DIY सौंदर्य

घनदाट केसांसाठी वापरा कांद्याचा हेअरमास्क

Dipali Naphade  |  Apr 23, 2021
घनदाट केसांसाठी वापरा कांद्याचा हेअरमास्क

कोणाचेही लांबसडक आणि घनदाट केस पाहिल्यावर नक्कीच आपल्याला पण असे केस हवे असं वाटतंच. पण मोठ्या केसांची निगा राखणं आणि केस घनदाट बनवणं हे नक्कीच सोपं काम नाही. चमकदार केसांसाठी अनेक जण नारळाचे तेल, अंडे आणि बिअर मास्कचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? लांबसडक आणि घनदाट केसांसाठी (thick hair) तुम्हाला घरातील कांद्याचा चांगला वापर करून घेता येऊ शकतो. कांद्याच्या रसाने बनलेला हेअरमास्क वापरल्याने केस अधिक चमकदार आणि घनदाट होतात. तसंच याचा कोणताही तोटा होत नाही. आजकाल अनेक सलॉनमध्येही कांद्याच्या रसाचा वापर करण्यात येतो. पण पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये घालण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीही याची व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊ शकता अथवा नियमित कांद्याच्या रसाचा वापर करून तुम्ही तुमचे केस अधिक घनदाट करू शकता. घनदाट केसांसाठी नक्की कांद्याच्या रसाचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया. हेअरमास्क बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत खास तुमच्यासाठी. 

केसांना तेल लावण्याचे फायदे, होतात घनदाट आणि लांब

कांद्याच्या रसाचा हेअरमास्क बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत (Oninon hairmask for thick hair)

सुंदर केसांसाठी कांदा हा फार फायदेशीर असतो. कांद्याचा अर्क हा केसांच्या वाढीसाठी फारच चांगला असतो. म्हणूनच हल्ली कांद्याचा तेल, कांद्याचा पॅक आणि कांदा सीरम असे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात. सुंदर, जाड, सिल्की केसांसाठी कांद्याचा उपयोग करायचा विचार करत असाल तर तुम्ही कांदा पावडरचा उपयोग करु शकता. कांद्याची पावडर बाहेरुन आणायची गरज नाही ही कांदा पावडर तुम्ही घरीच करु शकता. कांदा पावडर बनवायला तुम्हाला वेळ नसेल तर कांद्याच्या रसाचा हेअरमास्क बनवून त्याचा नक्की कसा वापर करायचा ते जाणून घेऊया. तुम्ही घरच्या घरी ही पद्धत वापरू शकता. 

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

कॅस्टर ऑईलचे फायदे (Castor Oil benefits for hair)

Shutterstock

हेअरमास्क बनविण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसासह कॅस्टर ऑईलचा वापर करा. कॅस्टर ऑईल हे केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणारे रिकोनोलेईक अॅसिड आणि ओमेगा 6 हे रक्तप्रवाह चांगला राखण्यास मदत करते. केसांना मुलायम आणि मऊ राखण्यासाठीही याचा खूपच फायदा होतो. त्यामुळे कांद्याच्या रसासह मिक्स करून तुम्ही याचा उपयोग करून घ्या. याचा परिणाम तुम्हाला काही महिन्यातच दिसून येईल. तुमचे केस पटापटा वाढायला सुरूवात होऊन घनदाटही होतील. इतकंच नाही तर केसगळती थांबविण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा याचा नक्की उपयोग करून घ्या. 

सुंदर केसांसाठी अशी तयार करा कांदा पावडर, असा करा वापर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य