साडीची स्टाईल कधीच जुनी होत नाही. साडी नेसल्यानंतर आजकाल सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना अनेक साडी कोट्सही आपण शोधत असतो. पण जितकी साडी प्रिय तितकाच त्याचा ब्लाऊजही आपल्याला अधिक आकर्षक हवा असतो. स्टाईलच्या बाबतीत जर बघायचं झालं तर सध्या डीप नेक ब्लाऊज स्टाईल (Deep Neck Blouse) नक्कीच ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे तुम्हालाही सध्या कोणत्या कार्यक्रमांसाठी ब्लाऊज शिऊन घ्यायचे असतील आणि वेगवेगळे डीप नेक ब्लाऊज डिझाईन्स (Deep Neck Blouse Designs) हवे असतील तर या लेखाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा खोल गळ्याच्या ब्लाऊजच्या डिझाईन्सच्या पाच स्टाईल्स आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. तुम्हीही नक्की या स्टाईल फॉलो करा आणि दिसा अधिक आकर्षक!
1. स्वीटहार्ट नेकलाईन ब्लाऊज (Sweetheart Neckline Blouse)
काय आहे वैशिष्ट्य – या ब्लाऊजमध्ये दुप्पट्टा अशा तऱ्हेने ड्रेप करण्यात आला आहे की, तो केप आणि स्लिव्ह्ज या दोन्हीचा भास जाणवून देत आहे.
फॅशन टीप – तुम्हाला अशा डिझाईनचा आणि केप स्लिव्ह्ज (Cape sleeves) चा ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही वजनाला जरा हलका कपडा निवडा. तुम्ही स्लीव्ह्जशिवाय केवळ नेक डिझाईनदेखील कॉपी करून घेऊ शकता. तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी हा ब्लाऊज निवडत आहात त्यानुसार डिझाईन करा. लेहंग्यासह घालायचा असल्यास, अशी स्टाईल करा. साडीसाठी हवा असेल तर तुम्ही केवळ नेक डिझाईन करून स्टाईल करू शकता.
या फोटोमध्ये असणारा माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) लुक अधिक आकर्षक दिसत आहे कारण शिफॉनच्या कपड्यासह हे मिक्स करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित चालता आणि उठता बसता येऊ शकते. तसंच तुम्हाला हवा तसा डीप नेकही तुम्हाला मिळतो.
2. असिमेट्रीकल नेक लाईन (Asymmetrical Neckline)
काय आहे वैशिष्ट्य – या लुकमधील नेक डिझाईन हे मोठ्या नेकपीससाठी बनविण्यात आले आहे. तुम्हाला साडी अथवा लेहंग्यावर मोठा नेकलेस घालायचा असल्यास तुम्ही असे डीप नेक डिझाईन बनवू शकता. तसंच आधुनिक आणि क्लासिक याचा उत्तम मेळ या डिझाईन्समध्ये दिसून येतो.
फॅशन टीप – तुम्हाला असा डीप नेक ब्लाऊज शिवायचा असल्यास, चिकनकारी अथवा युनिक लुक देणारा कपडा यासाठी तुम्ही निवडा. याचे सिक्वेन्स डिझाईन हलके ठेवा आणि त्याचबरोबर हा ब्लाऊज स्टायलिशदेखील दिसायला हवा. याबरोबर तुम्ही 4 लेअरपर्यंत नेकलेस घालू शकता. तसंच तुम्ही कोणतेही स्टेटमेंट दागिने या ब्लाऊजसह मॅच करू शकता. या दागिन्यांमुळे डीप नेक ब्लाऊज अधिक उठावदार दिसेल.
3. इल्युजन नेकलाईन (Illusion Neckline)
काय आहे वैशिष्ट्य – या फॅशनच्या नेकलाईन त्या महिलांसाठी आहे ज्यांना डीप नेक ब्लाऊज घालायचा पण आहे आणि त्यांच्यासाठी डीप नेक ब्लाऊज घालणं थोडं अनकम्फर्टेंबल आहे. या डीप नेक ब्लाऊजमध्ये तुम्हाला हवी तशी स्टाईल करता येते आणि जास्त अंगही दिसत नाही.
फॅशन टीप – प्लेन नेटचा कपडा तुम्ही या फॅशनसाठी निवडा. तसंच तुम्ही सॉफ्ट टिश्यू फॅब्रिकचाही वापर या स्वरूपाच्या डीप नेक ब्लाऊजसाठी करू शकता. चिकनकारी कपडा असल्यास ही स्टाईल अधिक उठावदार दिसते. तसंच या ब्लाऊजवर तुम्ही कोणत्याही प्रकारचा नेकलेस घालू नका. सहसा या ब्लाऊजचे हात पूर्ण ठेवल्यास ही फॅशन अधिक उठावदार दिसते.
4. क्लासिक डीप कर्व्ह नेक (Classic Deep Curve Neck)
काय आहे वैशिष्ट्य – स्टेटमेंट नेकपीससह मोठा डीप कर्व्ह अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो. या नेकलाईनमध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट पाईपिंग करू शकता. जेणेकरून ब्लाऊजला बाजूला बाऊंड्री आहे असे जाणवते.
फॅशन टीप – क्लासिक डीप कर्व्हसाठी तुम्ही अधिक गडद रंगाचा कपडा निवडा. तसंच याला बारीक बॉर्डर लावायला विसरू नका. यासाठी तुम्ही मिरर वर्क अथवा गोटा पट्टीचा कपडा वापरा. लेहंगा अथवा साडी कोणत्याही कपड्यासह तुम्ही हा ब्लाऊज स्टाईल करू शकता. घरातील कोणत्याही कार्यक्रमासाठी हा ब्लाऊज सुंदरच दिसेल.
5. फ्रील नेकलाईन (Freel Neckline)
काय आहे वैशिष्ट्य – या स्वरूपाच्या नेकलाईनमुळे ब्लाऊजचा अधिक उठाव येतो. ब्लाऊजच्या बॉर्डरला फ्रील लाऊन तुम्ही एक वेगळे डिझाईन डीप नेक ब्लाऊजसाठी बनवू शकता.
फॅशन टीप – या डीप लाईन ब्लाऊजसाठी तुम्ही फ्रीलची साडी नेसणे अधिक सुंदर दिसते. तसंच तुम्ही मिसमॅच दागिनेही यासाह कॅरी करू शकता अथवा अशा कपड्यासह बंजारा, ऑक्सिडाईज्ड दागिने, मेटल दागिने घाला. सोन्याचे अथवा गडद दागिने यासह चांगले दिसणार नाहीत. तसंच फ्लोरल कपडा यासाठी अधिक सुंदर दिसतो. याखाली तुम्ही फ्लोरल लेहंगा अथवा फ्लोरल साडीचा पर्याय निवडा.
डीप नेक ब्लाऊजचे हे 5 डिझाईन्स कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला लेहंगा अथवा साड्यांवर अधिक चांगले आणि उठावदार दिसतील. गणपतीच्या सण संपून आता नवरात्रीचा सण येईल. त्यासाठी नक्कीच तुम्ही या डिझाईन्सचा विचार करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक