Styling

सतत करत असाल या हेअर स्टाईल कर केस होतील खराब

Trupti Paradkar  |  Jul 4, 2021
सतत करत असाल या हेअर स्टाईल कर केस होतील खराब

सौंदर्याची प्रत्येकाची परिभाषा ही निरनिराळी असू शकते. कुणाला लांब केस असणं म्हणजे सौंदर्य वाटतं तर कुणाला शॉर्ट हेअर स्टाईलमध्ये आपण अधिक सुंदर दिसतो असं वाटत असतं. बऱ्याचदा आकर्षक दिसण्यासाठी सेलिब्रेटी स्टाईल हेअर स्टाईल केल्या जातात. मात्र एखादी हेअर स्टाईल आवडली की आपण तिच हेअर स्टाईल पुन्हा पुन्हा करतो. याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. कारण काही हेअर स्टाईल कितीही आकर्षक वाटत असल्या तरी त्यामुळे तुमच्या केसांचे फार नुकसान होते. बऱ्याचदा अशा हेअर स्टाईलमुळे तुमचे केस तुटून गळू लागतात. यासाठीच तुम्हाला कोणत्या हेअर स्टाईल वारंवार करू नयेत हे माहीत असायलाच हवं.

 

या प्रकारच्या हेअर स्टाईल सतत करू नका

काही हेअर स्टाईलमुळे तुमच्या केसांवर अती ताण येतो आणि केस तुटतात. यासाठी जाणून घ्या कोणत्या हेअर स्टाईल केसांसाठी चांगल्या नाहीत.

टाईट बन

आजकाल कोरोना, लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम यामुळे बरेचजण घरातून काम करतात. ऑफिसला जावं लागत नसल्यामुळे मग घरी केसांची निगा राखण्याकडे थोडं दुर्लंक्ष होतं. त्यात गरम होऊ नये म्हणून केसांचा घट्ट बन बांधला जातो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बऱ्याचदा तुम्ही याच हेअरस्टाईलमध्ये घरभर वावरत असता. दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करण्यासाठी काही जणी मग केस मोकळे सोडतात. याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो आणि केस गळू लागतात. अशा प्रकारची हेअरस्टाईल सतत केल्यामुळे हळू हळू केसांचा व्हॉल्युम कमी होतो.

पोनीटेल

जर तुमचे केस शॉर्ट असतील तर त्याचा पटकन बन बांधला जात नाही. मग त्यावर उपाय म्हणून मग केसांचा घट्ट पोनीटेल बांधला जातो. काम करताना, स्वयंपाक करताना अथवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असा पोनीटेल कितीही सुटसुटीत वाटत असला तरी या पोनीटेलसाठी तुम्ही वापरत असलेल्या हेअरबॅंडमुळे तुमचे केस ताणले जाऊन तुटू लागतात. अशा प्रकारच्या हेअर स्टाईलमुळे तुमच्या केसांचा आकारही बदलतो.

घट्ट वेणी

बऱ्याचजणींना केसांची वेणी बांधण्याची सवय असते. घरात असताना किंवा बाहेर जाण्यासाठीदेखील वॉटरफॉल ब्रेडस, टाईट ब्रेंड्स, रिव्हर्स ब्रेड्स अशा हेअर स्टाईल केल्या जातात. मात्र अशा प्रकारच्या वेण्या बांधण्यासाठी तुम्हाला केस घट्ट खेचून घ्यावे लागतात. घरी आल्यावर अशी वेणी लगेच सोडली नाही तर खूप वेळ तुमचे  केस ताणलेल्या अवस्थेत राहतात. ज्याचा परिणाम केसांच्या मुळांवर होतो. केसांची मुळे कमजोर होतात आणि केस हळू हळू गळण्यास सुरूवात होते. 

हेअर एक्सटेंशन

आजकाल पातळ केसांवर उपाय म्हणून केसांना एक्सेटेंशनने व्हॉल्युम देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशा प्रकारचे एक्सटेंशन लावण्यामुळे तुमचे पातळ केस अधिकच कमजोर होतात. या हेअर स्टाईलमुळे तुम्हाला तात्पुरते घनदाट केस मिळू शकतात. मात्र कायमस्वरूपी तुमचे नैसर्गिक केस कमी कमी होत जातात. यासाठीच हेअर एक्सटेंशन न करणंच केसांसाठटी योग्य ठरते. 

फोटोसौजन्य – इन्साग्राम

अधिक वाचा –

चाळीशीनंतर करा या हेअरस्टाईल, दिसणार नाही वयस्कर

सतत डोकं दुखत असेल तर बदला तुमची हेअरस्टाईल

हेअरस्टाईल सेट करण्यासाठीच नाही तर असाही करता येतो ‘हेअरस्प्रे’चा वापर

Read More From Styling