DIY सौंदर्य

केसांच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी वापरा तुळशीचे DIY मास्क

Dipali Naphade  |  Jan 31, 2022
diy-tulsi-leaves-hair-mask

केसांची समस्या कोणाला नाही असं या जगात कोणीच नसेल कदाचित. हल्ली तर लहान मुलांमध्ये केस गळती बघायला मिळते आणि तसे नाही झाले तर एका ठराविक वयानंतर केसांची समस्या ही होतेच. कोणाचे केस वाढत नाहीत तर कोणाला केसगळतीचा त्रास होतो तर कोणाचे केस वयाच्या आधीच पांढरे होतात. पण केसांच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही तुळशीचे DIY हेअर मास्क वापरू शकता. वाचून थोडं आश्चर्य वाटलं ना? पण हो तुळशीचे रोपटे सहसा सर्वांच्या घरात असते. तुळशीच्या रोपट्याचा केसांसाठी चांगलाच फायदा होतो अर्थातच तुळशीचे फायदे अनेक आहेत. तुळशीमध्ये अनेक औषधीय गुण असून केसांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. तुळशीच्या वापरामुळे केसांमधील कोंडा आणि केसांमधील कोरडेपणा दूर होण्यासाठी मदत मिळते. तसंच केसगळतीची समस्याही यामुळे निघून जाते. तुळशीचा हेअरमास्क वापरल्याने ब्लड सर्क्युलेशनही योग्य राहाते. घरी कशाप्रकारे तुळशीचे घरगुती हेअरमास्क बनवायचे आणि त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.  

तुळशीच्या पानात मिक्स करा हेअर ऑईल (Tulsi Hair Mask with Hair Oil) 

तुम्हाला घनदाट आणि मऊ, मुलायम केस हवे असतील तर तुम्ही तुळशीच्या पानांमध्ये हेअर ऑईल मिक्स करून त्याचा वापर करून घेऊ शकता. 

या तेलाचा वापर केल्याने केसगळती थांबते आणि त्याशिवाय केस अधिक मुलायम आणि मऊ होतात. तसंच केसांमध्ये चमक राहाते. 

पांढऱ्या अर्थात सफेद केसांसाठी तुळशीचा हेअर मास्क (Tulsi Hair Mask)

आजकाल आपली सर्वांचीच लाईफस्टाईल ही अनहेल्दी (unhealthy lifestyle) झाली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना वयाच्या आधीच केस सफेद होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचं दिसून येत आहे. शरीरात विटामिन बी12 ची कमतरता असल्यास, केस लवकर पांढरे होतात. यासाठी तुम्ही तुळशीच्या पावडरचा वापर करावा

काही दिवसांतच तुमचा पांढऱ्या केसांचा प्रश्न सुटेल आणि केसांना पोषणही मिळेल. तसंच केस अधिक चमकदार आणि मऊ, मुलायम राहतील. 

कोंड्यासाठी हेअर मास्क 

Tulsi Hairmask for dandruff

कोंड्यापासून सुटका मिळविण्यासाठी तुळशीच्या पानाचा वापर तुम्ही करू शकता. याचा हेअरमास्क तुम्हाला लवकर कोंड्यापासून सुटका मिळवून देईल. 

हा हेअरमास्क वापरल्याने केसांमधून कोंडा कमी होतो. तसंच केस चांगले राहतात आणि केसांमध्ये चमकही राहाते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य