DIY सौंदर्य

अपर लिप्स झाले असतील काळे तर करा सोपे उपाय

Dipali Naphade  |  Aug 23, 2021
dark-skin-on-upper-lip-easy-home-remedies

बरेचदा आपल्या चेहऱ्याचा रंग अचानक काळा होऊ लागतो आणि आपल्याला कारण कळत नाही. त्याचे खरे कारण आहे डिस्कलरेशन. आपल्या त्वचेचा वेगवेगळा भाग यामुळे काळा होऊ लागतो आणि त्वचेवर वेगवेगळ्या ठिकाणी काळे डाग येतात. काही जणांना फ्रेकल्स येणे, काही जणांना सुरकुत्या येणे तर काही जणांना काळी वर्तुळं येणे असा त्रास होतो. तर यामध्ये अजून एक समस्या म्हणजे ओठ काळे पडणे. विशेषतः अप्पर लिप्स (upper lips). दोन्ही ओठ काळे पडतात पण त्यापैकी जास्त त्रासदायक ठरतो तो वरचा ओठ. लिप पिगमेंटेशन (lip pigmentation) काही घरगुती उपाय (home remedies for lip pigmentation) नक्कीच तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्ही प्रत्येकवेळी महागड्या उपायांचा आधार घेऊ नका. याचा परिणाम व्हायला वेळ लागतो मात्र नैसर्गिक असल्याने याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. अपर लिप्स काळे झाले असतील तर कोणते सोपे घरगुती उपाय करायचे ते आपण जाणून घेऊया पण त्याआधी याची नक्की काय कारणे आहेत ते बघूया. 

ओठ काळे होण्याची कारणे (Reason for dark lips)

ओठ काळे होण्याच्या मागे अनेक कारणे असू शकतात आणि ओठ काळे होणे हे हायपरपिगमेंटेशनच्या श्रेणीमध्येच येते. याची काही कारणे पुढीलप्रमाणे – 

आजकाल अनेक केमिकल उपचार, लेझर अथवा हायड्रोक्विनन उपचार अस्तित्वात आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या वरील ओठांचा काळेपणा घालवू शकता. पण त्याआधी तुम्ही घरगुती उपचारांचा नक्कीच वापर करून पाहिला पाहिजे. 

लिंबू आणि साखरेचा स्क्रब (Lemon and Sugar Scrub)

lemon and sugar scrub

काळ्या ओठांची समस्या तुम्हाला कोणत्याही अलर्जी अथवा उन्हाच्या त्रासामुळे झाली असेल तर तुम्ही ही समस्या काही दिवसांमध्ये कमी करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला हा घरगुती उपाय उत्तम ठरतो. 

डाळिंबामुळे होईल ओठांचा रंग गुलाबी (pomegranate) 

डाळिंबाच्या रसामध्ये एंजाईम्स असतात जे हायपरपिगमेंटेशच्या समस्येतून बाहेर येण्यासाठी मदत करतात. डाळिंबाचे सौंदर्यासाठी फायदे होतात. तुम्ही याचा उपयोग ओठांसाठी नक्कीच करू शकता. 

स्ट्रॉबेरी आणि बेकिंग सोड्याची कमाल 

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी आणि बेकिंग सोड्याची मदत घेऊ शकता. हादेखील चांगला घरगुती उपाय आहे. नक्की कोणत्या कारणाने ओठ काळे पडत आहेत हे माहीत नसेल तर याचा उपयोग करून पाहा. 

या टिप्सशिवाय तुम्ही बदामाचे तेल अथवा नारळाच्या तेलानेही ओठांचा मसाज रोज हलक्या हाताने केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. अपर लिप्सचा काळेपणा कमी करण्यासाठी अगदी सोपे आणि साधे उपाय आहेत ज्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल अथवा तुम्हाला कोणत्याही गोष्टींची अलर्जी असेल तर कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

अधिक वाचा – DIY – तिळाच्या तेलाने ओठांचा काळेपणा करा त्वरीत दूर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य