DIY फॅशन

Bra-Myths: ब्रा च्या बाबतीत या 9 गोष्टी आहे एकदम चुकीच्या!

Dipali Naphade  |  Sep 4, 2019
Bra-Myths: ब्रा च्या बाबतीत या 9 गोष्टी आहे एकदम चुकीच्या!

ब्रा (Bra) घालणं हा आपल्या आयुष्याचा आता अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की, आपल्याला ब्रा विषयी सर्व माहिती आहे. पण असं नक्कीच नाही. वास्तविक ब्रा ही नेहमीच्या वापरातील गोष्ट असल्याने आणि अजूनही याबद्दल जास्त चर्चा न करता येत असल्यामुळे आपण जास्त विचार करत नाही. पहिल्यापासून ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच गोष्टी पुढेही तशाच चालू ठेवतो. पण आपल्याला ब्रा च्या बाबतीत अशा काही गोष्टी आहे ज्या पूर्णपणे माहीत नसतात. तसंच काही जणींना ब्रा च्या बाबतीत गैरसमज असतात. आम्ही तुम्हाला इथे असेच काही  bra-myths सांगणार आहोत, जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

1. Bra घालण्याने तुमचे breasts perky राहतील

Perky म्हणजे तुमची छाती खाली लोंबणार नाही. तर ब्रा घालण्याने तुमची छाती व्यवस्थित पोझिशनमध्ये राहील. ब्रा चा उपयोग हा तुमच्या boobs ना योग्य पाठिंबा मिळण्यासाठी आणि त्याचा फोर्स तुमच्या पाठीवर येऊ नये यासाठी करण्यात येतो. जर तुम्ही boobs ना gravitational force पासून वाचवण्यासाठी ब्रा घालत असाल तर तुम्ही नक्कीच चुकीचा विचार करत आहात. ब्रा चा उपयोग हा तुमची छाती व्यवस्थित पोझिशनमध्ये राहावी यासाठी करण्यात येतो. 

ब्रा कसे निवडायचे ते देखील वाचा

2. रात्री झोपताना ब्रा घातल्यास, स्तन stable राहतात

Shutterstock

ब्रा घातल्याने तुमच्या स्तनांना नक्कीच सपोर्ट मिळतो पण त्याचा अर्थ असा नाही की, तुमचे स्तन सतत ब्रा घालून स्टेबल होतील. दिवसभर तुमचे boobs हे ब्रा मध्ये असतात. त्यांनादेखील श्वास घेण्याची गरज असते. तुम्हाला व्यवस्थित झोप हवी असेल तर तुम्ही रात्री झोपताना ब्रा काढायला हवी. तुमच्या स्तनांनाही मोकळ्या हवेची गरज असते. त्यामुळे हा एक गैरसमज आहे की, रात्री झोपताना ब्रा घातल्यास, स्तन नीट राहतात. तसंच रात्रभर ब्रा घालून झोपणं हे तुमच्या आरोग्यासाठीही हितकारक नाही हे नेहमी लक्षात ठेवा. 

हॉल्टर नेक ब्रालेट बद्दल देखील वाचा

3. White bra कपड्यांच्या खाली कमी प्रमाणात दिसते

Shutterstock

खरंच तुम्हाला असं वाटतं का? तसं असेल तर यात काहीच तथ्य नाही. इतके वर्ष तुम्ही जर पांढरी ब्रा घातली असेल तर तुम्हाला आतापर्यंत जाणवलं असेल की या बाबतीत काहीच खरं नाही. जर तुमच्या ड्रेसचं मटेरियल हे translucent असेल तर bra कोणत्या रंगाची आहे याने काहीच फरक पडत नाही. तर यामध्ये white bra चे straps अधिक स्पष्ट दिसतात. त्यामुळे कपड्यांसह घालण्याची ब्रा ही ड्रेसच्या रंगाची अथवा न्यूड अथवा काळी असणं जास्त योग्य आहे. 

4. Bra वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकता

Shutterstock

हो, हे खरं आहे मात्र तुम्ही ब्रा “delicate” setting सह वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकता. पण तुम्हाला तुमची ब्रा जास्त वेळ टिकवून ठेवायची असेल तर असं न करणंच योग्य आहे.  मशीन वॉशमध्ये अनेक चुकाही घडू शकतात. उदाहरणार्थ तुमच्या ब्रा ची underwire अथवा pads चा आकार खराब होऊ शकतो. तसंच त्याचं इलास्टिक सैल होऊ शकतं, एखादा हूक अडकला तर ब्रा फाटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या हातानेच ब्रा धुणं योग्य आहे. 

स्वतःसाठी योग्य आकाराची ब्रा कशी निवडावी

5. एक bra दोन दिवस लागोपाठ घालू शकता

एक ब्रा दोन दिवस घातली तर प्रॉब्लेम तर नाही पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि ब्रा ची देखील काळजी असेल तर असं करू नका. प्रत्येक मुलीकडे तिच्या आवडती एक ब्रा नक्कीच असते हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला ही तुमची ब्रा तशीच आवडती राहणं आवश्यक वाटत असेल तर ही ब्रा सतत घालू नका. एकदा ब्रा काढल्यानंतर आपल्या आकार आणि elasticity gain करण्यासाठी ब्रा ला 24 तास लागतात. तसंच ब्रा दिवसभर तुमच्या शरीराला चिकटून राहते. घाम आणि बॅक्टेरिया लक्षात घेता तुम्ही असं करणं योग्य नाही. 

6. वर्क आऊट करण्यासाठी Sports Bra ची गरज नाही

Shutterstock

कदाचित तुम्ही वर्कआऊट जर कमी प्रमाणात करत असाल तर तुम्हाला वाटेल की, उगीच इतके पैसे कशाला खर्च करायचे? पण असा विचार करू नका. तुम्ही तुमच्या boobs कडे दुर्लक्ष करू नका. वर्कआऊट दरम्यान शरीराची खूप जास्त हालचाल होत असते. त्यामुळे तुमच्या स्तनांना जास्त सपोर्टची गरज भासते. स्पोर्ट्स ब्रा मुळे योग्य सपोर्ट मिळतो. त्यामुळे तुम्ही वर्कआऊट करताना स्पोर्ट्स ब्रा चा आधार घेणंच योग्य आहे. 

7. तुमचं वजन कमी जास्त झालं तरी ब्रा चा आकार तसाच राहील

असा विचार तुम्ही कसा करू शकता? ही गोष्ट खरी आहे की, आपल्या शरीराच्या इतर भागापेक्षा अनेक मुली स्तनांचा भाग वेगळा मानतात. पण तुमच्या वजनामध्ये कमी जास्त बदल झाल्यास, इतर कपड्यांची साईज जशी बदलते तशीच ब्रा साईजदेखील बदलणारच नाही. तुमचं वजन कमी झालं अथवा वाढलं तर त्याचा परिणाम तुमच्या स्तनांवर आणि परिणामी ब्रा च्या आकारावरही होणार. त्यामुळे तुमचं वजन कमी जास्त झाल्यास, ब्रा चा आकार तुम्हाला योग्य होतोय की नाही हे पाहा.

रात्री झोपताना ब्रा घालणंं योग्य की अयोग्य?
 

8. एक Bra बरेच वर्ष वापरू शकतो

Shutterstock

एक ब्रा घेतली की आता काही वर्षांसाठी काम झालं असा विचार जर तुम्ही करत असाल तर तो अतिशय चुकीचा आहे.  एक चांगली ब्रा ही साधारण 100 washes अर्थात धुलाईपर्यंत टिकते. अर्थात एक वर्षभर. पण त्यानंतर तुम्ही तुमची ब्रा बदलायला हवी. तुमची कितीही आवडती ब्रा असली तरीही. तुम्ही त्यापेक्षा अधिक ती ब्रा वापरत राहिलात तर तुमच्या स्तनांना व्यवस्थित सपोर्ट मिळणार नाही. कारण वर्षभर वापरून त्याचं इलास्टिकही खराब झालेलं असतं. 

9. Black bra स्किन प्रॉब्लेम अथवा कॅन्सर होतो

Shutterstock

या अशा गोष्टी तुम्हाला नक्की कोण सांगतं? काळा रंग हा उष्णता शोषून घेण्यासाठी चांगला असतो. त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी तो अतिशय चांगला असतो. आपण आपली त्वचा व्यवस्थित साफ ठेवल्यानंतर काळ्या रंगाची ब्रा घालण्यात काहीच समस्या नाही. यामध्ये कोणतंही तथ्य नाही. काळ्या रंगाच्या ब्रा ने कॅन्सरही होत नाही. 

तुमच्या मनात जर ब्रा च्या बाबतीत हे असे गैरसमज असतील तर त्यात काही तथ्य नाही हे लक्षात घ्या आणि या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या ब्रा ची काळजी घ्या.

स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर तुम्हाला हे माहीत हवं

Read More From DIY फॅशन