्वेलरी देखील घाला. तुमचा लुक हा नक्की उठून दिसेल.
कॉटनची साडी नेसण्याची सोपी पद्धत, देईल एलिगंट लुक
कलमकारी चिकन साडी
कलमकारी चिकन साडी ही दिसायला फारच सुंदर दिसते. ज्याप्रमाणे इंडिगो रंगाचा पॅच लावून ज्यापद्धतीने चिकनकारी साड्या मिळतात. अगदी तशाच साड्या तुम्हाला कलमकारी चिकन साड्यांमध्ये मिळेल. कलमकारी बॉर्डर लावलेल्या साड्या सुद्धा यामध्ये फार सुंदर दिसतात. ज्या तुम्ही कधीही आणि केव्हाही नेसू शकता. कलमकारी चिकन साड्या या जर तुम्हाला रेडिमेड मिळाल्या नाही तर त्या तुम्ही तयारही करुन घेऊ शकता. कलमकारीचा कपडा आणून तुम्ही निवडलेल्या चिकनकारी कपड्याला काठ लावू शकता. अशी साडी तुम्ही कस्टमाईज करुन घेऊ शकता.
आता थोड्या डिझायनर साड्यांना बाजूला ठेवून अशा साड्या नक्की वापरुन पाहा. तुम्हाला त्या नक्की आवडतील.