DIY फॅशन

फेस्टिव्ह सीझनमध्ये बदला ड्रेसिंग स्टाईल आणि दिसा Slim Trim

Dipali Naphade  |  Sep 16, 2019
फेस्टिव्ह सीझनमध्ये बदला ड्रेसिंग स्टाईल आणि दिसा Slim Trim

आपण नेहमी बारीक दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. स्लिम दिसण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं. कधी जिममध्ये जाणं, तर कधी डाएट करणं, कधी हेव्ही वर्कआऊट करणं. या सगळ्याचा परिणाम नक्कीच होतो पण त्याला वेळ लागतो. तोपर्यंत जर तुम्हाला Slim Trim दिसायचं असेल तर नक्की काय करायचं हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुमची ड्रेसिंग स्टाईल बदलून तुमच्यामध्ये हा बदल घडवून आणू शकता. वाचून थोडं आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. तुम्ही तुमच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये बदल करून आपली अतिरिक्त चरबी नक्कीच लपवू शकता. आम्ही तुम्हाला इथे कशा स्टाईलचे ड्रेस घाला याबद्दल सांगणार आहोत. तुम्ही हे फॉलो केलंत तर नक्कीच या फेस्टिव्ह सीझनला तुम्ही स्लिम ट्रिम दिसू शकता. 

1. एका रंगाचा ड्रेस

Instagram

स्लिम अर्थात बारीक दिसण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे एकाच रंगाचे कपडे अर्थात ड्रेस घालणं. त्यासाठी तुम्ही गडद रंगाचे कपडे घालू शकता. गडद अर्थात डार्क कलर्स तुमची बॉडी स्लिम दाखवण्यासाठी फायदेशीर ठरतात.  मुख्यत्वे काळा रंग. तुमच्याजवळ जर काळ्या रंगाचा ड्रेस नसेल तर लगेचच अशा रंगाचा ड्रेस आपल्या वॉर्डरोबचा भाग बनवा. या रंगात तुम्ही अधिक स्लिम दिसता. 

POPxo Recommendation: Women Black Yoke Design A-Line Kurta

 

2. स्ट्राईप्सची कमाल

Instagram

आजकल ड्रेसेसमध्ये स्ट्राईप्सची फॅशन आहे. तुम्हाला जर स्ट्राईप्स आवडत असतील तर तुम्ही नक्कीच याचा वापर करा. पण एक लक्षात ठेवा की, हे स्ट्राईप्स जास्त रुंद असू नयेत. कारण तसं असलं तर तुम्ही जास्त जाड दिसाल. तुम्ही तुमच्यासाठी व्हर्टिकल अर्थात उभ्या स्ट्राईप्स अथवा तिरक्या स्ट्राईप्सच्या ड्रेसेसचा वापर करा. या तऱ्हेच्या स्ट्राईप्स तुम्हाला बारीक दाखवण्यात परफेक्ट ठरतील. पँट, स्कर्ट, मिडी, गाऊन अथवा जॅकेट्सवर बारीक स्ट्राईप्स असतील तर तुम्हाला उंच आणि बारीक दाखवण्यास उपयोगी पडतात. 

POPxo Recommendation: Women Blue Striped Maxi Dress

3. हाय वेस्ट

Instagram

एक वेळ अशी होती जेव्हा लो-वेस्ट पँट्स, स्कर्ट्स आणि जीन्स यांची चलती होती. पण आता फॅशन बदलली आहे. आता हाय – वेस्ट पँट्स, स्कर्ट्स आणि जीन्स यांची जास्त मागणी आहे. या तऱ्हेची स्टाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण यामध्ये तुम्ही अधिक बारीक दिसता. यासोबत तुम्ही शर्ट, ब्लाऊज अथवा टॉप यापैकी काहीही घालू शकता. तुम्ही तुमच्या शरीरयष्टीप्रमाणे निवड करावी. पण हायवेस्ट कपडे तुम्हाला स्लिम ट्रिम दाखवण्यात मदत करतात. 

फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस

POPxo Recommandation: Women White Self Design High-Low Top

4. मॅक्सी स्टाईल ड्रेस

Instagram

स्लिम दिसण्यासाठी तुम्ही मॅक्सी ड्रेसेस घातलेत तर अधिक चांगलं होईल. कारण तुम्ही यामध्ये जास्त बारीक आणि शिवाय उंचही दिसता. अशामध्ये जर मॅक्सीचा रंग गडद असेल तर अजूनच चांगलं. तुम्ही या मॅक्सी ड्रेसवर हिल्सची चप्पल मॅच करून घातलीत तर सगळेच तुमच्याकडे पाहत राहतील.  तुम्ही तुमच्या रंगाला साजेसे गडद कपडे घातलेत तर तुम्ही नक्की बारीक दिसता. 

POPxo Recommendation: Women Green Printed Maxi Dress

5. बेल्ट लावा

Instagram

आपली कंबर आणि कमरेखालचा भाग वेगवेगळा दिसण्यासाठी  तुम्ही बेल्टचा वापर करू शकता. यामुळे तुमची कंबर स्लिम आणि कर्व्ही दिसेल. तसंच तुमच्या सिंगल-पीस ड्रेस अथवा टॉपबरोबर मॅचिंग बेल्ट तुम्ही कॅरी करा आणि आपला फॅटी लुक एका कर्व्ही लुकमध्ये बदला. लक्षात ठेवा की, बेल्ट हा तुमच्या कमरेवरच लागलेला असेल.  कुठेही वर खाली तो होऊ देऊ नका. 

उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स – Fashion Tips For Tall Girl In Marathi

POPxo Recommendation: Women Black Printed Elasticated Waist Dress with Tassel Tie-Up

6. ए- लाईन ड्रेसेस

Instagram

ए- लाईन टॉप अथवा कुडत्यांचं हे वैशिष्ट्य असतं की, खालच्या बाजूने हे रूंद असतात.  त्यामुळे तुमच्या पोटावर सहसा लक्ष जात नाही. तसंच तुमची वाढलेली जाडी यातून दिसत नाही. तुम्ही ए – लाईन ट्यूनिक्स, टॉप अथवा कुरते घालून नक्की बघा. यामध्ये  तुम्ही नक्की बारीक दिसू शकता. 

POPxo Recommendation: Women Navy Blue & Pink Floral Print A-line Dress

7. हाय हिल्स

Instagram

तुम्ही जाड असाल आणि तुमची उंचीही कमी असेल तर तुम्ही हाय हिल्स घालायला हवी. मुख्यत्वे पाँईटेड हिल्स. कारण यामुळे तुम्ही उंच आणि बारीक दोन्ही दिसू शकता. तसंच तुम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वासही वाटतो आणि तुम्ही स्वतःला चांगल्या तऱ्हेने कॅरी करता.

नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश

POPxo Recommendation: Women Blue Solid Pumps

 

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.
 

Read More From DIY फॅशन