Fitness

सतत गोड खाण्याची इच्छा होतेय… तुमचे शरीर तुम्हाला देते हे संकेत

Leenal Gawade  |  Aug 18, 2020
सतत गोड खाण्याची इच्छा होतेय… तुमचे शरीर तुम्हाला देते हे संकेत

शरीरासाठी आवश्यक असलेल्या सगळ्याच गोष्टी आहारातून पोटात जाणे फारच आवश्यक असते.  पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य अशा गोष्टी आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतो. पण यासोबतच हल्लीच्या लाईफस्टाईलप्रमाणे पिझ्झा, बर्गर, केक या गोष्टीही आपल्या आहारात जात असतात. कधी आठवड्यातून एकदाच तर कधी रोजच आपण असे जंकफुड खात असतो. जंकफुड पूर्णत: वाईट आहेत असे नाही. पण त्याची Craving आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. या आधी आपण बर्गर, पिझ्झा खाण्याची इच्छा का होते हे जाणून घेतले. पण तुम्हाला माहीत आहे का गोड खाण्याची इच्छाही तुमच्या आरोग्यासंदर्भात काही संकेत देत असते. म्हणूनच आज जाणून घेऊया तुमचे शरीर गोड सतत खाण्याच्या इच्छेवरुन नेमके काय संकेत देते. 

बर्गर, पिझ्झासारखे फास्ट फुड खाण्याची का होते इच्छा, जाणून घ्या कारण

थायरॉईडची लक्षण

एखादा गोड पदार्थ खाण्याची इच्छा कधीतरी होणे ठिक असते. पण काही जणांना सतत गोड खायचे असते. अगदी कोणताही गोड पदार्थ त्यांना दिवसभर खावासा वाटतो. जर गोडाचे म्हणजेच साखरेचे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा तुम्हाला होत असेल तर ही थायरॉईडची लक्षण आहेत. तुमच्या थायरॉईड ग्रंथीवर अतिरिक्त गोड खाणे त्रासदायक ठरु शकते.  जर अशा व्यक्तिंना गोड पदार्थ खायला मिळाले नाही की, अशी व्यक्ती तणावाखाली जाते. 

उपाय : जर तुम्हाला सतत असे होत असेल तर तुम्ही काही सवयी बदला. भरपूर पाण्याचे सेवन करा.जर तुम्ही भरपूर कप कॉफी पित असाल तर तुम्हाला तेही कमी करायचे आहे. एक कप कॉफी इतकीच कॉफी तुम्हाला प्यायची आहे. कॉफीला पर्याय म्हणून तुम्ही हर्बल टी घ्यायला सुरु करा. असे पदार्थ खा ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहिल. उदा. ब्राऊन ब्रेड, ब्राऊन राईस इ.

जीभेच्या रंगावरून ओळखा तुमच्या आरोग्य समस्या

बॅक्टेरियामध्ये वाढ

Instagram

आपल्या निरोगी शरीरासाठी काही चांगल्या बॅक्टेरियाची गरज असते. तुम्ही सतत गोड पदार्थांचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया मरतात आणि वाईट बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य अनेकदा बदलते. तुमच्या शरीरात सतत साखर गेल्यामुळे यीस्ट संसर्ग होण्याची शक्यता असते. शरीरात यीस्ट वाढत राहिले की, त्याचा परिणाम तुमच्या प्रतिकारशक्तीवर होतो. 

उपाय : तुम्हाला जर सतत कॉफी प्यायची सवय असेल तर तुम्ही पूर्णपणे कॉफी बंद करा. त्याऐवजी तुम्ही तुमच्या आहारात दही घ्या. दिवसातून दोनवेळा दह्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. 

मेनोपॉझ

सतत दु:खी वाटणे, सेक्स करण्याची इच्छा नसणे, थकवा, डोकेदुखी, मासिक पाळीच्या तारखा बदलणे असे काही आजार तुम्हाला फार कमी वयात जाणवू लागले असतील तर याकडे गांभीर्याने पाहणे फारच गरजेचे आहे. ही सगळी लक्षण मेनोपॉझची असून तुमच्या आहारातील अति गोड पदार्थांचे सेवन या साठी कारणीभूत आहेत. जर तुम्ही खूप गोड खात असाल तर तुम्हाला आताच गोड पदार्थांचे सेवन थांबवणे फारच गरजेचे आहे. 

उपाय :  साखरेचे अति सेवन करण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही साखरेचे सेवन हळुहळू कमी करा. तुमच्या शरीरात जास्तीत जास्त प्रोटीन जाईल अशा पदार्थांचे सेवन करा. 

आता तुम्हाला साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्हाला हे काही त्रास असण्याची शक्यता असू शकते. 

Black Tea मुळे आरोग्य राहतं फिट, सौंदर्यासाठीही होतो उपयोग

Read More From Fitness