पाठीवर पिंपल्स येण्यामागची कारणं अनेक असू शकतात. अस्वच्छता, त्वचा संवेदनशील असणं, सौदर्यप्रसाधनांचा अती वापर, हॉर्मोनल बदल अशा अनेक कारणांमुळे तुमच्या पाठीवर पिंपल्स येऊ शकतात. कारण कोणतंही असलं तरी त्यामुळे तुमचा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. कारण सतत पाठीवर कपड्यांचा स्पर्श झाल्यामुळे ते चिघळतात आणि त्यामुळे जळजळ होते. जर तुम्हाला तुमच्या पाठीवर कधीच पिंपल्स येऊ नयेत असं वाटत असेल किंवा पाठीवरचे पिंपल्स लवकर कमी व्हावेत असं वाटत असेल तर त्यावर घरगुती उपाय ट्राय करा. यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही घरगुती स्किन केअर मास्क शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला आराम मिळेल.
पाठीचे पिंपल्स दूर करण्यासाठी घरगुती मास्क
घरात असणाऱ्या काही गोष्टींपासून तुम्ही हे स्किन केअर मास्क तयार करू शकता. ज्यामुळे तुमच्या पाठीवरचे पिंपल्स सहज कमी होतील.
गुलाबपाणी आणि लिंबाचा मास्क –
गुलाबपाणी आणि लिंबू दोन्ही नैसर्गिक अस्ट्रिजंट आहेत. लिंबाच्या रसामुळे तुमच्या पाठीवरचे अतिरिक्त तेल निघून जाईल आणि गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल.
कसा तयार कराल मास्क –
गुलाबपाण्यात थोडं लिंबू पिळा आणि कॉटन पॅडच्या मदतीने हा मास्क तुमच्या पाठीच्या पिंपल्सवर लावा. रात्रभर तो तुमच्या पाठीवर राहू द्या आणि सकाळी धुवून टाका. या पॅकमुळे पिंपल्समुळे होणारी जळजळदेखील नक्कीच कमी होईल.
Shutterstock
दालचिनी आणि मध –
कोणतेही इनफेक्शन टाळण्यासाठी दालचिनीचा आहारात वापर करण्याचा सल्ला दिला जातो कारण दालचिनी अॅंटि बॅक्टेरिअल आहे. पाठीवर इनफेक्शनमुळे आलेले पिंपल्सदेखील दालचिनीच्या या मास्कमुळे कमी होऊ शकतात.
कसा तयार कराल मास्क –
दोन चमचे मधात एक चमचा दालचिनी पावडर मिसळा. यात तुम्ही थोडा लिंबाचा रसही मिसळू शकता. हे मिश्रण तुमच्या पाठीवरच्या पिंपल्सवर लावा आणि वीस मिनिटांनी अंघोळ करा.
टोमॅटो मास्क –
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर असते. ज्यामुळे तुमच्या पाठीवरचे पिंपल्स टोमॅटोचा रस लावण्यामुळे नक्कीच कमी होऊ शकतात.
कसा तयार कराल मास्क –
टोमॅटो स्मॅश करूम त्याचा पल्प काढा आणि तो गर आणि रस तुमच्या पाठीवर लावा. वीस ते पंचविस मिनिटांनी पाठ स्वच्छ धुवून टाका.
हळद आणि पुदिना –
हळदीमुळे तुमच्या पाठीवपते इनफेक्शन कमी होते आणि पुदिन्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. यासाठीच हा बॉडी पॅक देखील अवश्य करून पाहा.
कसा तयार कराल मास्क –
पुदिन्याची पाने वाटून त्याचा रस काढा आणि त्यामध्ये चिमूटभर हळद मिसळा. हा रस पाठीवर लावा आणि वीस मिनिटांनी स्वच्छ अंघोळ करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या पाठीवरचे पिंपल्स कमी होतीलच शिवाय उन्हाळात पाठीवर घामोळे देखील येणार नाहीत.
Shutterstock
चंदन आणि मध –
चंदन हा त्वचेची काळजी घेण्याचा एक उत्तम घरगुती उपाय आहे. त्यामुळे पाठीवरचे पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही नक्कीच चंदन वापरू शकता.
कसा तयार कराल मास्क –
चंदन पावडरमध्ये थोडं मध आणि दूध मिसळा. हा मास्क व्यवस्थित एकत्र करा आणि पाठीवरच्या पिंपल्सवर लावा. यामुळे तुमच्या पाठीला थंडावा मिळेल. वीस मिनिटांनी कोमट अथवा साध्या पाण्याने अंघोळ करा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
जाणून घ्या स्काल्पवर पिंपल्स येण्याची कारणं आणि घरगुती उपाय
लाल चंदनमुळे कमी होतील चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग
अंघोळ करताना तुम्ही शॉवरखाली धुता का चेहरा, जाणून घ्या दुष्परिणाम