हेअर कलर केल्यानंतर किंवा केसांना मिळणाऱ्या अपुऱ्या पोषणामुळे अनेकदा आपले केस कोरडे होतात. कोरडे केस कोणालाच आवडत नाही. प्रत्येकीलाच छान चमकदार केस हवे असतात हो ना! तुमचेही केस काही कारणास्तव कोरडे झाले असतील तर तुम्ही आज सांगणारा हेअरपॅक नक्की ट्राय करुन पाहा. अगदी पहिल्याच वापरात तुम्हाला या हेअरपॅकमुळे झालेला फरक जाणवेल. यासाठी तुम्हाला फार गोष्टींची गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला लागणार आहे अॅलोवेरा जेल आणि तुमच्या आवडीचे तेल, चला करुया मग सुरुवात
लॉकडाऊनमध्ये गळू लागलेत केस,त्वचाही झाली निस्तेज तर मग नक्की वाचा
असा करा हेअरपॅक तयार
साहित्य : 1 मोठा चमचा अॅलोवेरा जेल, 2 मोठे चमचे तेल (किंवा तुमच्या केसांच्या लांबीनुसार )
असा लावा हा हेअरपॅक
- एका भांड्यात तुमच्या आवडीचे कोणतेही तेल घ्या. तुम्हाला कोणते तेल वापरायचे कळत नसेल तर तुम्ही खोबरेल तेलाचा उपयोग केला तरी चालेल.
- केस व्यवस्थित विंचरुन घ्या. जर तुम्हाला केसांचे सेक्शन करता येत असतील तर तुम्ही तसे करुन घ्या. कारण त्यामुळे जेल आणि तेल अगदी व्यवस्थित तुमच्या स्काल्पला सुद्धा लागते.
- आता हाताच्या साहाय्याने केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत हा पॅक केसांना छान लावून घ्या.
- सगळ्या केसांना लावून झाला की, हलक्या हाताने छान मसाज करा.
- कमीत कमी 30 मिनिटे आणि जास्तीत जास्त दोन तास हे केसांना लावून ठेवा. आणि कोमट पाण्याने तुमच्या रोजच्या वापरातला शँम्पू वापरुन केस धुवून टाका.
- केस धुतल्यानंतर ते अगदी छान कोरडे करा. केसांना सीरम लावण्याची तुम्हाला काहीही आवश्यकता वाटणार नाही कारण तुमचे केस छान चमकदार आणि मऊ होतील. तुम्हाला अगदी पहिल्याच दिवसात हा फरक जाणवेल.
हेअर स्पानंतर केस कायम चमकदार दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
याही गोष्टी ठेवा लक्षात
- अॅलोवेरा जेल थंडगार असते. त्यामुळे जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा वातावरण खूप थंड असेल अशावेळी या हेअरपॅकचा वापर टाळा.
- अॅलोवेरा जेल ही चांगल्या प्रतीची घ्या.
- केसांवर शँम्पूचा खूप प्रयोग करु नका.
- कंडिशनरचा वापर करु नका. कारण तुम्हाला त्याची काहीही आवश्यकता नाही. मुळात अॅलोवेरा जेल आणि तेल हे तुमच्या केसांना पोषण देऊन त्यांना कंडिशन करण्याचे काम करते. त्यामुळे कंडिशरनचा वापर अजिबात करु नका.
- जेल सुकल्यानंतर केस थोडे कडक होतात. त्यामुळे केस धुताना एकदम पटकन केस मोकळे करुन केसांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करु नका. कारण केसांवर पाणी टाकल्यानंतर ते आपोआपच नरम पडतात. केसांवरील सुकलेली जेल निघून जाते. मग तुम्ही शॅम्पूचा प्रयोग करा.
- आठवड्यातून फक्त एकदा किंवा फार तर दोनदा हा हेअरपॅक लावा.
आता नक्की ट्राय करा तुमच्या कोरड्या केसांसाठी स्वस्त आणि मस्त असा हेअरपॅक, आम्हालाही कळवा तुम्हाला हा हेअर पॅक तुम्हाला नेमका हा हेअरपॅक कसा वाटला.