DIY फॅशन

तुमच्या शरीरयष्टीनुसार निवडाल कपडे तर तुम्ही नेहमीच दिसाल सुंदर (Dressing Tips In Marathi)

Leenal Gawade  |  Oct 14, 2019
तुमच्या शरीरयष्टीनुसार निवडाल कपडे तर तुम्ही नेहमीच दिसाल सुंदर (Dressing Tips In Marathi)

प्रत्येकाची शरीराचा बांधा वेगळा असते. काहींची चण लहान असते तर काहींची मोठी… अशावेळी तुम्ही तुमच्या शरीराची माहिती करुन घेत कपडे घालणे गरजेचे असते. काही जण काही नवा ट्रेंड आला की, तो लगेच फॉलो करायला जातात. पण नवीन काही ट्राय करण्याआधी तुम्ही तुमच्या शरीरयष्टीनुसार कपड्यांची निवड करणे आवश्यक असते. आता आम्ही तुमची फॅशन करण्यापासून अडवणूक करत नाही. जर तुम्ही तुमच्या बांध्यानुसार.. शरीरयष्टीनुसार कपड्याची निवड केली तर तुम्ही नेहमीच सुंदर आणि परफेक्ट दिसाल. म्हणूनच आज आपण शरीराचा बांधा कसा ओळखायचा आणि कोणत्या कपड्यांची निवड तुम्ही करायची या विषयी जाणून घेणार आहोत. करुया सुरुवात…

शरीरयष्टीचे प्रमुख प्रकार (Types of Body)

शरीराच्या बांध्यानुसार शरीरयष्टीचे काही प्रकार असतात. तुमच्या शरीराची रचना ही यापैकीच एक असू शकते. त्यामुळेच आधी हे प्रकार जाणून घेऊया.

Also Read Tips To Style Palazzo In Marathi

1. पिअर शेप (Pear Shape)

shutterstock

पेर या फळाच्या आकारावरुन या बांध्याला नाव ‘पिअर शेप’ असे ठेवण्यात आले आहे. तुम्ही पेर हे फळ डोळ्यासमोर ठेवा. पेर या फळाचा आकार वरुन लहान आणि खालून मोठा असतो. काही जणांच्या शरीराचा आकारही अगदी तसाच असतो. खांदा,कंबर हा भाग बारीक असून कंबरेपासून खालील आकार हा मोठा असतो. मांड्या जाड आणि नितंब हे मोठे असतात. अशा आकाराला ‘पिअर’ शेप असे म्हणतात. आता या प्रकारामध्येही वेगवेगळी चण असलेले लोक असू शकतात.

सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स

2. हवरग्लास शेप (Hourglass Shape)

shutterstock

36-24-26 शरीराची अशी मापं आदर्श असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. छाती आणि नितंबाचा आकार मोठा आणि कंबर लहान असा हा शरीराचा आकार असतो. अनेकदा सेक्सी बॉडीशेपमध्ये हा आकार जातो. स्तन आणि नितंबाचे योग्य प्रमाण असल्यामुळे ही शरीरयष्टी अनेकांना परफेक्ट वाटते. काहींना हा आकार जन्मत:च मिळतो. तर काही जण जीमला जाऊन हा आकार मिळतात. शरीराचा हा आकार अनेकदा प्रमाण मानला जातो.

3. अपर हवरग्लास शेप (Upper Hourglass)

shutterstock

ज्या प्रमाणे हवरग्लास हा शरीराच्या बांध्यामध्ये छाती आणि नितंबाकडील भाग मोठा असतो. तर या प्रकारामध्ये तुमचा वरील बांधा मोठा असतो. खांदे, हात हे जास्त जाड असतात. तर नितंबाकडील भाग हा त्या तुलनेत अगदीच निमुळता असतो. असा प्रकाराला आपण अपर हवरग्लास आकार म्हणतो.

4. बॉटम हवरग्लास शेप (Bottom Hourglass)

shutterstock

जर तुमचा फक्त नितंबाकडील भाग मोठा असेल. तर तुमचा शरीराचा बांधा हा बॉटम हवरग्लास प्रकारातील आहे.  यामध्ये नितंब आणि मांड्याकडील भाग हा मोठा असतो. जर तुमच्या शरीराचा आकार असा असेल तर तुम्ही या प्रकारात मोडता. 

5. राऊंड किंवा गोलाकार (Round or Oval Shape)

shutterstock

काहींच्या शरीराचा आकार गोल असतो. म्हणजे खांद्यापासून ते अगदी नितंबापर्यंत त्याचा आकार गोलाकार दिसतो. यामध्ये पोट.. नितंब…खांदा सगळेच अगदी गोलाकारात असते. अनेक जण अशाप्रकाराच्या शरीरयष्टीचेही असतात. अशा शरीरयष्टीची लोक फारच क्युट दिसतात.

घराचं रिनोव्हेशन करण्याआधी लक्षात घ्या या गोष्टी

6. आयताकृती शेप (Rectangular Shape)

shutterstock

आता तुम्हाला वाटेल असा शरीराचा आकार कसा असू शकेल. पण शरीराचा असाही बांधा असतो. यामध्ये शरीर अगदी एकसारखे असते. जर तुम्ही आयत पाहाल तर तो लांब असतो. अगदी त्याचप्रमाणे असा आकार असलेल्या व्यक्तीचे शरीर वरपासून खालपर्यंत एकसंध असा आकार असतो. खांदा-कंबर- नितंब एकाच आकाराचे असतात. एखाद्या साच्याप्रमाणे हे शरीर असते.

तुमचा शरीराचा बांधा कोणता ते कसे ओळखाल? (How to Determine your Body Type)

shutterstock

वर सांगितलेल्या प्रकारापैकी तुमचा शरीराचा बांधा कोणता हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला संपूर्ण कपडे काढून आरशासमोर उभे राहायचे आहे. ( यामध्ये लाजण्यासारखे काही नाही.) आरशासमोर उभे राहिल्यानंतर तुम्हाला तुमचा आकार ओळखणे सोपे जाईल. वर सांगितलेल्या प्रकारापैकी तुमच्या शरीराचा बांधा कसा ते ओळखा. 

उदा. जर तुमचा पोटावरील भाग हा तुलनेने लहान असेल आणि तुमच्या नितंबाकडील भाग मोठा असेल तर तुमचा शरीराचा बांधा पेअर शेप आहे. 

आता तुम्ही वरील प्रकार नीट वाचून तुमचा बांधा कोणता याचा शोध लावू शकता.

तुमच्या शरीरयष्टीनुसार तुम्ही असे घालायला हवेत कपडे (How to Dress for Your Body Type)

आता तुमच्या शरीराच्या बांध्यानुसार तुम्ही नेमके कसे कपडे घालायला हवे ते पाहुया

1. पिअर शेप असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing Tips for Pear Shaped Body)

Instagram

पिअर शेप म्हणजे काय ते आपण आता जाणून घेतले. आता अशांनी नेमके काय कपडे घालायला हवे ते देखील आपल्याला माहीत हवेत. 

Instagram

2. हवरग्लास शेप असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing tips for Hourglass Shaped Body)

Instagram

आदर्श असा हा आकार असल्यामुळे असा शरीराचा बांधा असलेल्यांना  अनेक फॅन्सी कपडे चांगले दिसतात. पण काही गोष्टींची काळजी घेणे तुम्ही आवश्यक असते. 

तुम्ही जर नवीन काही ट्राय करायचा विचार करत असाल तर तुम्ही बॉडीकॉन ड्रेस घालून पाहा.

Instagtram

3.अपरहवरग्लास शेप असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing tips for Upper Hourglass Shaped Body)

Instagram

शरीराचा वरील भाग मोठा असल्यामुळे अशांना नेमकं काय घालावं कळत नाही. बरेचदा चुकीचे कपडे घातल्यामुळे अशा महिलांचे दंड फार मोठे दिसतात. तुमचा शरीराचा आकार असा असेल तर मग तुम्ही कपडे घालताना करा या गोष्टींचा विचार 

Instagram

4. बॉटम हवरग्लास असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing Tips for Bottom Hourglass Shaped Body)

Instagram

बॉटम हवरग्लास हा आकार फॅशनसाठी त्रासदायक ठरतो. ज्यावेळी अशा लोकांना बॉटमवेअर निवडता येत नाही. कारण तुमच्या कपड्यांमधील बॉटमवेअर हे फार महत्वाचे असतात. नितंब मोठे असल्यामुळे तुम्ही कपडे निवडताना हे लक्षात ठेवा. 

Instagram

5. गोलाकार असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing Tips for Round or Oval Shaped Body)

Instagram

गोलाकार म्हणजेच याला अॅपल शेप फिगर म्हणतात. तुमचाही आकार असा असेल तर मग तुम्ही काही बाबतीत काळजी घेणे गरजेचे असते.तुम्ही जर परफेक्ट कपडे निवडले तर तुम्ही चांगले दिसू शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कपडे निवडता येऊ शकतात. 

 

 

Instagram

6. आयताकृती शेप असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing Tips for Rectangular Shaped Body )

Instagram

काही जणांचा आकार अगदी ठोकळ्यासारखा असतो. त्यांचे प्रत्येक अवयक अगदी मोजून मापून असतात. असा आकार असलेल्या सगळे कपडे चांगलेच दिसतात. पण तरीही काहीही घालण्यापेक्षा तुम्हाला कपडे निवडताना काही काळजी घ्यायला हवी. 

Instagram

तुम्हालाही पडतात का हे प्रश्न (FAQs)

तुमच्या शरीरयष्टीनुसार तुम्हाला कपडे घालणे गरजेचे आहे का?

जर तुम्ही तुमच्या शरीरयष्टीनुसार काही कपडे घातले तर ते तुमचा लुक अधिक खुलवण्यास मदत करु शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या शरीराचा आकार पाहून कपड्यांची निवड करा. अशाप्रकारे कपडे घातल्यामुळे तुम्ही सुंदर तर दिसालच. पण तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

कोणता बॉडी शेप अधिक आकर्षक दिसतो?

हवरग्लास प्रकारातील फिगर ही सगळ्यत जास्त आकर्षक असते. कोणतेही कपडे अशा प्रकारच्या बॉडी शेपला उठून दिसतात. 36-24-36 हा आकार जो म्हटला जातो तो याच प्रकारातील फिगरसाठी. म्हणूनच पुरुषांना अशा प्रकारचा आकार असलेल्या महिला अधिक आवडतात.

झीरो फिगर म्हणजे काय?

मध्यंतरी झीरो फिगरचे खुळ आले होते. त्यावेळी लोकांना झीरो फिगर हवी होती. त्याचे मेजरमेंटही वेगळे आहे. 30-22-32 असे याचे माप होते. आता ते तुमच्या उंचीनुसार हे माप बदलणारे होते. म्हणजे झीरो फिगर फिगरचे हे माप जास्तीत जास्त 36-28-36 इतके आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY फॅशन