आरोग्य

उन्हाळा आणि मासिक पाळी यांच्यातील परस्परसंबंध

Dipali Naphade  |  Apr 27, 2022
co-relation-between-summer-and-menstruation-information-in-marathi

तापमानाचा वाढता पारा,  सततच्या घामामुळे होणारे डिहायड्रेशन आणि याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या मनःस्थितीप्रमाणेच, बदलते हवामान देखील तुमच्या मासिक पाळीवर परिणाम करू शकते. हवामान उष्ण आणि दमट असताना बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीत बदल जाणवू शकतात. याबाबत अधिक माहिती आम्ही घेतली आहे, डॉ. मीता नाखरे, स्त्रीरोग तज्ज्ञ, लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्याकडून. 

मासिक पाळीशी नक्की काय संबंध  

ऋतुबदलाचा तुमच्या मासिक पाळीशी संबंध असल्याचे ज्ञात आहे. उन्हाळ्यात, मासिक पाळी दीर्घ काळ राहू शकते. पौगंडावस्थेतील मुली आणि पेरी-मेनोपॉज अवस्थेतील महिलांना हार्मोन्स (Hormone) अस्थिर असल्यामुळे जास्त त्रास होतो. संशोधनानुसार, जास्त सूर्यप्रकाशामुळे मासिक पाळीच्या कालावधीत बदल होऊ शकतात. त्याचप्रमाणे, जर तुम्ही नवीन ठिकाणी जाल जेथे हवामान गरम किंवा थंड असेल तर तुमच्या शरीराला तापमानाशी जुळवून घेण्यात अडचण येईल. त्यामुळे, तुमच्या मासिक पाळीची लांबी बदलू शकते. विविध अभ्यास नुसार असे स्पष्ट झाले आहे की व्हिटॅमिन डी (Vitamin D) शरीराला फॉलिकल-उत्तेजक संप्रेरक तयार करण्यास मदत करते, जे पुनरुत्पादक कार्ये नियंत्रित करते. उष्ण वातावरणात राहणाऱ्या महिला शरीर झाकणारे कपडे घालतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डी च्या कमी पातळीचा डिम्बग्रंथि रिझर्व्हशी परस्पर संबंध आहे.

काय होतो परिणाम 

यासाठी काय करणे आहे आवश्यक 

ही माहिती प्रत्येक महिलेला असायला हवी. यासाठी काय करणे महत्वाचे आहे आणि काय टाळायला हवे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हीही ही माहिती जाणून घ्यायलाच हवी.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य