बिग बॉस

देवोलिना भट्टाचार्जीने केली साखरपुड्याची अधिकृत घोषणा

Vaidehi RajeVaidehi Raje  |  Feb 3, 2022
देवोलिना भट्टाचार्जीने केली साखरपुड्याची अधिकृत घोषणा

नुकतीच बिग बॉस 15 मध्ये झळकलेली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने अखेर लग्नाचा निर्णय घेतलाआहे. देवोलिनाने तिच्या साथ निभाना साथिया या प्रसिद्ध मालिकेतील  सहकलाकार विशाल सिंगसोबत तिच्या साखरपुड्याची अधिकृत  घोषणा केली आहे. साथ निभाना साथिया या स्टार प्लस वरील मालिकेत देवोलीनाने  गोपी मोदीची मुख्य भूमिका साकारली होती तर विशालने देवोलीनाचा धाकटा दीर  जिगर मोदीची सहाय्यक भूमिका केली होती. देवोलिना आणि विशाल यांचे एकमेकांशी अफेअर सुरु आहे या अफवा बऱ्याच दिवसांपासून पसरल्या होत्या. पण या दोघांनीही त्यावर आजवर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती.या दोघांनीही मात्र डेटिंगबद्दलच्या अफवा नाकारल्र्या नव्हत्या.काल या दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले. देवोलिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एका खास पोस्टसह त्यांच्या साखरपुड्याविषयी माहिती जाहीर करून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

दोघांनीही एकत्र पोस्ट शेअर केली

देवोलिना व विशाल या दोघांनीही  एकत्र पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी  त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये देवोलीना भट्टाचार्जीने एक सुंदर एंगेजमेंट रिंग घातलेली दिसतेय. फोटोत तिने तिच्या लंबर बेल्टखाली एक बहु-रंगी पोशाख परिधान केला आहे. तर विशालने ट्रेंडी शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम्स घातली आहे.  फोटोत देवोलीना तिची अंगठी सर्वांना दाखवतेय तसेच अंगठीचा तिचे चुंबन घेत आहे असे दिसतेय. त्यांच्या आयुष्यातील ही आनंदाची घटना सर्वांशी शेअर करताना हे दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तर एका फोटोत, विशाल गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला सुंदर फुलांचा गुच्छ देऊन प्रपोज करताना दिसत आहे. दोघांनीही सारखेच  फोटो शेअर केले आहेत आणि ‘हे अधिकृत आहे’ असे कॅप्शन दिले आहे. 

अधिक वाचा – झिम्मा’ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी, दुसऱ्या भागाची चर्चा सुरू

बिग बॉसमध्ये झाली दुखापत 

देवोलिना बिग बॉस 15 मधून बाहेर पडल्यावर तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली होती. बिग बॉसमधील पोल टास्क दरम्यान तिला जबर  दुखापत झाली होती.या टास्कसाठी पडण्यापूर्वी जवळजवळ 15 तास उभी राहिली होती आणि नंतर पडल्यामुळे तिला दुखापत झाली होती. देवोलिना आणि  तिची सह-स्पर्धक रश्मी देसाई यांनी पोल टास्क दरम्यान खूप चांगले प्रदर्शन केले आणि रात्रभर उभे राहूनही त्यांनी हार मानण्यास नकार दिला.  पण बिग बॉसची विजेती मात्र  तेजस्वी प्रकाश ठरली. 

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर व घरी परत आल्यानंतर देवोलीनाने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये  देवोलिना वॉकरच्या मदतीने चालताना दिसते आहे. जरी तिला त्रास होत असला तरी व्हिडिओमध्ये ती हसताना दिसत आहे. व्हिडिओबरोबरच देवोलीनाने तिचा बिग बॉसमधील अनुभव शेअर केला आहे. ती म्हणते की ,”मी पूर्णपणे विचलित झाले आहे. माझा BB15 प्रवास एक रोलर कोस्टर राईडप्रमाणे होता. मी मानसिक, शारीरिक आणि  भावनिकदृष्ट्या खूप चढ-उतारांचा सामना केला आहे. तुम्हाला माहिती आहे की, पोल टास्क दरम्यान मला दुखापत झाली आणि मला त्रास झाला. टास्क दरम्यान माझा तोल गेला आणि मी पडले. BB15 मधून बाहेर पडल्यावर मला तात्काळ नर्व्ह डीकंप्रेशन शस्त्रक्रिया करावी लागली.” 

बराच त्रास सहन केल्यावर आता मात्र देवोलिना आनंदात आहे आणि तिने तिचा आनंद सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. या नव्या जोडप्याला मनःपूर्वक शुभेच्छा! 

अधिक वाचा – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रंगणार सुरांची मैफल ‘मी वसंतराव’ 1 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बिग बॉस