त्वचेची काळजी अथवा निगा राखण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. मात्र जेव्हा त्वचेची काळजी घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतो तेव्हा त्वचेच्या समस्या निर्माण होतात. पिंपल्स, काळेडाग अथवा त्वचेवरील व्रण, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन अशा अनेक समस्यांना महिलांना तोंड द्यावे लागत असते. या त्वचेच्या समस्या निर्माण होण्यामागची कारणं खरंतर निरनिराळी असू शकतात. मात्र जीवनशैलीत थोडेसे बदल करून आणि घरगुती सौंदर्योपचार करून तुम्ही तुमच्या त्वचेचं सौंदर्य पुन्हा खुलवू शकता.घरच्या घरी केलेल्या या उपायांमुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. यासाठीच आज आम्ही तुमच्यासोबत विड्याच्या पानांपासून तयार केला जाणारे होममेड फेसपॅक शेअर करत आहोत. हे फेसपॅक वापरा आणि तुमच्या त्वचेची निगा राखा.
Shutterstock
विडयाच्या पानांचा उपयोग –
विड्याची पानं खाण्यासाठी आणि धार्मिक पूजाविधींसाठी नेहमीच वापरली जातात. बरेचदा या पानांपासून आईस्क्रीम, लाडू, पेठे, मिठाई तयार केली जाते. मात्र विड्याची पानं तुमच्या सौंदर्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहेत. या पानांमधील पोषकतत्त्वांमुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स, डार्क सर्कल्स कमी होतात. नियमित या पानांपासून तयार केलेला फेसपॅक वापरल्यास तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते. यासाठी जाणून घ्या विड्याच्या पानांपासून घरगुती फेसपॅक कसे तयार करावे.
Shutterstock
विड्याच्या पानापासून तयार करा हे घरगुती फेसपॅक
विड्याची पाने आणि स्वयंपाकघरातील काही वस्तूंचा वापर करून तुम्ही घरच्या घरी हे फेसपॅक तयार करू शकता.
फेसपॅक 1
साहित्य –
दोन ते तीन विड्याची पाने, अर्धा चमचा बेसन, अर्धा चमचा चंदन पावडर, एक चमचा मुलतानी माती
कसा तयार कराल
विड्याची पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यामध्ये बेसन, चंदन पावडर आणि मुलतानी माती मिसळून एक छान पेस्ट तयार करा. तुमच्या गरजेनुसार तुम्ही या पेस्टमध्ये पाणी अथवा गुलाबपाणी मिक्स करू शकता. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहऱ्या कोमट अथवा थंड पाण्याने धुवा.
फेसपॅक 2
साहित्य –
दोन ते तीन विड्याची पाने, पाव चमचा हळद
कसा तयार कराल
विड्याची पाने मिक्सरमध्ये वाटून घ्या. विड्याच्या पानांची पेस्ट एका भांड्यात अथवा वाटीत काढा. त्यात हळद मिसळा आणि फेसपॅक पातळ करण्यासाठी थोडं पाणी त्यात टाका. मिश्रण एकत्र करून तयार झालेला फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरील अशा भागांवर लावा जिथे काळे डाग, व्रण, सुरकुत्या अथवा पिंपल्स आहेत. पंधरा मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. चांगल्या परिणामासाठी महिन्यातून तीनदा अथवा आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
Shutterstock
विड्याच्या पानांपासुन तुम्ही हे फेसपॅक तयार केले का आणि त्याचा तुमच्या त्वचेवर काय परिणाम झाला हे आमच्यासोबत जरूर शेअर करा. शिवाय तुम्हाला आमच्याकडून आणखी कोणते विषय जाणून घ्यायला आवडतील हे ही कळवा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा –
चेहऱ्यावरील लव होईल कमी, असा करा कच्च्या पपईचा वापर
धुतलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर करून खुलवा तुमचे सौंदर्य