मनोरंजन

दीपिकाने केली अमिताभ बच्चन यांच्याकडे रणवीरची तक्रार आणि…

Dipali Naphade  |  Sep 7, 2021
deepika-and-faraha-Khan-in-KBC

‘कौन बनेगा करोडपती’चा 13 वा हंगाम (Kaun Banega Crorepati) सुरू झालाय आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच सेलिब्रिटींची हजेरी लागायलादेखील सुरूवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या खास सोहळ्यासाठी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि फराह खान (Farah Khan Kundar) या शुक्रवारी ‘शानदार शुक्रवार’च्या भागात हॉट सीटवर दिसणार आहेत. या सोहळ्याची शान वाढविण्याचे काम या दोघींनीही केले असल्याचे प्रोमोवरून दिसून येत आहे. तर आपल्या नेहमीच्या अंदाजात फराहाने मजेशीर वक्तव्य करून प्रेक्षकांनाही लोटपोट करून सोडले आहे. तर याबरोबरच या भागात इंडियन आयडॉल 12 चे सर्वोत्तम सहा स्पर्धक – पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश, सायली कांबळे, निहाल तौरो आणि षण्मुखप्रिया. आपल्या हृदयस्पर्शी आणि भक्तीरसप्रधान परफॉर्मन्सने ते शोमध्ये नवी ऊर्जा आणणार आहेत. 

अधिक वाचा – श्रुती मराठेचे लुक थक्क करणारे, दिसतेय अप्रतिम

दीपिका आणि रणवीरची नोकझोक 

Deepika Padukone and Amitabh Bachchan

दीपिका पादुकोण आणि फराह खान यांच्यातील प्रेम आणि मैत्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हॉटसीटवर बसून त्या दोघी एकामागून एक प्रश्नांची सफाईने उत्तरे देताना दिसणार आहेत. या भागात त्यांनी जिंकेलली रक्कम दीपिकाच्या ‘द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ला दान करण्यात येईल तसेच फराहकडून अयांश मदनच्या उपचारांसाठी रक्कम देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान दीपिकाने संधी मिळाल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्याकडे आपला नवरा रणवीरची (Ranveer Singh) तक्रार केली आहे. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर अनेक लाईक्स आणि कमेंट्स या प्रोमोला मिळत आहेत. लग्न झाल्यानंतर संसार कसा चालू आहे आणि दीपिकाच्या काय तक्रारी आहेत असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर दीपिकाने आतापर्यंत कधीही आपल्याला नाश्ता बनवून दिला नाही असे अमिताभ यांना सांगितले. अमिताभ यांनी रणवीरला याबाबत जाब विचारला असता आता तिला नक्की ऑम्लेट बनवून देईन आणि अगदी मांडीवर बसवून भरवेन असं उत्तर दिल्यानंतर सर्वच उपस्थितांना हसू आवरता आलेले नाही हे प्रोमोतून दिसून येत आहे. यावर आपल्या नेहमीच्या अंदाजात फराहाने रणवीरला फटकारलेदेखील आहे. 

अधिक वाचा – मृणाल ठाकूरला लागला जॅकपॉट, तूफाननंतर आता ‘थडाम’च्या हिंदी रिमेकमध्ये एन्ट्री

अमिताभने दिली ऑडिशन 

दरम्यान फराहाच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अमिताभ यांनी दीपिकाच्या प्रसिद्ध संवाद ‘एक चुटकी सिंदूर’चा आधार घेऊन ऑडिशनदेखील दिली आहे. हा प्रोमोदेखील सर्वांनाच आवडला आहे. त्यामुळे गणपतीच्या (Ganesh Chaturthi) दिवशीच्या या मनोरंजक भागाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपिका पादुकोण ही तर ‘लाखो दिलों की धडकन’ आहे. त्यामुळे दीपिका, अमिताभ आणि फराहा हे कॉम्बिनेशन अर्थातच खूपच मजेशीर आणि मनोरंजक ठरणार आहे हे नक्की. दीपिका आणि फराहा यातून मिळाणारे पैसे आपल्या संस्थांसाठी वापरणार असून गरजूंना याचा उपयोग करून देणार आहेत. शुक्रवारच्या भागात येणारे सेलिब्रिटी हे गरजू लोकांसाठी ही रक्कम वापरतात. तसंच या भागांचा टीआरपीदेखील अधिक असतो. यावेळच्या भागात काय धमाल होणार याची उत्सुकता आता प्रोमोमुळे सर्वांनाच लागून राहिली आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने दीपिका आणि फराहा या कार्यक्रमात आल्या होत्या. दीपिकाने करिअर फराहा खानमुळे घडले असे भावनात्मक होत दीपिकाने यावेळी सांगितले. तर यावेली गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत गणेशोत्सवही साजरा करण्यात आला. 

अधिक वाचा – या सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची चर्चा, पण…

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन