Natural Care

त्वचेसाठी घरीच बनवा लेमन टोनर, जाणून घ्या याचे फायदे

Trupti Paradkar  |  Jan 28, 2021
त्वचेसाठी घरीच बनवा लेमन टोनर, जाणून घ्या याचे फायदे

प्राचीन काळापासून निरोगी राहण्यासाठी आहारात लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. लिंबाच्या रसामुळे अन्नाला स्वाद तर येतोच शिवाय अन्न शुद्धही होतं. नियमित अन्नात लिंबाचा रस वापरण्यामुळे अथवा लिंबू सरबत पिण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. कारण लिंबात कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे अनेक पोषक घटक असतात. लिंबाचा रस जितका आरोग्यासाठी उत्तम आहे तितकाच तो तुमच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे. यासाठीच लिंबाच्या रसाचा वापर त्वचा, केस, नखे, दातांवर केला जातो. घरच्या घरी तुम्ही तुमच्या त्वचेसाठी लिंबापासून लेमन टोनर बनवू शकता. या टोनरमुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. शिवाय त्वचेवर उजळपणा आणि ग्लोदेखील येईल. यासाठीच जाणून घ्या लेमन टोनर कसे बनवावे आणि त्याचे फायदे 

होममेड लेमन टोनर

लेमन टोनर घरीच बनवणं अगदी सोपं आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

साहित्य  –

लेमन टोनर बनवण्याची पद्धत –

shutterstock

लेमन टोनरचे फायदे

नियमित लेमन टोनर वापरण्याचे अनेक फायदे आहेत यासाठी जाणून घ्या ते त्वचेच्या कोणत्या समस्येसाठी वापरावं.

त्वचा स्वच्छ करण्यासाठी

त्वचा नियमित स्वच्छ करण्यासाठी एखाद्या क्लिंझरप्रमाणे तुम्ही लेमन टोनर वापरू शकता. कारण लिंबामध्ये क्लिंझिंग इफेक्ट्स असतात. त्वचेला स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्वचेवर थोडंसं लेमन टोनर लावून त्वचेला हलक्या हाताने मसाज करू शकता. ज्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होईल. त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचे कण, डेडस्किन यामुळे निघून जाईल.  शिवाय कोरफड आणि गुलाबपाण्यामुळे त्वचेला थंडावाही मिळेल. मसाज केल्यावर कॉटनपॅड गुलाबपाण्यात बुडवून त्वचा पुसून घ्या आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. 

तेलकट त्वचेसाठी वरदान

लेमन टोनर तेलकट त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.जर तुमची त्वचा खूपच तेलकट असेल तर त्वचेवर नियमित लेमन टोनरचा वापर करा. ज्यामुळे हळू हळू त्वचेवरील तेलकट थर कमी होईल. त्वचेला चांगलं पोषणही मिळेल. ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार दिसेल. घराबाहेर जाताना लेमन टोनरही स्प्रे बॉटल तुम्ही कॅरी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला कुठेही पटकन फ्रेश होता येईल. चांगला परिणाम हवा असेल तर वापरण्यापूर्वी लेमन टोनरची बॉटल थोडावे फ्रीजमध्ये ठेवा. 

shutterstock

चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतील

लेमन टोनर वापरण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग विरळ होतात. बऱ्याचदा चेहऱ्यावर पिंपल्स, पिगमेटेंशन, सनटॅनमुळे काळे डाग निर्माण होतात. यातील काही डाग मोठमोठ्या ब्युटी ट्रिटमेंटनेही कमी होत नाहीत. मात्र जर तुम्ही नियमित लेमन टोनर वापरलं चर हे डाग विरळ होत जातात. शिवाय यामुळे तुमची त्वचा चांगल्या प्रकारे टोनही होते. मात्र जर चेहऱ्यावर पिंपल्समुळे जखमा झाल्या असतील तर त्यावर लेमन टोनर वापरू नका. कारण लिंबामुळे तुमच्या त्वचेवर दाह आणि जळजळ होऊ शकते.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

दिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब

नाक अथवा कान टोचण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी

सकाळी उठल्यावर चेहरा दिसत असेल सूजलेला तर करा हे उपाय

Read More From Natural Care