DIY सौंदर्य

काय आहे कूल जेल आय मास्क आणि कसा होतो फायदा

Dipali Naphade  |  May 16, 2022
cool-gel-eye-mask-benefits-and-how-to-use-in-marathi

त्वचा आणि केसांची काळजी जितकी आपण घेतो तितकीच काळजी डोळ्यांची घेणेही गरजेचे आहे. बरेचदा डोळ्यांची काळजी घेताना दुर्लक्ष करण्यात येतं. पण हे योग्य नाही. यामुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होतात आणि मग डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होणे, डोळ्यांच्या खालची त्वचा कोरडी दिसणे वा थकवा दिसून येणे अशा समस्या दिसून येतात. तसंच डोळयांवर पफीनेस अर्थात डोळ्यांना सूज दिसून येते. यामुळे डोळ्यांची सुंदरता कमी होते आणि डोळ्यांजवळ सुरकुत्याही दिसून येतात आणि तुम्हालाच त्रास होतो. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. यासाठी सध्या बाजारामध्ये कूल जेल आय मास्क (Cool Gel Eye Mask) हा एक चांगला पर्याय निर्माण झाला आहे. याची किंमतही खिशाला परवडण्यासारखी असून हे तुम्हाला एकदा वापरून त्याचा पुनर्वापरीह करता येतो. त्यामुळे कोल्ड जेल आय मास्कचा काय फायदा आहे आणि तो कसा वापरावा याबाबत अधिक माहिती. 

कूल जेल आय मास्क म्हणजे काय? (What is Cool Gel Eye Mask)

कूल जेल आय मास्कच्या आतमध्ये असणारे जेल तुमच्या डोळ्यांना थंडावा देण्याचे काम करते. तुम्ही हे मास्क आणून फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्या मास्कमधील जेल थंड होते. हा मास्क तुम्ही चष्म्याप्रमाणे डोळ्यांवर घालावा, ज्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि तुमच्या डोळ्यांना अधिक फायदा मिळतो. दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 

कूल जेल आय मास्कचा वापर कसा करावा? (How to Use Cool Gel Eye Mask)

तुम्ही जर डोळ्यांवर हे कूल जेल आय मास्क लावत असाल तर या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी – 

कूल जेल आय मास्कचे फायदे 

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी – दिवसभर लॅपटॉप आणि कॉम्प्यूटरवर बसून तुमच्या डोळ्यांना येणारा थकवा आणि डोळ्यांची होणारी जळजळ या मास्कमुळे कमी होते आणि तुम्हाला अधिक चांगला अनुभव मिळतो 

डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी – तुम्हाला डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्याची समस्या असेल तर तुम्हाला कूल जेल आय मास्कचा वापर करायला हवा. वास्तविक, कोल्ड कंप्रेसर डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा आणि त्यावरील ताण कमी करण्यासाठी मदत करते. तसंच रक्तप्रवाह अधिक चांगला बनवून काळी वर्तुळंही कमी होतात

कोरड्या डोळ्यांची समस्या कमी होते – अनेकांना कोरड्या डोळ्यांची समस्या असते. जेव्हा डोळ्यातील मॉईस्चर कमी होते तेव्हा अशी समस्या निर्माण होते. जास्त मोठी समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र तुम्ही कूल जेल आय मास्कचाही वापर यासाठी करू शकता

डोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी – डोळ्यात दुखत असेल वा डोकं ठणकत असेल तर कूल जेल आय मास्क फायदेशीर ठरतो. काही वेळासाठी डोळ्यांवर तुम्ही हा लावल्यास, तुम्हाला त्वरीत परिणाम दिसून येतो

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी – तुमच्या डोळ्यांना सकाळी उठल्यावर सूज जाणवत असेल अथवा डोळ्यात सतत घाण जमा होत असेल तर तुम्ही याचा वापर करून घ्या. यामुळे सूज आणि त्रास दोन्ही कमी होण्यास मदत मिळते. 

तुम्हीही तुमच्या डोळ्यांसाठी कूल जेल आय मास्कचा पर्याय निवडून पाहू शकता आणि तुम्हाला याचा अनुभव कसा आला आहे हे आम्हाला नक्की कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य