DIY सौंदर्य

त्वचेवर येईल ग्लो, वापरा लाल भोपळ्याचा होममेड फेसपॅक

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jan 19, 2021
त्वचेवर येईल ग्लो, वापरा लाल भोपळ्याचा होममेड फेसपॅक

 

त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्न करत असता. मात्र यासाठी महागड्या ट्रिटमेंट करण्यापेक्षा घरातच अनेक उपाय तुम्हाला करता  येऊ शकतात. जर घरी करता येण्यासारखे नैसर्गिक उपाय तुम्हालाही आवडत असतील तर तु्म्ही लाल भोपळ्याचा वापर फेसपॅक तयार करण्यासाठी अवश्य करा. कारण  लाल भोपळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरतात आणि याशिवाय तुमच्या आरोग्यासाठीही भोपळा उत्तम आहे. भोपळ्यातील अॅंटि ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी मुळे तुमची त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय तुमच्या त्वचेवर ग्लो देखील येतो. घरच्या घरी अशी त्वचा स्वच्छ, नितळ आणि चमकदार करण्यासाठी लाल भोपळ्यापासून  तुम्ही फेसपॅक, फेसमास्क तयार करू शकता. यासाठीच जाणून घ्या लाल भोपळ्याचा वापर फेस मास्कसाठी कसा करावा.

लाल भोपळ्यापासून बनवा हा होममेड फेसमास्क

 

घरच्या घरी असं तयार करा लाल भोपळ्याचा फेसपॅक

साहित्य –

लाल भोपळ्याचा होममेड फेस मास्क बनवण्याची पद्धत –

लाल भोपळ्याच्या फेसमास्कचा फायदा –

 

लाल भोपळ्यामध्ये भरपूर अॅंटि ऑक्सिडंट, बीटा कॅरेटीन, व्हिटॅमिन ए, सी आणि ई  असते. जे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. लाल भोपळ्यामुळे तुमची त्वचा नैसर्गि पद्धतीने स्वच्छ होते. शिवाय त्वचेचं योग्य पोषण झाल्यामुळे त्वचेवर चमक दिसते. जायफळ हा मसाल्याचा एक पदार्थ असला तरी जायफळचा वापर अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 6, मॅग्ननीज, मॅग्नेशिअम, कॉपर असे अनेक घटक असतातत. त्वचेवरील काळे डाग, व्रण, डार्क सर्कल्स, सनटॅन कमी करण्यासाठी जायफळ त्वचेसाठी फायदेशीर ठरते.मध, हळद आणि अॅपल सायडर व्हिनेगर मुळे त्वचेला फायदा होतो. या सर्व घटकांच्या एकत्र मिश्रणामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेच्या कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळते. तुम्ही लाल भोपळा आणि जायफळ पावडरसोबत इतर नैसर्गिक पदार्थ वापरून निरनिराळ्या प्रकारचे फेस मास्क, फेस स्क्रब आणि क्लिंझर तयार करू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचा स्वच्छ आणि टवटवीत होईल. 

 

आम्ही शेअर केलेला हा लाल भोपळ्याचा फेसपॅक तुम्हाला कसा वाटला आणि तो वापरून तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट मध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे यासोबतच मायग्लॅमचे ब्युटी प्रॉडक्टदेखील वापरा. 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे कमळाचे तेल, जाणून घ्या फायदे

अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी

लाल चंदनमुळे कमी होतील चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग

Read More From DIY सौंदर्य