DIY सौंदर्य

घरीच तयार करा कोणत्याही त्वचेसाठी हायड्रेटिंग सीरम

Leenal Gawade  |  Nov 26, 2020
घरीच तयार करा कोणत्याही त्वचेसाठी हायड्रेटिंग सीरम

त्वचा हायड्रेट राहावी म्हणून तुम्ही काय करता? असा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्याकडे याची बरीच उत्तरे असतील आणि बरेच उपायही असतील. पण तुम्ही कधी स्वत:साठी काही ब्युटी प्रोडक्टस बनवण्याचा विचार  केला आहे. DIY  ब्युटीचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील त्यातील आम्हाल चांगलेल्या काही सीरम रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.  हे सीरम आम्ही वापरले असून त्याचा उपयोग कधी कोणत्याही त्वचेला करता येऊ शकतो असा आहे. चला तर आज जाणून घेऊया हायड्रेटिंग सीरम बनवण्याची रेसिपी

फेस सीरम तुमच्या त्वचेवर आणेल ग्लो, जाणून घ्या बेस्ट फेस सीरम

ग्रीन टी सीरम

Instagram

ग्रीन टी त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे हे आतापर्यंत अनेकांना माहीत असेल. ग्रीन टी मध्ये असलेले अँटी- ऑक्सिडंट त्वचेवरील जुने व्रण कमी करण्यास मदत करतात. याच्या नित्य उपयोगाने त्वचेच्या अनेक समस्या नियंत्रणात येतात. त्वचा आतून हायड्रेट ठेवण्याचे काम हे सीरम करते. 

साहित्य: ग्रीन टी, लिंबाचा रस, अॅलोवरा जेल, पाणी 

कृती : 

घरच्या घरी बनवा असे फेस सीरम जे देतील तुमच्या त्वचेला ग्लो (Homemade Face Serum)

अॅलोजेल फेस सीरम

Instagram

कोरफडीचा गर हा अनेक ब्युटी रेजिममध्ये वापरला जातो. थंडावा देण्यासोबतच त्वचा अधिक चांगली करण्याचे काम अॅलोवेराज जेल करते.  त्यामुळे त्याचा उपयोग करुनही तुम्ही एक सीरम जेल बनवू शकता. जे तुम्हाला अगदी कधीही वापरता येईल. मेकअप काढल्यानंतर जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर हे सीरम तुम्हाला वापरता येईल. 

साहित्य: अॅलोवेरा जेल, गुलाबपाणी, व्हिटॅमिन E एक कॅप्सुल 

कृती:

फेस टोनर की फेस सीरम उत्तम त्वचेसाठी कशाची करावी निवड (Face Toner Vs Face Serum)

रोझ फेस सीरम

Instagram

गुलाब पाण्याचे त्वचेसाठी फारच उपयोग आहे . पण गुलाबपाण्यासोबत काही आणखी चांगल्या घटकांचा समावेश करण्यात आला तर ते सीरम अधिक फायदेशीर ठरते. हे सीरम बनवायला फारच सोपे आहे. 

साहित्य: गुलाबाच्या पाकळ्या, बदामाचे तेल एक चमचा, इसेन्शिअल ऑईल 

कृती : 

स्प्रे बॉटलमध्ये मिश्रण भरुन ते दिवसातून दोनवेळा वापरा.


हे फेस सीरम जास्त काळ टिकवायचे असेल तर तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवा. काही त्रास होत असेल तर त्याचा वापर लगेचच करणे बंद करा. 

Read More From DIY सौंदर्य