हिवाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यातही ओठांचा मऊपणा निघून जातो. पाण्याची कमतरता जाणवायला लागली की ओठही सुकतात. हिवाळ्याप्रमाणेच तुम्हाला उन्हाळ्यातही ओठांची तितकीच काळजी घ्यावी लागते. अन्यथा ओठ खराब होतात. खरं तर ओठ हा असा अवयव आहे जो अत्यंत मऊ आणि मुलायम असून त्याची नियमित काळजी घेणे गरजेचे आहेत. प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला ओठांच्या काळजीसाठी लिप स्क्रब करण्याची गरज आहे. ओठांना स्क्रब केल्याने ओठ अधिक मऊ आणि मुलायम होतात. बॉलीवूडमधील काही अभिनेत्रीही घरच्या घरी स्क्रब करतात आणि त्यापैकी एक नाव म्हणजे प्रियांका चोप्रा जोनस (priyanka chopra jonas). प्रियांकाने आपण कशाप्रकारे घरीच लिप स्क्रब तयार करतो आणि वापरतो ते सांगितलं आहे. तुम्हीही गुलाबी ओठांसाठी अशा प्रकारे लिप स्क्रब घरीच करू शकता.
लिप स्क्रब बनविण्याची पद्धत (DIY for lip scrub)
Freepik
लिप स्क्रब तयार करण्यासाठी घरातील गोष्टी तुम्ही वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला बाजारातून वेगळं काहीही आणण्याची गरज भासणार नाही.
- यासाठी सर्वात पहिले एक बाऊल घ्या
- यामध्ये गुलाबपाणी आणि साखर एकत्र मिक्स करून घ्या
- मिक्स करून झाल्यावर हलक्या हाताने ओठांना हे मिश्रण अर्थात हे स्क्रब लावा आणि मसाज करा
- यामुळे ओठांवरील डेड सेल्स निघून जातील आणि ओठ फाटले असतील तर तेदेखील कमी होईल. तसंच ओठ सुकले असतील तर मऊ आणि मुलायम होण्यास मदत मिळेल
गुलाबी ओठांसाठी स्क्रब
तुम्हाला तुमचे ओठ नियमित गुलाबी ठेवायचे असतील तुम्ही अशा प्रकारे स्क्रब तयार करून त्याचा उपयोग करू शकता. जाणून घ्या पद्धत –
- गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या घ्या आणि अर्धा चमचा साखर घ्या
- गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर व्यवस्थित मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा
- ही पेस्ट ओठांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा
- यामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाईल. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्येही गुलाबपाणी मिक्स करू शकता
आठवड्यातून एक वेळा तुम्ही याचा प्रयोग करून गुलाबी ओठ नक्कीच मिळवू शकता
आकर्षक ओठ करणारी ‘लिप ब्लशिंग’ ट्रिटमेंट नक्की काय आहे
साखर आणि मध
Shutterstock
गुलाबी आणि मुलायम ओठांसाठी तुम्ही मध आणि साखरेचा वापर करू शकता. मध वापरल्याने ओठांवर मॉईस्चराईज टिकून राहाते. तर साखरेचा वापर केल्याने ओठ मुलायम होतात.
- साखर आणि मध एकत्र करून घ्या
- मधात साखर घालण्यापूर्वी ती क्रश करून घ्या
- या मिश्रणाने ओठांवर स्क्रब करा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही ओठांवर स्क्रब करू शकता. यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि मऊ होतील
गुलाबी रंगाचे ओठ हवे असतील तर करा घरीच Lip Balm तयार
ऑलिव्ह ऑईल
Freepik
ओठांना स्क्रब करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचाही उपयोग करून घेऊ शकता. याचा उपयोग कसा करायचा जाणून घ्या.
- एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा चमचा साखर घ्या
- हे मिश्रण तुम्ही टूथब्रशला लावा आणि मग ओठांवर लावा
- हलक्या हाताने स्क्रब करा
- 2 मिनिट्स तसं ठेवा आणि मग हलक्या हाताने ओठांचा मसाज करा
- नंतर ओठ पाण्याने धुवा आणि मग ओठांवर पेट्रोलियम जेली लावा
- यामुळे ओठ गुलाबी होण्यासह मऊ आणि मुलायमही होतात
गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक