DIY सौंदर्य

WFH अर्थात वर्क फ्रॉम होममध्येदेखील घ्या आपल्या त्वचेची काळजी

Dipali Naphade  |  Mar 24, 2020
WFH अर्थात वर्क फ्रॉम होममध्येदेखील घ्या आपल्या त्वचेची काळजी

सध्या कोरोना व्हायरसने सगळीकडे दहशत निर्माण केली आहे. संपूर्ण जगात सगळेच सध्या घरात बसले आहेत. भारतातही घरातून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सगळ्याच ऑफिसमधून वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जेणेकरून लोक गर्दीत जाण्यापासून वाचतील आणि घरातच राहून काम करू शकतील. पण या सगळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठीही बाहेर जाऊ शकत नाही. असं असलं तरीही तुम्ही घरच्या घरी आपल्या त्वचेची नक्कीच काळजी घेऊ शकता. WFH अर्थात वर्क फ्रॉम होममध्येदेखील तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता. कसं ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. घरातच असलेल्या वस्तूंमधून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. पार्लरमध्ये  जाणं तर नक्कीच शक्य नाही अथवा घरच्या घरी कोणाला बोलावणंही सध्या शक्य नाहीये. रोज रोज ऑफिसला जाऊन आपली त्वचा अगदीच निस्तेज झालेली असते. आता घरातच आहात तर तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेऊ शकता. जाणून घेऊया काय आहेत सोपे उपाय आपल्या त्वचेची काळजी घेण्याचे – 

कोरफड

Shutterstock

कोरफड ही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. कोरफडमध्ये अँटिऑक्सिडंट तत्व आढळते. जे त्वचेवरील डाग आणि मुरूमं दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. घरात जर तुम्ही कोरफडचं झाड लावलं असेल तर तुम्ही कोरफडची जेल काढून चेहऱ्याला लावून ठेवा. जेल चेहऱ्याला लावल्याने तुमचा चेहरा चमकदार बनतो. तुम्हाला पार्लरपेक्षाही अधिक चमकदार त्वचा कोरफडच्या जेलमुळे मिळते. 

कोरफड कशी आहे उपयुक्त आणि काय आहे नुकसान – Aloe Vera Benefits For Glowing Skin In Marathi

दही आणि बेसन

Shutterstock

घरामध्ये दही आणि बेसन या दोन्ही गोष्टी तर नेहमीच असतात. घरातून लॅपटॉपवर काम करत असताना तुम्ही दही आणि बेसन एकत्र करून याचा फेसपॅक चेहऱ्याला लावून बसा. या मिश्रणाने चेहऱ्यावर मस्त चमक येते. दही आपल्या त्वचेला मॉईस्चराईज करण्याचे  काम करते. तर बेसन चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम करते. यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद घातली तर याचा अधिक चांगला परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. कामाप्रमाणे कामही होईल आणि तुमच्या त्वचेची काळजीही घेतली जाईल. 

केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दही आहे उपयुक्त

कच्चे दूध

Shutterstock

कच्च्या दुधाच्या वापराने चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी होण्यास मदत मिळते. कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहरा खूपच उजळ आणि चमकदार दिसतो. कापसाच्या मदतीने कच्चे दूध आपण चेहऱ्यावर लावावे. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण निघून जाण्यास मदत मिळते. 

कॉफी

Shutterstock

वर्क फ्रॉम होम करताना कॉफी तर फारच महत्त्वाची असते. मग ती प्यायला असो अथवा स्क्रब करायला. तुम्ही घरातून काम करत असताना कॉफीचा उपयोग स्क्रब म्हणूनही करू शकता. कॉफीमध्ये साधं पाणी मिसळून तुम्ही स्क्रब तयार करा आणि चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने तुमची त्वचा स्वच्छ होईल. 

चेहरा उजळवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत कॉफीचे आहेत फायदे

मुलतानी माती

Shutterstock

मुलतानी माती तर सगळ्यांच्या घरात असतेच. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी याचा खूपच फायदा मिळतो. मुलतानी मातीसह तुम्ही दही मिसळलं तर त्याचा अधिक उपयोग होईल. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास  मदत मिळते. तसंच मुलतानी मातीमुळे चेहरा मऊ आणि मुलायमही राहातो. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From DIY सौंदर्य