त्वचेची काळजी

DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क

Trupti Paradkar  |  Oct 29, 2019
DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क

सणासुदीला सुंदर आणि आकर्षक दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं. चमकदार आणि तेसज्वी कांती  मिळवण्यासाठी मोठमोठ्या ब्युटी ट्रिटमेंट अथवा खर्चिक उपाययोजना करायला हव्या असं मुळीच नाही. घरातच तयार केलेले काही नैसर्गिक फेसपॅक किंवा फेसमास्क तुम्हाला अगदी छान इफेक्ट देऊ शकतात. सध्या गाजराचा सिझन सुरू होत आहे. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन,  व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के असे अनेक गुणधर्म असतात. गाजर जितकं तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं तितकंच ते तुमच्या त्वचेसाठीदेखील पोषक ठरतं. गाजरामधील पोषक घटकांमुळे त्वचेवरील धुळ, प्रदूषण, डेड स्कीन निघून जाते आणि त्वचा नैसर्गिक पद्धतीने ग्लो करू लागते. तेव्हा घरातील गाजराचा वापरून हे फेसमास्क तयार करा आणि चेहऱ्यावर इन्संट ग्लो मिळवा. 

shutterstock

गाजराचा वापर करून तयार करा हे होममेड फेसपॅक

गाजराचा फेसपॅक प्रकार 1

दोन मध्यम आकारच्या गाजराचा कीस अथवा पल्प, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे मध, एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. सर्व साहित्य एकत्र करा. सर्व साहित्य मिक्स करून एक फेसपॅक तयार करा. मिश्रण एकसमान होईल याची काळजी घ्या. हा फेसपॅक चेहऱ्यावर एकसमान लावून घ्या. वीस मिनीटांनी फेसपॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. 

गाजराचा फेसपॅक प्रकार 2

दोन चमचे गाजराचा रस, एक चमचा काकडीचा रस आणि काही थेंब ग्लिसरीन घ्या. सर्व मिश्रण एकत्र करा आणि फेसपॅक तयार करा. या फेसपॅकमुळे तुमच्या कोरड्या त्वचेचं चांगलं रक्षण होईल. त्वचेतील कोरडेपणा जाऊन त्वचा मऊ  आणि मुलायम होईल. हिवाळ्यासाठी हा फेसपॅक अगदी बेस्ट आहे. 

गाजराचा फेसपॅक प्रकार 3

एका गाजराचा  कीस, एक उकडलेला बटाटा आणि एक चमचा ओटमील घ्या. ते एकत्र करून त्याचा एक फेसपॅक तयार करा. मिश्रण एकजीव करून घ्या. चेहरा आणि मानेवर हे मिश्रण एकसमान लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा. ज्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ करा. चेहरा कोमट पाण्याने धुवा. 

गाजराचा फेसपॅक प्रकार 3 –

दोन चमचे गाजराचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर एकसमान लावा. वीस मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा यामुळे कमी होतात. चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स, सुरकुत्या  कमी करण्यासाठी हा एक बेस्ट फेसपॅक आहे. 

shutterstock

गाजराचा वापर केल्यामुळे होतील हे फायदे –

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

चांगल्या डिओड्रंटच्या शोधात,मग हे डिओड्रंट आहेत तुमच्यासाठी बेस्ट

सणासुदीसाठी असे करा झटपट फेशियल आणि मिळवा ग्लो

सणासुदीला मिळवायचा असेल चमकदार चेहरा तर करा वाफेचा उपयोग

 

Read More From त्वचेची काळजी