फॅशन

लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Dipali Naphade  |  Oct 29, 2020
लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

 

लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीसाठी खास असतो. या दिवशी सर्वांनी केवळ आपल्याकडेच पाहावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं आणि त्यामुळेच लग्नासाठी  खास साडी असणं आणि पेहराव खास असणं गरजेचं असतं.  तसं तर लग्नासाठी अनेक वेगवेगळ्या साड्या आपल्याकडे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नेसल्या जातात. त्यातही नऊवारी आणि पैठणीला जास्त मागणी असते.  पण तरीही लग्नाच्या रिसेप्शनला रॉयल लुक देणारी साडी म्हणजे बनारसी. अगदी पूर्वीपासून बनारसी शालू आणि साडी ही परंपरा चालत आली आहे. मात्र आता बनारसी साड्यांमध्येही वेगवेगळे ट्रेंड आणि फॅशन आली आहे. तर साडी कशी नेसावी हेदेखील महत्त्वाचे आहे. बनारसी साडीचा लुक हा अत्यंत रॉयल असून याचे रंग अधिक आकर्षक असतात. केवळ सामान्यच नाही तर आता लग्नाच्या रिसेप्शनसाठी बॉलीवूड तारकाही बनारसी साडी नेसू लागल्या आहेत. बनारसी साडी ही सदाबहार आहे.  कधीही आऊट ऑफ ट्रेंड न होणारी ही साडी तुम्हालाही तुमच्या लग्नात नेसायची असेल तर त्याच्या खरेदीसाठी जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुमचा बनारसी साडीमधील लुक अधिक सुंदर आणि आकर्षक दिसू शकेल.  

रिसर्च करणे आहे आवश्यक

Instagram

 

बनारसी साडी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्यावर थोडा रिसर्च करायला हवा. त्या साडीची डिझाईन, शैली या सगळ्याबाबत माहिती करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये शट्टिर बनारसी, कोरा बनारसी, जॉर्जेट बनारसी, जांगला बनारसी,  तनचोई बनारसी, कटवर्क बनारसी आणि बुट्टीदार बनारसी अनेक प्रकार आहेत. तुम्हाला यापैकी कोणत्या प्रकारची बनारसी साडी हवी ते पण तुम्ही पाहून घ्या.  म्हणजे खरेदी करताना तुम्हालाही त्रास होणार नाही. तुम्हाला याच्या विविधतेबद्दल माहिती असली की, बनारसी साडी खरेदी करताना कोणती फसवणूकदेखील होणार नाही आणि लग्नासाठी एक योग्य साडीची तुम्हाला निवड करता येईल. 

‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

रंगाकडे द्या लक्ष

 

बनारसी साडीचा रंग हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर लग्नासाठी ही साडी खरेदी करत असाल तर ती गोष्ट डोक्यात ठेवणं आणि त्याचप्रमाणे रंगाची निवड करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा लाल अथवा गुलाबी, राणी रंगाची बनारसी साडी लग्नामध्ये वापरण्यात येते. वेडिंग रिसेप्शनसाठी असा रंग अधिक खुलून दिसतो. सर्वांमध्ये तुम्हीच खुलून दिसावं हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामधील गडद रंगाची निवड करा. अशा योग्य रंगाची निवड झाल्यावर त्याबरोबर लागोलाग लागणारी लिपस्टिकही निवडून टाका. MyGlamm च्या विविध शेड्स तुम्हाला निवडता येतील. 

मराठी साडी कोट्स

शरीररचनादेखील महत्त्वाची

बनारसी साडी नेसताना आपल्या शरीराची रचना कशी आहे अर्थात शरीर टाईप कसा आहे हे लक्षात घेणंही गरजेचे आहे. कारण साडी तुमच्या शरीराचे फिचर्स दाखवत असते. उदाहरणार्थ तुम्ही उंच आणि बारीक असाल तर तुम्ही मोठ्या मोटिफ आणि हेव्ही बॉर्डरची बनारसी साडी नेसा. ज्यामध्ये तुम्ही अधिक खुलून दिसाल. तर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही लाईट रंगाची, व्हर्टिकल प्रिंट अथवा शार्प बॉर्डरची बनारसी साडी नेसा.  यामध्ये तुमची उंची थोडी अधिक वाटेल आणि जाडीही कमी दिसेल. 

कांजिवरम आणि बनारसी साड्यांमधील फरक ओळखणं होतंय कठीण तर ओळखा असे

बजेट ठरवा

बनारसी साडीची किंमत ही त्याच्या मटेरियल, डिझाईन, त्यावरील कलाकुसर आणि ब्रँड या सर्वांवरून ठरते. त्यामुळे जेव्हा लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करायला जाल तेव्हा त्यासाठी तुम्हाला कोणत्या बजेटपर्यंत साडी घ्यायची आहे ते मनाशी पक्के करून जा. यामुळे दोन फायदे होतील. पहिला म्हणजे तुमची लग्नाची खरेदी ओव्हरबजेट होणार नाही आणि पहिल्यापासूनच मनात किंमत ठरली असेल तर त्या किमतीत तुम्ही योग्य पर्याय शोधू शकाल. 

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

ट्रायल आहे गरजेचे

बऱ्याचदा आपल्याला साडी पाहिल्यावर आवडते पण नेसल्यानंतर त्याचा लुक आवडत नाही. त्यामुळे तुम्ही जर लग्नासाठी बनारसी साडी घेणार असाल तर निवडल्यानंतर एकदा ट्रायल करायला विसरू नका. साडी विक्रेत्याला तशी विनवणी करून साडी खरेदी करा. कारण एकदा साडी घेतल्यानंतर तुम्हाला ती परत करता येऊ शकत नाही. त्यामुळे वेळच्यावेळी ट्रायल करून मगच तुम्ही तुमच्या आवडत्या बनारसी साडीची निवड करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From फॅशन