DIY सौंदर्य

कॉफी स्क्रबने आणि त्वचेवर अधिक चमक, सोपी पद्धत

Dipali Naphade  |  Apr 1, 2021
कॉफी स्क्रबने आणि त्वचेवर अधिक चमक, सोपी पद्धत

कॉफी पावडरसारखे नैसर्गिक घटक त्वचेसाठी नक्कीच योग्य आणि सुरक्षित ठरतात. ही गोष्ट सध्याच्या तरूण पिढीच्या चांगलीच लक्षात आली आहे. त्यामुळेच बाजारामध्ये अनेक नैसर्गिक त्वचेच्या उत्पादनांचा (Natural Skin Care) भरणा जास्त दिसून येतो. यातही कॉफीशी संबंधित अनेक उत्पादने बाजारात दिसतात. कॉफी पावडर ही योग्य प्रमाणात वापरली तर तुम्हाला त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. तुम्ही कॉफी पावडरचा  (Coffee Powder for Skin) उपयोग करून त्वरीत रेडिएंट ग्लो कसा मिळवू शकता याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्हीही याचा वापर करून त्वरीत चमक त्वचेवर मिळवू शकता. 

चेहऱ्यापासून वजनापर्यंत आहेत कॉफीचे फायदे (Benefits Of Coffee In Marathi)

 

कॉफी पावडरचा असा करा उपयोग

Shutterstock

बाजारात अनेक उत्पादनं मिळतात. पण तुम्ही घरच्या घरी त्वचेचा एक्सफोलिएटर आणि स्क्रब बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घरातल्याच वस्तू वापरून कॉफीचा असा उपयोग करून त्वचेची काळजी घेऊ शकता. 

या सर्व गोष्टी एकत्र करून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा. घरच्या घरी बनवलेले एकदम शुद्ध आणि हर्बल स्क्रब तयार आहे. याचा तुम्हाला कोणताही दुष्परिणामदेखील होत नाही. 

दिवाळीला चेहऱ्यावर चमक आणा चॉकलेट कॉफी स्क्रबने, देतील अप्रतिम लुक

कसा करावा याचा वापर आणि काय आहे फायदा?

हातावर थोडेसे स्क्रब घ्या आणि सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारण 5 मिनिट्स हलक्या हाताने मसाज करा. तुम्हाला ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर तुम्ही नाकावरदेखील हे नीट लावा आणि मसाज करा. त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही अंगारवरही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

नैसर्गिक उत्पादनांची क्रेझ

freepik.com

सध्या अनेक जण ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करत आहेत. नैसर्गिक वस्तूंचा वापर करून त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आता अनेक कंपनीही यामध्ये नैसर्गिक वापर असणाऱ्या वस्तूंचाच वापर करत आहे. केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधन हे तुम्हाला त्वरीत उजळपणा मिळवून देतात. पण त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो. तर नैसर्गिक वस्तूंमुळे अधिक चांगला परिणाम होतो आणि दुष्परिणाम होत नाहीत. कॉफी पावडरदेखील त्यातील एक मानली जाते. हल्ली कॉफी पावडरचा त्वचेसाठी खूपच चांगला उपयोग केला जातो. त्यामुळे तुम्हीही घरच्या घरी याचा उपयोग करून घेऊ शकता. 

खराब झालेली कॉफी फेकू नका तर असा करा उपयोग

स्क्रबिंगनंतर करा हे काम

स्क्रबिंगनंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मॉईस्चराईजचा वापर करा. मॉईस्चराईज लावण्यापूर्वी सर्वात पहिले गुलाबपाणी अथवा आपल्या आवडीचे टोनर वापरा. यामुळे आपल्या त्वचेला पूर्ण पोषण मिळते. यामुळे त्वचेवरील पोर्स टाईट होतात आणि त्वचेमध्ये अधिक कसदारपणा येतो. हा स्क्रब तुमच्या त्वचेमध्ये अधिक चमक आणतो आणि त्वचा मऊ आणि मुलायम करण्यास मदत मिळते. या कॉफी स्क्रबचा वापर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा करू शकता. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल तर पहिले पॅच टेस्ट नक्की करून पाहा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य