स्त्रियांना जात्याच छान दिसण्याची छान राहण्याची आवड असते. आपण सुंदर दिसावं हे कुणाला वाटत नाही? मग छान दिसण्यासाठी चांगले कपडे, मॅचिंग दागिने आणि मेकअप सामान या तीन गोष्टींची आपण मदत घेतो. अर्थात मेकअप करणे ही काही हल्लीची फॅशन नाही. फार पूर्वीपासून स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी मेकअप करत आल्या आहेत. अर्थात प्रत्येकीलाच ती आवड असते किंवा असावीच हे काही सक्तीचे नाही. पण काही लग्नकार्य जसं नवरीचा मेकअप (navricha makeup) असेल, सण समारंभ असेल किंवा ऑफिसचा काही कार्यक्रम असेल तर मग प्रेझेंटेबल दिसण्यासाठी हलकासा का होईना पण मेकअप करावा लागतो. जिला त्वचेलाच काही त्रास असेल किंवा मेकअप केल्याने ऍलर्जी वगैरे येत असेल ती मेकअप करू शकत नाही. पण ज्यांना मेकअपचा त्रास होत नाही अशा जणींना जर कधी काही कारणाने मेकअप करण्याची वेळ आली तर कुणाच्याही मदतीशिवाय खालील टिप्स वापरून तुम्ही स्वतःचा छान मेकअप करू शकता.
अधिक वाचा – हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी
कुठल्या कपड्यांवर कसा मेकअप करावा
जर एखाद्या समारंभासाठी तुम्ही हेवी ड्रेस आणि हेवी दागिने घालणार असाल तर त्यावेळी तर न्यूड मेकअप करा. काही शेड्स जसे की ऑरेंज किंवा पीच शेडचे लिपस्टिक आणि आयशॅडो वापरल्याने तुम्हाला एक रिच पण सिम्पल आणि सोबर लूक मिळेल. जर तुमच्या घरचा समारंभ नाहीये आणि म्हणून तुम्ही फार हेवी ड्रेस आणि दागिने घालणार नसाल तर अशा वेळी तुम्ही गडद लाल किंवा मरून शेडचे लिपस्टिक लावल्याने तुमचा लूक उठून दिसेल. म्हणजेच थोडक्यात तुमचे कपडे, दागिने व मेकअप यात संतुलन साधणे महत्वाचे आहे.
हिवाळ्यात गडद रंगांचे लिपस्टिक खूप छान दिसतात. म्हणून, जर तुम्हाला मेकअपमध्ये ओठ हायलाईट करायचे असतील तर डोळ्यांना विंग्ड-आयलाइनर लावा. इतर कुठलाही ठळक आय मेकअप करू नका. किंवा केलात तरी त्यात न्यूड शेड्सचा वापर करा. जर तुम्ही आय मेकअप ठळक करणार असाल तर ओठांसाठी न्यूड शेड्सच्या लिपस्टिक किंवा लिपकलरची निवड करा. ज्यांना स्वतःच्या लूकमध्ये काही प्रयोग करून बघायची इच्छा असेल ते आय मेकअपमध्ये बरीच विविधता आणू शकतात. बाजारात बऱ्याच प्रकारचे आयलायनर्स उपलब्ध आहेत. जसे की ग्राफिक लाइनर्स, स्मज आयलाइनर , एंजेल विंग्स, फॉक्स लाइनर असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. हे विविध प्रकारचे लायनर्स वापरून तुम्ही आय मेकअपमध्ये वेगवेगळे प्रयोग करू शकता.
अधिक वाचा – नवीन वर्षात ब्युटी रेजिममध्ये करा हे महत्वाचे बदल
बिझी स्त्रियांसाठी मेकअप
जर तुमच्याकडे मेकअप करण्यासाठी फार वेळ नसेल किंवा तुम्हाला मेकअपमध्ये फार वेळ घालवायची इच्छा नसेल तर तुम्ही बेसिक क्लिंझिंग करून, टोनर व मॉइश्चरायाझर लावल्यानंतर पटापट कन्सिल्सर लावा आणि त्यावर लूज पावडर लावून ते सेट करा. हे केले तर मग तुम्हाला फाऊंडेशन लावण्याची गरज नाही. त्यानंतर तुमच्या आवडीच्या आणि योग्य त्या शेडचे ब्लश लावा. तुम्हाला जर इच्छा असेल तर हायलायटर लावा आणि छान उठून दिसणारे आयशॅडो लावलेत की बास! तुम्ही एकदम छान तयार झालात. हे सगळे केल्यानंतर मेकअप टिकून राहावा यासाठी स्प्रे किंवा मिस्ट मारून घ्या. हे सगळे करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटे लागतील. आणि जर वारंवार या पद्धतीने मेकअप केलात तर मग हे सगळे करायला तुम्हाला अगदी पाच ते सात मिनिटे लागतील. तासंतास आरश्यासमोर बसून राहण्याची गरज पडणारच नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे मेकअप करताना प्रायमर आणि मेकअप फिक्सर लावणे गरजेचे आहे म्हणजे मेकअप चांगला टिकून राहतो. तसेच आपल्या त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. मेकअप काढताना खोबरेल तेल किंवा मिसेलरचा वापर करा कारण मेकअप वाईप्सचा त्वचेला त्रास होऊ शकतो.
अधिक वाचा – मुलींना व्हायचे आहे पटापट तयार, तर सोपे हॅक्स
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक