DIY सौंदर्य

दिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब

Trupti Paradkar  |  Dec 13, 2020
दिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब

हिवाळा सुरू झाला की सर्वांच्या समोर कोरड्या आणि निस्तेज त्वचेची निगा राखण्याचा मोठा प्रश्नच निर्माण होतो. कारण जर तुमची त्वचा मुळातच कोरड्या प्रकारची असेल तर या वातावरणात त्वचेचे खूप हाल होतात. जस जसं वातावरणात बदल होतात तस जसं हिवाळ्याचे चार महिने त्वचा अधिक कोरडी होत जाते आणि त्वचेचा टवटवीतपणा कमी होतो. यासाठी खरंतर हिवाळा सुरु होण्याआधीपासूनच त्वचेची योग्य काळजी घेण्याची गरज असते. या समस्येकडे जितकं दुर्लक्ष कराल तितकं त्वचेचं नुकसान वाढत जातं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असे काही फेसस्क्रब शेअर करत आहोत जे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी नियमित वापरते. कोरड्या त्वचेला मऊ करण्यासाठी तुम्ही दिव्यांकाचं हे स्किन केअर नक्कीच फॉलो करू शकता.

हळद आणि बेसण –

जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर त्वचेवर स्क्रब लावणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील ड्राय स्किन निघून जाते. शिवाय बेसण आणि हळद अॅंटि फंगल अशल्यामुळे ते त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात

साहित्य –

कसा तयार कराल –

हळद आणि बेसण एकत्र करा आणि त्यात गरजेनुसार गुलाबपाणी मिसळत फेसस्क्रब तयार करा. चण्याचे पीठ दळताना ते जास्त बारीक करू नका. ज्यामुळे त्याचा खरखरीतपणा कायम राहील आणि त्वचेसाठी उत्तम स्क्रब तयार होईल. अंगाला हा स्क्रब लावा आणि वीस मिनिटांनी वॉश घ्या.

Instagram

साखर आणि पाणी –

जर तुम्हाला मुळीच वेळ नसेल तर अगदी पटकन होणारा आणि साहित्य कुठेही सहज मिळेल असा फेसस्क्रब तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.तुमच्या घरी तुम्हाला साखर आणि पाणी सहज उपलब्ध होईलच. पण जर तुम्ही घराबाहेर गेलेला असाल तर मार्केट अथवा हॉटेलमध्ये यातून तुम्ही तुमच्या त्वचेसाठी बेस्ट फेसस्क्रब तयार करू शकता.

साहित्य –

कसा तयार कराल –

साखर विरधळेल इतपत त्यात पाणी मिसळा. साखर विरघळू लागल्यावर त्याने चेहऱ्यावर हळूवार मसाज करण्यास सुरूवात करा. मात्र लक्षात ठेवा मसाज करताना चेहऱ्यावर हात मुळीत रगडू नका. वीस मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका.

मीठ आणि एरंडेल तेल –

जर तुमच्याकडे एरंडेल तेल असेल तर त्यात फक्त एक  चमचा मीठ टाकून तुमचा फेसस्कब तयार होईल. मीठामुळे तुमची त्वचा स्वच्छ होईल आणि तेलामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा येईल. जर तुमच्याकडे एरंडेल तेल नसेल तर तुम्ही कोणतेही फेशिअल तेल यासाठी वापरू शकता. जसं की नारळाचे तेल, बदाम तेल इ.

साहित्य –

कसा तयार कराल –

दोन्ही घटक एकत्र करा आणि तुमच्या चेहऱ्यावर त्याने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. या फेसस्क्रबमुळे तुमच्या त्वचेवरील घाण, प्रदूषण, मृत त्वचा आणि टॅन कमी होऊन त्वचेला मऊपणा मिळेल. वीस मिनीटांनी त्वचा साध्या पाण्याने धुवून टाका. 

Instagram

आम्ही शेअर केलेले फेसपॅक तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

एव्हरग्रीन माधुरी दीक्षित केसांची घेते अशी काळजी, सिक्रेट केले शेअर

मीरा राजपूतने शेअर केलं ब्युटी सिक्रेट, अशी घेते त्वचेची काळजी

वयाच्या 51व्या वर्षीही अभिनेत्री भाग्यश्रीसारखी त्वचा हवी असेल तर आहे हे सिक्रेट

Read More From DIY सौंदर्य