Care

Hairfall ला Bye Bye करण्यासाठी फॉलो करा या ‘7’ टीप्स

Aaditi Datar  |  May 20, 2019
Hairfall ला Bye Bye करण्यासाठी फॉलो करा या ‘7’ टीप्स

तुमच्या केसावर तुमचं अगदी जिवापाड प्रेम असतं हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे गळणाऱ्या प्रत्येक केसाने किती दुःख होतं याचीही कल्पना आहे. प्रत्येक वेळी केस विंचरताना किंवा केस धुताना तुम्ही त्याची इतकी काळजी घेता तरी केस हे गळतातच. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केसगळतीला बाय बाय करण्यासाठी 7 सोप्या टीप्स. आता केसगळतीची चिंता करण्याऐवजी या टीप्स फॉलो करा आणि फरक बघा.  

1. तुमच्या स्कॅल्पबद्दल जाणून घ्या

जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर तुमचं स्कॅल्प जास्त कोरडं होतं आणि त्यामुळे वारंवार खाज येते. जर तुम्हालाही जाणवत असेल तर समजून घ्या की, केसगळतीचं हे सर्वात मोठं कारण आहे. कोंड्याच्या समस्येला टाळण्यासाठी रोज शॅम्पू करा किंवा चांगल्या डँड्रफ शॅम्पूचा वापर नक्की करा. कोंडा कमी झाला की, आपोआपच केसगळतीही कमी होईल.

तसेच इनग्रोन केसांपासून मुक्त कसे व्हावे हे देखील वाचा

2. तुमचं डाएट आणि तुमचे केस

तुम्हाला हे तर माहीतच असेल की, जे तुम्ही खाता त्याचा परिणाम तुमच्या बॉडी आणि आरोग्यावर जितका होतो त्यापेक्षा जास्त परिणाम तुमच्या केसांवर होतो. एखाद्या पोषण तत्त्वाची कमी किंवा जास्त प्रमाण हेही तुमच्या केसगळती मागचं कारण असू शकतं. जास्त मीठ आणि जास्त ऑईली खाण्यानेही केस निस्तेज होतात. त्यामुळे तुमचं डाएट हे बॅलन्स असायला हवं. ज्यामध्ये भरपूर प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमीन आणि मिनरल्स असायला हवेत. ज्यामुळे तुमचे केस होतील मजबूत आणि चमकदार.

तसेच इनग्रोन केस कसे टाळावेत हे देखील वाचा

3. उन्हापासून करा संरक्षण

उन्हाच्या तीव्र किरणांपासून फक्त तुमच्या त्वचेवरच नाहीतर केसांवरही वाईट परिणाम होतो. युव्ही किरणांमुळे तुमचे केस निर्जीव आणि निस्तेज होतात. हेही एक केसगळतीमागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे प्रयत्न करा की, उन्हात बाहेर पडावं लागू नये आणि जर पडलात तर केसांना स्कार्फ किंवा ओढणी बांधून केस पूर्णपणे कव्हर करायला विसरू नका. ज्यामुळे केसांवर थेट सूर्यकिरण पडणार नाहीत किंवा एखादी चांगली हॅट तरी स्वतःसोबत कॅरी करा. तुम्हाला हे माहीत आहे का तुम्ही केसांसाठीही एसपीएफ वापरू शकता. तुम्ही या ठिकाणी हे प्रोडक्ट घेऊ शकता. किंंमत 253 रूपये.

‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक

4. केसांनाही हवा मसाज

रोज निदान काही मिनिटं तरी तुमच्या केसांच्या मुळांना मसाज केल्यास त्यांना मजबूती मिळते. मसाजमुळे तुमच्या स्कॅल्पचं रक्ताभिसरणही चांगलं होतं आणि केसगळतीही थांबते. आठवड्यातून एकदा जर तुम्ही मसाज स्पेशलिस्टकडून मसाज करून घेतल्यास तुमच्या केसांसोबतच तुमचाही मूड रिलॅक्स होईल. केसांना मसाज करण्यासाठी खास अँटी हेअर फॉल ऑईल्सही उपलब्ध आहेत. तुम्ही या ठिकाणी हे प्रोडक्ट घेऊ शकता. किंमत 126 रूपये.

वाचा – ओपन केशरचना

5. चिल आऊट

जास्त टेन्शनमध्ये असल्यावर तुमचे केस जास्त प्रमाणावर गळतात. तुमचं शरीराची प्रतिकारक शक्ती तणावपूर्ण काळात तुमच्या केसांच्या फॉलीक्लसवर परिणाम करू लागते. त्यामुळे तुमच्या केसांवरही वाईट परिणाम होऊ लागतो. त्यामुळे टेन्शन घेणं कमी करा आणि चिल आऊट करा.

#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

6. शँपूचा वापर करा जपून

जास्त केस धुतल्याने तुमचे केस कोरडे होतात आणि केसगळतीची समस्या वाढते. पण केस कमी धुतल्यावर त्याची निगा राखता येत नाही. मग अशा परिस्थितीत काय करावं. लक्षात घ्या तुम्हाला आठवड्यातून फक्त 3 वेळा केस धुण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचे केस राहतील निरोगी आणि चमकदार. केसगळतीसाठी खास शँपूही बाजारात उपलब्ध आहेत. आम्ही सूचवू हा शँपू जो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. किंमत 182 रूपये. 

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

7. Hair style करा पण जरा जपून

केसांवर अति हेअरस्टाईल उपकरणांचा वापर केल्यास त्यांची मूळ कमकुवत होतात. जर तुम्ही घट्ट पोनीटेल बांधल्यास किंवा ब्लो ड्राय किंवा कर्ल केल्यासही केसांच्या मूळावर त्याचा परिणाम होतो. आपल्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायला आवडतात पण त्यासोबतच केसांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

Read More From Care