Diet

उपवासात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य, जाणून घ्या कारणे

Harshada Shirsekar  |  Dec 24, 2019
उपवासात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य, जाणून घ्या कारणे

चहा आणि कॉफीचे चाहते आपल्याला सापडणारच नाहीत, असं कदापि होणार नाही. असं घडलंच तर आश्चर्यच म्हणावं लागेल. कारण काही जणांसाठी चहा आणि कॉफी म्हणजे अमृत. चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. इतकंच नाही तर चहा-कॉफीचे एकावर एक कप रिचवण्यातच काहींचा संपूर्ण दिवस जातो. उपवासादरम्यानही काही जण आरामात फक्त या दोन पेयांवर जगू शकतात किंबहुना जगतात. पण उपवासादरम्यान कॉफी-चहा पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घेऊया यासंदर्भातील माहिती

उपवासादरम्यान काय करावं?

प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणांसाठी उपवास करतात किंवा प्रत्येकाचे उपवासासाठीचे नियम निराळे असतात. उदाहरणार्थ, नवरात्रोत्सव, संकष्टी चतुर्थी, इत्यादी. उपवासाच्या दिवसांत कित्येक जण केवळ चहा किंवा कॉफी पिणं पसंत करतात. या नऊ दिवसांत केवळ पाणी पिऊनही उपवास पूर्ण केला जातो. देशात श्रावण आणि नवरात्रीत केल्या जाणाऱ्या उपवासांना बरेच महत्त्व आहे. कारण हे व्रत ऋतुंच्या बदलानुसार असतात. यामुळे शरीररूपी यंत्र व्यवस्थित चालणं आवश्यक आहे. बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. यादरम्यान अधिक प्रमाणात मीठ, साखर, तेलकट आणि  पाकिटंबद-डबाबंद अन्नपदार्थ खाण्याची ईच्छा होती. शरीरास अपाय होऊ नये यासाठी हे पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. सोबत मद्यसेवन आणि सिगारेट ओढणेही पूर्णत- बंद केलं पाहिजे.

(वाचा : हिवाळ्यात सन बाथ करणं आहे लाभदायक, पण ‘या’ दोन गोष्टी ठेवा लक्षात)

चहा-कॉफी पिण्याचे परिणाम

भूक नियंत्रणात राहून चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत होईल, असेच अन्नपदार्थ उपवास असल्यास खावेत. बहुतांश लोक हलका फलाहार करणं पसंत करतात. उपवासादरम्यान पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य बजावते. शरीरात इलेक्ट्रोलाइटची पातळी समतोल राखण्यासाठी नारळाचं पाणी प्यावे. विज्ञानानुसार उपवास असताना कॉफी किंवा चहाचे सेवन करण्यामागे वेगळ्या संकल्पना आहेत. कॉफी आणि चहा दोन्ही पेयांमध्ये कॅफिन असते. पुरेशा प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यास शरीरासाठी अपाय होत नाही. पण अतिरिक्त प्रमाणात चहा-कॉफी प्यायल्यास शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे झोप कमी होऊ शकते, नैराश्य आणि अस्वस्थपणा येऊ शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणं, वजन वाढणे आणि हृदयावरही वाईट परिणाम होऊ शकतो.  

(वाचा : त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन)

ब्लॅक कॉफी – ब्लॅक टीचे फायदे

उपवासादरम्यान आपले शरीर डिटॉक्सिफिकेशन मोडवर असते. यामुळेच प्रक्रिया आणि साखरयुक्त पेये पिऊ नये. उपवासाच्या दिवशी जर तुम्ही पोषक आहार घेतला नाही तर चहा-कॉफी प्यायल्यास तुम्हाला प्रचंड त्रास होण्याची शक्यता आहे. पोट रिकामे असताना चहा आणि कॉफी प्यायल्यास आम्लपित्त,गॅसेसच्या गंभीर समस्या होऊ शकतात. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही सकस-पौष्टिक आहार खाणं आवश्यक आहे. तरीही तुम्हाला निर्जळी उपवास करायचा असल्यास दूध-साखर नसलेला चहा-कॉफी करून प्यावा. काळ्या चहामुळे चयापचय प्रक्रियेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. शिवाय, ब्लॅक टी -कॉफी भूक देखील नियंत्रणात ठेवते.  

(वाचा : गरम पाणी पिणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, तुमचं आरोग्य आहे धोक्यात)

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Diet