लाईफस्टाईल

Chocolate Day Quotes, Status, Kavita And Messages In Marathi |चॉकलेट दिन कोट्स मराठीतून

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Oct 4, 2021
Chocolate Day Quotes In Marathi

जगभरात वर्षभरात अनेकवेळा चॉकलेट दिन साजरा केला जातो. ऑक्टोबर महिन्यात 28 तारखेला राष्ट्रीय चॉकलेट दिन साजरा केला जाणार आहे. जुलै आणि फेब्रुवारीत चॉकलेट दिन साजरा केला जात असला तरी राष्ट्रीय चॉकलेट दिन साजरा करण्याची मजाच निराळी आहे. कारण जर तुम्ही चॉकलेट लव्हर असाल तर, या निमित्ताने तुम्हाला चॉकलेट खाण्याचा आणि प्रियजनांना चॉकलेट देण्याचा आणखी एक उत्तम बहाणा मिळतो. चॉकलेट डे साजरा करण्यासाठी तुम्ही चॉकलेटपासून बनवलेले विविध प्रकार तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेट करू शकता. प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेटशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नाही. चॉकलेटमुळे तुमच्या नात्यामधील गोडवा अधिक घट्ट होतो. यासाठीच या दिवशी चॉकलेटसोबत शेअर करा तुमच्या मनातील भावना… यासाठी वाचा हे Mouth Melting Chocolate Day चॉकलेट दिन कोट्स मराठीतून (Chocolate Day Quotes In Marathi). तसंच व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा आणि आठवड्यातही चॉकलेट डे येतो.

Happy Chocolate Day Quotes In Marathi | हॅपी चॉकलेट डे कोट्स मराठीतून

Happy Chocolate Day Quotes In Marathi
Happy Chocolate Day Quotes In Marathi

चॉकलेट डे निमित्त जाणून घ्या जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे चॉकलेटबाबत काही खास विचार (Chocolate Day Quotes Marathi). 

1. तुमच्यासोबत नेहमी एक मित्र असावा, असा एक मित्र ज्याच्याजवळ नेहमी एक चॉकलेट असेल – लिंडा ग्रेसन

2. आनंद हा चॉकलेटने भरलेल्या ग्लासाप्रमाणे आहे. थोडासा कडू पण ह्रदयाला आरोग्य देणारा…- जोआन हॅरीस चॉकलेट

3. चॉकलेट नेहमी माफी मागतं जे इतर कोणत्याही शब्दापेक्षा नक्कीच छान वाटतं. -राहेन व्हिसेंट

4. एखादी गोष्ट चॉकलेटपासून बनलेली असेल तर ती कोणतीही असेल तरी चांगलीच असते – जो ब्रॅंड

5. पृथ्वीवर चॉकलेटसारखे दुसरे कोणतेच अध्यात्म नाही – फर्नांडो पेसोआ

6. सर्वात मोठी शोकांतिका ग्रीक आणि शेक्सपिअरने लिहीली… कारण त्यांना चॉकलेट माहीत नव्हते. सॅन्ड्रा बॉयटन

7. कॉफी आणि चॉकलेट मोक्काचे जनक आणि संत असायला हवेत – चेरीस सिंक्लेअर

8. रासायनिक दृष्ट्या चॉकलेट हे जगभरातील परिपूर्ण अन्न आहे – मायकेल लेविन

9. तुमचे आयुष्य माझ्याप्रमाणे प्रेम आणि हास्याने भरलेले असावे, यासाठी लक्षात ठेवा कठीण काळात तुम्हाला फक्त चॉकलेटची गरज आहे – जेराल्डिन सोलन

यासोबतच द्या 50+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2021| दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत

Chocolate Day Marathi Status | चॉकलेट डे मराठी स्टेटस

Chocolate Day Marathi Status

चॉकलेट डेसाठी खास तुमच्या सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करण्यासाठी हे काही हॅपी चॉकलेट डे स्टेटस (Happy Chocolate Day Marathi Status) तुमच्या नक्कीच फायद्याचे आहेत.

1. प्रेम हे च्विगंम सारखं आहे, ज्याचा गोडवा फक्त सुरूवातीलाच असतो. मात्र मैत्री चॉकलेटसारखी असते कायमस्वरूपी गोडवा देणारी… हॅपी चॉकलेट डे

2. तुझ्यासाठी खास पाठवल्या आहेत या शुभेच्छा… डार्क चॉकलेटमध्ये बुडवून आणि प्रेमाने सजवून.. हॅपी चॉकलेट डे

3. प्रेम हे सुंगधित, मऊ आणि गोड असतं. एका नजरेत चॉकलेटप्रमाणे वितळतं… हॅपी चॉकलेट डे

4. या चॉकलेट डेला तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि समस्या निघून जाऊ दे आणि तुमच्या जीवनात चॉकलेटप्रमाणे सुखाचा गोडवा कायम राहू दे… हॅपी चॉकलेट डे

5. एखाद्यासोबत नात्याची सुरूवात करायची असेल तर त्याला फक्त एक चॉकलेट द्या… कारण चॉकलेटमध्ये मनाला घट्ट जोडण्याची ताकद आहे… हॅपी चॉकलेट डे

6. सर्व तरूण मुलामुलींना चॉकलेट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. आज तुम्हाला तुमचा पार्टनर नक्की मिळेल… हॅपी चॉकलेट डे

7. जर तुम्हाला एखाद्याला स्पेशल गिफ्ट द्यायचं असेल तर त्याला फक्त त्याचं फेव्हरेट चॉकलेट गिफ्ट करा… हॅपी चॉकलेट डे आणि हे चॉकलेट माझ्या प्रिय व्यक्तीसाठी

8. जेव्हा जेव्हा मी माझं फेव्हरेट चॉकलेट पाहते तेव्हा मला फक्त तुझी आठवण येते. कारण ते तुझ्यासारखं आहे वरवर कडू आणि आतून खूप गोड असलेलं… हॅपी चॉकलेट डे

9. या जगात मला भेटलेली तू एक खूप गोड व्यक्ती आहेस. म्हणूनच तुझ्यासाठी खास चॉकलेटचा हा बॉक्स…हॅपी चॉकलेट डे

10. जर तू चॉकलेट असशील तर तू गोड आहेस, जर तू टेडी असशील तर तू प्रेमळ आहेस, जर तू एक तारा असशील तर तू तेजस्वी आहेस… पण तुझ्याकडे तर हे सर्व गुण आहेत कारण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. हॅपी चॉकलेट डे

वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद (Birthday Jokes Marathi)

Chocolate Day Marathi Kavita | चॉकलेट डे मराठी कविता

Chocolate Day Marathi Kavita

कविता म्हणजे कविने मुक्तपणे व्यक्त केलेल्या मनातील भावना तुमच्या मनातील भावना प्रिय व्यक्तीसमोर उघड करण्यासाठी या खास चॉकलेट डे मराठी कविता (Chocolate Day Marathi Kavita) जरूर शेअर करा.

1. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला 
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
‘हॅलो हॅलो’ करायला छोटासा फोन
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार 
पेपरमिंटच्या च्या अंगणात फुलं लाल लाल
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चांदीच्या झाडामागे चांदोबा राहातो
मोत्याच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला 
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
राजा मंगळवेढेकर

2. तुला हाक न मारता,
मी तुझ्यासमोर येईन
वचन दे असे की
मैत्री सुद्धा निभावशील
पंरतू असं नाही 
फक्त रोज माझी आठवणच काढशील
एकटा असतानाही माझ्यासाठी डेअरी मिल्क खाशील
हॅपी चॉकलेट डे

3. मी पाहिलं एक चॉकलेटचं जंगल
जंगलात होती सुंदर झाडे
मुळे होती डेअरी मिल्कची 
फांद्या होत्या जेलीच्या
पाने होती च्विंगमची
जेम्सच्या कळ्यांनी भरलेली
फुले होती इक्लेर्सची
कुणाला फळे लिमलेटची
लॉलीपॉप आणि पेपरमिंटची
वेगवेगळ्या रंगीत फ्लेवर्सचा
जंगलात सुटला होता वास
तुम्हाला कोणतं आवडतं घ्या ह्यामधलं ते खास
– प्रजा

4. चॉकलेट नावाचे गोड औषध असते सर्वांवरी
कधी आणि कसा वापर करावा हे असते तुमच्यावरी
चॉकलेट रूपी औषधाचे गुण आहेत फार
कधी जुळतात मने तर कधी खुलवतात प्यार

5. डार्क चॉकलेट कडू म्हणून तिला शाळेत असताना गोड चॉकलेटच द्यायचो,
ती दिसली वर्गात येताना की हळूच तिच्या बेंचवर ठेवायचो,
ती पाहायची, अलगद चॉकलेट घेऊन हातात, 
रॅपर उघडून अर्ध खाऊन अर्ध माझ्या हातात देत प्रेमाने म्हणायची …. थॅंक यू दादा
गोड चॉकलेटपण तेव्हा कडू कडू वाटायचं
सात जन्माचं पाहिलेलं स्वप्न क्षणात काचेसारखं तुटायचं.
अक्षय इलके

6. चॉकलेटपेक्षा चॉकलेटचा बंगला हवा
छोट्याशा माझ्या या जगात फक्त तुझा सहवास हवा

7. चॉकलेटसारखा गोडवा तू, थोडासा जाणवणारा कडवटपणा मी
जो तुझ्याजवळ येणाऱ्या मुंग्याना लांब ठेवतो, 
चॉकलेटसारख्या आपल्या या नात्याला वेगळं करणं केवळ अशक्य… हॅपी चॉकलेट डे

8. आयुष्याच्या पुस्तकार सुखदुःखाची पाने असतात
काही पाने वाचताना समजतात नवे सूर
एकमेकांच्या साथीने आयुष्य होते सुमधूर 
नात होत जातं चॉकलेटसारखं गोड आणि मधूर

9. ही कविता वाचताना तुझ्या मनात माझ्याबद्दल ओढ असेल
तेव्हाच ही कविता चॉकलेटपेक्षा गोड असेल
मनातल्या मनात वाह म्हणण्यापेक्षा खरी दाद देशील
सांग ना मला …. माझी कधीतरी होईल

10. या गोड दिवशी 
माझ्या गोड मैत्रिणाीला 
गोड चॉकलेटचा नजराणा
हॅपी चॉकलेट डे

2021 कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा (Kojagiri Purnima Wishes In Marathi)

Chocolate Day Messages In Marathi | चॉकलेट डे मेसेज मराठीतून

Chocolate Day Messages In Marathi

चॉकलेट डेला गोड चॉकलेटसोबत मित्र मैत्रिणी, नातेवाईक, प्रियजनांना पाठवा हे खास चॉकलेट डे मेसेस (Chocolate Day Messages In Marathi) ज्यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा चॉकलेटसारखाच कायम राहिल. 

  1. किटकॅटचा स्वाद आहेस तू, डेअरी मिल्कसारखी स्वीट आहेस तू,कॅडबरीपेक्षाही खास आहेस तू, काहिही असो माझी फाईव्ह स्टार आहेस तू… हॅपी चॉकलेट डे

2. चॉकलेट सारख्या माझ्या सर्व स्वीट फ्रेंड्सना चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा

3. माहीत आहे मला चॉकलेट खूप आवडतं तुला… खूप खूप चॉकलेट देईन आज चॉकलेट डेला पण तू पण प्रॉमिस कर किस डेला परत फेड करशील ना… हॅपी चॉकलेट डे

4. फाईव्ह स्टार सारखी दिसतेस, मंच सारखी लाजतेस, कॅडबरी सारखी जेव्हा तू हसतेस… किट कॅटची शपथ मला तू तेव्हा खूप आवडतेस… हॅपी चॉकलेट डे

5. तू दिलेलं पहिलं चॉकलेट… आजही आठवतंय मला, हरवून बसलो माझं ह्रदय कसं समजावू या वेड्या मना… हॅपी चॉकलेट डे

6. नातं चॉकलेट सारखं असावं, कितीही भांडण झालं तरी एकमेंकांमध्ये कायम गोडवा ठेवणारं… हॅपी चॉकलेट डे

7. तुमच्या आयुष्यातील गोडवा चॉकलेटसारखा असाच कायम टिकून राहो… हॅपी चॉकलेट डे

8.आज चॉकलेट डे आहे तर… माझ्या खऱ्या दोस्तांसाठी पर्क, डेअरी मिल्क फॉर ओन्ली माय लव्ह, द्वेष करणाऱ्यांसाठी पोलो आणि शांत मित्रांसाठी फक्त मेन्टॉंस काय निवडायचं ते तुमच्या हातात आहे… कारण आज चॉकलेट डे आहे

9. सर्वात जास्त गोड आहे चॉकलेट, पण त्याहून गोड आहेस तू आणि त्याहून मधूर आहे तुझी आणि माझी मैत्री… हॅपी चॉकलेट डे

10. चॉकलेट आपल्या नात्यामधील एक घट्ट दुवा आहे, कधी रूसल्यावर हसवण्यासाठी तर कधी सहजच ते तुझ्या माझ्यासोबत आहे… हॅपी चॉकलेट डे

Chocolate Day Marathi Shayari | चॉकलेट डे मराठी शायरी

Chocolate Day Marathi Shayari

चॉकलेटसोबत प्रिय व्यक्तीला प्रेमाची कबुली द्यायची असेल तर त्यासाठी शायरीसारखा दुसरा पर्याय नाही. यासाठीच चॉकलेट डे शायरी (Chocolate Day Marathi Shayari) आणि चारोळ्या जरूर वाचा. 

  1. तुझ्यावर मी एवढं का प्रेम करते माहीत आहे, कारण तू माझं चॉकलेट शॉप आहेस, मनात इच्छा येताच तू मला चॉकलेट देतोस…पण आज हे खास चॉकलेट फक्त तुझ्यासाठी. हॅपी चॉकलेट डे

2. न सांगता साथ देशील का, 
वचन दे मैत्री निभावशील का,
रोज आठवण नाही काढलीस तरी चालेल
पण एकट्याने चॉकलेट खाताना तुला माझी आठवण येईल का… हॅपी चॉकलेट डे

3. देवाने मला फक्त आयुष्य दिलं… 
पण ते खऱ्या अर्थाने तू गोड केलंस.
हॅपी चॉकलेट डे

4. गोड व्यक्तीसारखी तू माध्या जवळी राहा
आयुष्यात साथ दे अशी की
आजन्म गोड गाणे गात राहा
कधी होती चुका माझ्याकडून आणि तुझ्याकडूनही
पण तरीही या गोड चॉकलेटसारखी माझ्याजवळच राहा
हॅपी चॉकलेट डे

5. असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली
पाहिले तर तू निखळ हसत होतीस
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस
या रोमांचक वातावरणात तू प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस
हॅपी चॉकलेट डे

6. मन माझं चॉकलेटप्रमाणे नाजुक
त्यात नखरा तुझा ड्रायफ्रूटचा 
जीवन होईल माझं फ्रूट अॅंड नटसारखं
जर तू देशील तुझा हात हातात माझ्या

7. मी डेअरी आणि तू आहेस मिल्क
मी आहे किट तर तू आहेस कॅट
मी आहे फाईव्ह तर तू आहेस स्टार
थोडक्यात  मी आहे स्वीट आहे तू आहेस माझी स्वीटहार्ट

8. वचन दे प्रेम निभवशील
सुख असो वा दुःख नेहमी साथ देशील
आजचा चॉकलेट दिवस आहे खास
चल साजरा करू या एकत्र हा आज
चॉकलेटने करू या नात्याला सुरूवात
आयुष्यभरल जपूया गोडवाही त्यात
हॅपी चॉकलेट डे

9. गोड आहे तुझी मैत्री आणि त्याहून गोड आहे हे चॉकलेट 
गोड आहे आपलं नातं आणि त्याहून गोड आहेस तू
हॅपी चॉकलेट डे

10. नात्यात विश्वास असावा
बोलण्यात नेहमी गोडवा असावा
हाच अंदाज असावा आपल्या जगण्याचा
ना कुणी दुःखी असावं ना आपण
चॉकलेट वाटून साजरा करू या हा गोड क्षण

प्रियजनांसोबत चॉकलेट डे साजरा करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत Chocolate Day Quotes, Status, Kavita And Messages In Marathi | चॉकलेट दिन कोट्स मराठीतून तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. सर्वांना Happy Chocolate Day!!!

Read More From लाईफस्टाईल